गुरुवार, २३ जानेवारी, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

      " परमेश्वरावर भक्तिचा वर्षाव करण्याचे नानाविध मार्ग तुम्ही शोधू शकता. "

सूत्र नववे

प्रज्ञान आणि अनुभवज्ञान 

           आश्रमवासीयांसाठी या प्रकरणाचे वाचन करत असताना माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्याच वेळी भिंतीवर लावलेल्या चित्रातील कृष्णाच्या डोळ्यांत अश्रू आले. कृष्णाचे ते चित्र कापडावर रंगवले असल्यामुळे अश्रू तसेच राहिले. 
           जरी मी स्वामींच्या या रूपावर प्रेम करत असले तरी ते सर्वव्यापी परमेश्वर आहेत. वसंतमयमद्वारे मलाही सर्वव्यापी बनून त्या सर्वव्यापी स्वामींना प्राप्त करून घ्यायचे आहे. म्हणून तो सर्वव्यापी परमेश्वर माझ्या भावनांना प्रतिसाद देतो आहे. 
           पांडुरंगाच्या मूर्तीला स्पर्श केल्यानंतर माझ्या मनात भावनांचा कल्लोळ झाला. मी आता केवळ यासाठी रडते की, मला मुक्ती नको, पावित्र्य नको, मला फक्त स्वामींचे सान्निध्य हवे. माझा हा आक्रोश ऐकून लगेच कृष्णही अश्रू ढाळतो. रखुमाईचे दुःख आणि अश्रू सहन न होऊन, तोच पांडुरंग आज अश्रू ढाळत आहे. यातून आम्ही कोण आहोत, आमच्यामधील नाते काय आहे हे सर्व उघड होत आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम    

रविवार, १९ जानेवारी, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

" पार्वतीमाता तुमच्या सुटकेसाठी धावली कि भगवान शिव पाठोपाठ येतीलच."

सूत्र नववे

प्रज्ञान आणि अनुभवज्ञान

८ जुलै २००८ ध्यान 
वसंता - चित्रातील कृष्णाच्या डोळ्यात अश्रू का ?
स्वामी - मला तुझे दुःख आणि अश्रू आता सहन होत नाहीत. हे त्या अश्रूंद्वारे दर्शवले जाते. 
वसंता - स्वामी, या पुस्तकाच्या मुखपृष्ठासाठी मी हे चित्र घेऊ का?
स्वामी - हो, घे. तू प्रेमसूत्र लिहिलेस का ? नाही, हे वसंतसूत्र आहे. तू बारा सूत्रं लिहीलीस. जगाने त्यातील एक तरी सूत्र आचरणात आणले का ? केवळ तूच हे करू शकतेस. त्यावरून तू कोण आहेस हे सिद्ध होते. जगाला प्रेमाचे धडे देण्यासाठी हा तुझा अवतार झाला आहे. जेव्हा तू पांडुरंगाच्या मूर्तीला स्पर्श केलास तेव्हा तुझा भावोद्रेक झाला. त्याचप्रमाणे जेव्हा तू रडतेस तेव्हा कृष्ण अश्रू ढाळतो. तुझे लेखन, तुझे अश्रू यांचा माझ्यावर परिणाम होतो. म्हणून त्या फोटोतून अश्रू आले. मी सर्वव्यापी असल्यामुळे तुझ्या प्रत्येक भावाला प्रतिसाद देतो. 
ध्यान समाप्ती

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....  

जय साईराम 

गुरुवार, १६ जानेवारी, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" जसे भाव तसे जीवन. "

सूत्र नववे 

प्रज्ञान आणि अनुभवज्ञान

             सीतेचे पावित्र्य सिद्ध करण्यासाठी रामाने तिला अग्निप्रवेश करण्यास सांगितले. लक्ष्मणाने रामाला विचारले," तू असे का करतो आहेस ?" तेव्हा रामाने उत्तर दिले," मी तिचे पावित्र्य जाणतो. तथापि ती पवित्र आहे हे मला जगाला ज्ञात करून दिलेच पाहिजे."
             स्वामी आता मला अग्निप्रवेश करण्यास सांगत नाहीत. परंतु मीच माझ्या प्रेमाचे पावित्र्य जगाला दाखवून देण्यासाठी क्षणोक्षणी अग्निप्रवेश करते आहे. सीतामाईच्या अग्निसम पातिव्रत्याने अग्नीला जाळले. आज माझ्या अग्निसम पातिव्रत्याने आणि प्रेमाने स्वामींना भाजून काढले. म्हणून ते म्हणतात, ' तू जगाला तुझे पावित्र्य दर्शविलेस. आता पुरे. थांब." 
             प्रेमसूत्र आमच्या प्रेमाची गहराई जगाला दर्शवते. रामाने सीतेला तिचे पावित्र्य जगापुढे सिद्ध करण्यास सांगितले. इथे स्वामी म्हणाले की, मी माझे पावित्र्य जगाला दर्शवले. आता पुरे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

रविवार, १२ जानेवारी, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

         " प्रत्येक गोष्ट परमेश्वराशी जोडा. सर्वांमध्ये केवळ चांगले पाहिल्यास त्यांची चैतन्य शक्ती तुमच्या मधे प्रवाहित होईल. " 

सूत्र नववे 

प्रज्ञान आणि अनुभवज्ञान

७ जुलै २००८ ध्यान 
स्वामी - तू अशी का रडते आहेस ? असे लेखन का करते आहेस ? मला आता तुझे दुःख सहन होत नाही. हे प्रेमसूत्र आता पुरे झाले !आता थांबव ! आनंदी राहा. लवकरच आपण एकमेकांना पाहू. 
वसंता - स्वामी मला तुमचे दर्शन हवे आहे.

संध्याकाळचे ध्यान 
वसंता - स्वामी, प्रेमसूत्र पुरे करू का ?
स्वामी - 
तुझ्या प्रेमाचे वर्णन कसे करावे !
प्रेमाची व्याख्या झालीस तू 
महाकाव्य प्रेमाचे निर्मिलेस तू 
प्रेमाकरिता निर्मिलेस तू नूतन जग 
प्रेमाकरिता निर्मिलीस नवनिर्मिती 
हे प्रेम आहे अभूतपूर्व 
पुरे ! पुरे, हे असह्य होतसे मज 

ब्रम्हसूत्र लिहू शकतो केवळ ब्रम्हदेव 
कोण लिहू शकते प्रेमसूत्र, केवळ तूच 
पुरे ! पुरे, थांबव !
लिहिण्यास मी सांगितले तर ... 
हृदय पिळवटून टाकीत तुझे तू 
लिहीतच जाशील, लिहीतच जाशील 
दुःख तुझे दुःसह होई मज 
पंचशत अवतार घेतले जरी मी 
तव प्रेमाचा होऊ कसा उतराई 
पुरे ! पुरे, थांबव !
नको वाढवूस माझी अवतार संख्या 

            पुरे .... सीता अग्निप्रवेश करत असता, अग्नी तिचे पावित्र्य सहन करू शकला नाही. मी तुझा अग्निप्रवेश सहन करू शकत नाही. तुझ्या पावित्र्याचा अग्नी मला भाजून काढतो आहे. 
वसंता - स्वामी, मी उपसंहार म्हणून हे लिहू का ?
स्वामी - लिही, परंतु तुझ्या प्रेमाला ना प्रस्तावना आहे ना उपसंहार. 
ध्यानसमाप्ती 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 


गुरुवार, ९ जानेवारी, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" मुक्ती म्हणजे बंधनातून स्वातंत्र्य, एकत्वाचा आनंद ."

सूत्र नववे 

प्रज्ञान आणि अनुभवज्ञान 

            मला स्वामींचा अनुभव आणि स्वामींना माझा अनुभव ही  नवनिर्मिती आहे. याचसाठी माझ्यामध्ये अपरिमित प्रेमाचा उगम झालाय. संपूर्ण सृष्टी वसंता बनून त्यांच्यावर प्रेमाची उधळण करते. त्यांनी या सर्व वसंतांना आपले प्रेम दर्शवावे, एवढीच माझी इच्छा आहे. ही नवनिर्मिती आहे. संपूर्ण सृष्टीने माझ्यासारखे बनून स्वामींवर प्रेमाची उधळण केली तरीही या प्रेमाची तृप्ती होणार नाही. 
            सीतेचा रामाशी संयोग झाल्यानंतरच प्रज्ञान, अनुभवज्ञान झाले. आता मी स्वामींपासून दूर आहे. परंतु जेव्हा मी त्यांचे सामीप्य अनुभवेन तेव्हा प्रज्ञानाचे अनुभवज्ञानात परिवर्तन होईल. आता मी जे जे लिहिले ते उच्च ज्ञान आहे, प्रज्ञान आहे. हे प्रज्ञान अनुभव ज्ञान बनून कृतीचे रूप धारण करते. या अनुभवासाठी मी तळमळते आहे.

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम   

रविवार, ५ जानेवारी, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

      " बंध म्हणजे द्वैतावस्थेत अडकलेले मन. मनामुळेच भेद उत्पन्न होतात. "

सूत्र नववे 

प्रज्ञान आणि अनुभवज्ञान 

७ जुलै सकाळचे ध्यान 

वसंता -  स्वामी मला प्रज्ञान आणि अनुभवज्ञान याविषयी काही सांगा ना. 
स्वामी - तू अनेक उपनिषदांवर लिहिले आहेस. मुण्डक उपनिषदामध्ये तू झाडावर बसलेल्या दोन पक्ष्यांविषयी लिहिलेस. एक फळ चाखतो व दुसरा साक्षीभावाने पाहतो. फळ खाणारा सामान्य पक्षी साक्षी कसा बनतो, याचे तू प्रात्यक्षिक करून दाखवले आहेस. हे अनुभवज्ञान आहे. उच्च ज्ञानाचे लेखन म्हणजे उपनिषद. दैनंदिन जीवनात त्याचा प्रयोग करणे म्हणजे अनुभवज्ञान होय. त्यानंतर तू बृहदारण्य उपनिषदावर लिहिलेस. त्यावेळी तू विराट पुरुषाच्या अवस्थेची अनुभूती घेतलीस. वसंतमयम् च्या अनुभूतीतून तू पुरुष-प्रकृती अवस्थेविषयी लिहिलेस. आता नवनिर्मितीसाठी तू माझे सान्निध्य मागते आहेस. जेव्हा तुला माझे दर्शन, स्पर्शन आणि संभाषण  लाभेल तेव्हा सर्व काही ठीक होईल. 
ध्यान समाप्ती 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम 

गुरुवार, २ जानेवारी, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

        " प्रत्येक गोष्टीकडे परमेश्वरी लिला या दृष्टिकोनातून पाहिल्यास तुम्हाला दिव्यानंदाची अनुभूती होईल. "

सूत्र नववे 

प्रज्ञान आणि अनुभवज्ञान

            रामकृष्णांना समकालीन असणाऱ्या कलकत्त्यातील विद्वान पंडितांबद्दलही मला स्वामींनी सांगितले. ते लोकांच्या हृदयामध्ये आपले स्थान प्रस्थापित करू शकले नाहीत. परंतु , लोक आजही रामकृष्णांना आपल्या हृदयात केवढं स्थान देतात ? काळाच्या ओघात पंडित विस्मृतीत गेले. लोकांना त्यांची आठवण राहिली नाही. परमेश्वरासाठी तळमळणारे, रडणारे महान भक्त मात्र कायमचे स्मरणात राहतात. 
            स्वामींनी प्रज्ञान आणि अनुभवज्ञान ह्या दोन्हींची तुलना केली. पंडित प्रज्ञानासारखे आहेत आणि परमेश्वरासाठी तळमळणारे भक्त हे अनुभवज्ञानासारखे आहेत. माझ्या प्रज्ञानाला स्वामींच्या आणि माझ्या नात्याचे ज्ञान आहे. स्वामींनी माझा स्वीकार केल्यानंतर ह्या ज्ञानाचे अनुभवज्ञानात म्हणजेच प्रत्यक्ष अनुभवातून निर्माण होणाऱ्या ज्ञानात परिवर्तन होईल. 
            म्हणून स्वामींनी सांगितले की, मी सात दिवस त्यांच्या सान्निध्यात असेन. त्यावेळी मला सात दिवसांत  ७० वर्षांचा अनुभव मिळेल. हा अनुभव घेताना प्रज्ञानाचे  अनुभवज्ञानात परिवर्तन होईल.  

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम