रविवार, २१ मे, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
        " सत्याचा शोध घेण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे तप. या तपाद्वारे ज्ञान प्राप्त होते व ज्ञानातून परमानंदाची अनुभूती होते. "
मी स्वतःस अलग करते 

         पाच वर्षाच्या लहान बालिकेने परमेश्वराशी लग्न करण्याची इच्छा का बरे केली ? बालवायापासून माझे सत्यस्वरूप कसे व्यक्त करावे हे मला माहित नव्हते. मी परमेश्वरापासून अलग झाले आणि मला त्याच्याशी एकरूप व्हायचे होते. मी ह्या एकरूप होण्याला विवाह संबोधले. परमेश्वराशी योग साधने ह्या ऐवजी विवाह करणे हा शब्द मी जगाला समजण्यासाठी वापरला. हे बालक तिच्या ध्येयाप्रद जाण्यासाठी झगडले. शेवटी तिला साधनेचा मार्ग सापडला आणि कित्येक वर्षांनी ती जिथून अलग झाली त्याला जाऊन मिळाली. ह्या ध्येयप्राप्तीसाठी आणि विश्वामुक्तीसाठी तिने अतोनात प्रयत्न केले. 

साधनेच्या शिखरावर, परमेश्वराची चित् शक्ती, तिची संपूर्ण ताकद प्रकट करते.
यावेळी ती कर्मकायदा तोडून, सर्व जगाचे परिवर्तन करते. 

           स्वामी स्वतःस परमेश्वर म्हणून प्रकट करत आहेत. त्यामुळे ते कायद्याच्या मर्यादेत कार्य करतात ; पण जेव्हा माणूस परमेश्वर होतो, तेव्हा त्याला मर्यादा नसतात. तो काहीही करू शकतो. तो प्रेम आणि करुणेद्वारे जगाला कर्ममुक्त करू शकतो.  


संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 
उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

गुरुवार, १८ मे, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
     " परमेश्वराप्रती असणारी अढळ श्रद्धा, परमेश्वराहून अधिक महान आणि सामर्थ्यशील आहे. "
मी स्वतःस अलग करते
 
           परमेश्वर अवतार म्हणून येतो तेव्हा त्याला बऱ्याच मर्यादा असतात. त्याच्या कृतींना कारकायद्याच्या सीमा असतात. माणसांच्या कर्मांनुसार तो त्याच्या कृपेचा वर्षाव करत असतो. ह्या त्याच्या मर्यादा आहेत. आता अवतार रूपातील परमेश्वर स्वतःला अलग करून सर्वसामान्य खेडवळ स्त्रीच्या रूपात आला आहे. ती स्त्री परमेश्वरावर प्रेम करते. ती शुद्ध चैतन्य, विशुद्ध प्रेम व पवित्र परमेश्वरावस्थेतून अवतरित झाली आहे आणि आता अशा जगात राहते आहे जिथे सत्य, शुद्धता अथवा प्रामाणिकपणा नाहीये. ती इथली घाण आणि अशुद्धता स्विकारू शकत नाही. माणसे अशी का आहेत हे तिला कळत नाहीये. 
          मला फक्त प्रेम कळते, दुसरे काही नाही. मी आक्रोश केला, रडले, " मी इथे का जन्माला आले? माझे प्रभू कुठे आहेत, मला त्यांच्याकडे पार्ट जायचे आहे, त्यांच्याशी विवाह करायचा आहे. " हा ध्यास हेच शुद्ध प्रेम आहे. 

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

रविवार, १४ मे, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" तुमच्या मुखाने केवळ सत्य वदावे, अन्य काही नाही. "
मी स्वतःस अलग करते 

          निर्मात्यापासून निर्मिती कशी होते ? संपूर्ण विश्व ही निर्मिती आहे. हे विश्व परमेश्वरात लय पावणे यालाच प्रलय म्हणतात. जेव्हा ते परमेश्वरापासून प्रकट होतं, तेव्हा त्याला निर्मिती म्हणतात. हे नैसर्गिक चक्र कलियुगाच्या अखेरीस घडतं. हा अवतार प्रेमस्थापना करण्यास आला आहे. म्हणूनच या कलियुगाच्या शेवटी प्रलय होणार नाही. मी विश्वाचे, प्रकृतीचे, निर्मितीचे प्रतिनिधित्व करते. स्वामी हे पुरुष, परमेश्वर आहेत. मी स्वामींमध्ये एकरूप होईन. माझा देह ज्योतीरुपात स्वामींमध्ये संयुक्त होणं हाच प्रलय. त्यांनतर नवीन सृष्टी निर्माण होईल. जेव्हा माझ्या आणि स्वामींच्या देहांच अस्तित्व संपेल, तोच प्रलय असेल. आम्ही पुरुष प्रकृतीतत्व प्रकट करण्यासाठी आलो असल्यामुळे हे घडेल. ही नवनिर्मिती आहे. सत्ययुगाचा, नवनिर्मितीचा जन्म प्रलयाविना होईल. 
          जेव्हा स्वामींनी ह्या सत्याची उकल केली तेव्हा माझे जराही समाधान झाले नाही. एवढे महान सत्य लिहिण्याची माझी तिळमात्र इच्छा नव्हती. मी त्यांच्यापासून अलग झाले आहे. जोपर्यंत मी परत त्यांच्यात संयुक्त होत नाही, तोपर्यंत मला शांती नाही. मन,  बुद्धी,अहंकार आणि पंचेंद्रिये त्यांच्यात एकरूप झाली आहेत, फक्त देह बाकी आहे. माझा देह ज्योतीरूप धारण करून स्वामींच्या देहात संयुक्त व्हायला हवा. तेव्हाच मला शांती आणि समाधान लाभेल. माझा अखेरीस स्वामींशी योग झाला तरच मी त्यांच्यापासून प्रकट झालेय हे सिद्ध होईल.  

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

गुरुवार, ११ मे, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
      " तुमच्या नेत्रांना केवळ परमेश्वर दृष्टीस पडला पाहिजे, अन्य काही नाही. "
१ 
मी स्वतःस अलग करते 

         चित्शक्ती हणजे काय ? आता आपण पाहू या. 
         परमेश्वर शाश्वत स्थितीत आहे. तो साक्षी अवस्थेत आहे. त्याची चित्शक्ती ही त्याची कार्यशक्ती किंवा चैतन्यशक्ती आहे. जेव्हा परब्रम्हाची पृथ्वीवर अवतरित होण्याची वेळ होते, तेव्हा चित्शक्ती त्याला हलवते. सर्वश्रेष्ठ परब्रम्ह जागृत होऊन नावारूपासहित अवतरित होते. भगवान सत्यसाईबाबा हा आत्ताच अवतार आहे. त्यांची चित्शक्ती ही सर्वसाधारण खेडवळ स्त्री म्हणून अवतरली आहे. सत्यसाई साक्षी अवस्थेचं प्रतिनिधित्व करतात, वसंतासाई कार्यशक्ती अवस्थेचं प्रतिनिधित्व करते. परमेश्वराची भक्ती कशी करावी हे तिच्या जीवनातून दिसून येते. ती एक सर्वसामान्य व्यक्ती, परमेश्वरप्राप्ती कशी करू शकते हे दाखवते. परमेश्वराची चित्शक्ती, एका बाजूस भक्ताचे जीवन दर्शवीत आहे तर दुसऱ्या बाजूस परमेश्वराचे. खुद्द परमेश्वर मात्र फक्त परमेश्वर अवस्था प्रकट करत आहेत. 
          माणसाने आदर्श जीवन कसे जगावे हे मी दाखवते. स्वामींचे जीवन पुरुषतत्व दाखवते तर माझे जीवन प्रकृतीतत्व दर्शवते. जोडीने ते निर्माता आणि निर्मितीतत्व घडवतात. 

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

मंगळवार, ९ मे, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
श्री वसंतसाईंच्या अखंड साई चिंतनातून गवसलेली अनमोल रत्ने
रत्न - ४
भाव - मूळ कारण

🕉 जेव्हा मनात विचार उद्भवतात, तेव्हा ते चांगले आहेत का वाईट हा भेद आपण करू शकतो परंतु ह्या प्रकारे मनातील भाव आपण समजून घेऊ शकत नाही. *भाव अंतरंगातून अचानकपणे उफाळून येतात* आणि त्यांना खीळ घालता येत नाही वा नियंत्रित करता येत नाही.

🕉*सर्व भाव ईश्वराभिमुख करायला हवेत*,ते चांगली फळे बहाल करतील. केवळ भावच मनुष्याची जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्तता करतील.

🕉*स्पर्शाची संवेदना हे जन्माचे मूळ कारण आहे.*देहभाव नाहीसा झाल्यानंतरच ही स्पर्शाची जाणीव दूर करता येते.

🕉जशी भक्ती वृद्धिंगत होते तसा देहभाव कमी होतो आणि  परमेश्वराप्रती विशुद्ध प्रेमभावच देह बनतो.

🕉प्रेम मनुष्याला,परमेश्वर सर्वांमध्ये आहे;आणि तो एकातून अनेक झाला आहे हे ज्ञान प्रदान करते.

🕉परमेश्वराप्रती असणारे प्रेम,भौतिक सुखापासून पंचेंद्रियांना अंतर्मुख करण्यासाठी मनुष्याला सहाय्य करते.

-- श्री वसंत साई अम्मा 

🌸ॐ श्री साई वसंत साईसाय नम:🌸
जय साईराम 

रविवार, ७ मे, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
       " तुमच्या भावभावनांनी केवळ परमेश्वराला स्पर्श केला पाहिजे, अन्य कशालाही नाही. "
मी स्वतःस अलग करते 

          मी स्वामींचा ध्यास घेऊन रडत राहिले, तेव्हा त्यांनी आम्ही कोण आहोत याविषयी उच्चस्तरीय सत्य प्रकटन केले. ते म्हणाले, ' मी पुरुष आणि तू प्रकृती आहेस.' त्यांनी विस्तृतपणे समजून सांगितलेली सत्याची गुपितं मी ' उपनिषदांपलीकडे ' आणि ' वेदांपलीकडे' ह्या पुस्तकांमधून लिहिली आहेत. ' साई डायजेस्ट ' या पुस्तकात मी  परमेश्वराला कसे ' खाते आणि पचवते'  लिहिले आहे. तरीसुद्धा माझी परमेश्वराची तृष्णा तृप्त झाली नाही व साधनाही थांबली नाही. ही माझी न शमणारी तृष्णा आहे. कारण मी या पृथ्वीवर अवतरित होण्यासाठी त्यांच्यापासून अलग झाले आहे. मी त्यांना अगदी सेकंदाचा एक अंश इतका वेळही विसरू शकत नाही. मला फक्त त्यांच्याशी संयुक्त होण्याची इच्छा आहे. अशी भक्ती असलेलं कोणी या पृथ्वीतलावर असू शकेल का ?
          माझ्या संपूर्ण जीवनाच्या स्थित्यंतरात, मी कोण आहे याचे स्वामी पुरावे देत आहेत. स्वामी म्हणाले की एप्रिल २००२ मध्ये वसिष्ठ गुहेत मी स्वामींमध्ये एकरूप झाले. एक महिन्यानंतर व्हाईटफिल्डला त्यांच्या एका फोटोद्वारे त्यांनी याचा पुरावा दाखवला. त्यांच्या फोटोच्या अर्ध्या भागावर गुलबक्षी रंगाच्या पाकळ्यांचे आकार साक्षात् झाले. स्वामी म्हणाले, " तू माझ्या अर्ध्या देहात व्याप्त झालीस. " मी म्हणाले, " मी यात समाधानी नाही. मला तुमचा देह पूर्णत्वाने हवा आहे. " ही इच्छा हेच दर्शवते की मी त्यांची चित्शक्ती आहे. 

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 

उर्वरित प्रकरण पुढील भागात..... 
जय साईराम 

गुरुवार, ४ मे, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
शांती अंतर्यामी आहे, हे जाणणे हेच खरे ज्ञान ! "
१. 
मी स्वतःस अलग करते 

          स्वामींविषयी मला कळण्यापूर्वी माझी कृष्णावर अपरिमित भक्ती होती. मी त्याच्यासाठी दररोज रडत असे. मला त्याच्याशी विवाह करायचा होता. का ते मला ठाऊक नाही. परमेश्वराने माझे जन्मजात ज्ञान गुप्त ठेवले. परमेश्वराच्या शोधात मी जागोजागी भटकत राहिले. 
          शेवटी कृष्णाने मला सांगितले की तो पुट्टपर्तीत सत्यसाईबाबा म्हणून अवतरित झाला आहे. मी त्यांच्यावर माझ्या भक्तीचा वर्षाव करू लागले. त्यानंतर स्वामी ध्यानात माझ्याशी बोलू लागले ते मला म्हणले, ' तू राधा आहेस ', हे मी ' लिबरेशन हिअर इटसेल्फ राईट नाऊ' या माझ्या पहिल्या पुस्तकात लिहिले आहे. 
         स्वामींवर माझ्या भक्तीचा वर्षाव करीत मी माझी साधना चालूच ठेवली. त्यांनी मला अनेक अनुभव दिले, पण माझे समाधान झाले नाही. माझी साधना चालूच राहिली. मला त्यांच्या प्रेमाचा जास्तीत जास्त अनुभव घ्यायचा होता. मला त्यांच्यामध्ये एकरूप होण्याचा ध्यास लागून राहिला होता. का बरं ? कारण मी त्यांच्यातूनच तर आले आहे.   

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
 
उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम