सुविचार प्रेम, प्रेम, प्रेम ! प्रेम म्हणजे काय ? भक्तीचे परमोच्च शिखर म्हणजे प्रेम . सर्वसाधारणपणे वात्सल्य, बंध , जिव्हाळा या भावनांना आपण प्रेम म्हणतो. परमेश्वराप्रती असणारा भक्तीभाव म्हणजे प्रेम. जेव्हा ते आपल्या अनुरेणूंमधून ओसंडून वाहू लागते ते खरे प्रेम. कारंज्यातील पाण्याप्रमाणे रोमारोमातून प्रेम उफाळून येते. प्रेम हे संकुचित नसून सतत वृद्धिंगत होणारे असते. स्वामी ज्या विश्वप्रेमाचा संदर्भ देतात ते म्हणजे संपूर्ण विश्वाला व्यापून टाकणारे सर्वसमावेशक प्रेम होय. सर्वांवर प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या अंतर्यामी स्वाभाविकच दया आणि करुणा यांचे झरे वाहत असतात. भरभरून प्रेम देण्याने आनंदाची प्राप्ती होते. तो आनंद आपल्या देहातील अनुरेणूंना व्यापून टाकतो .
संदर्भग्रंथ - इथेच ! या क्षणी !! मुक्ती !!! भाग २