ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" पूर्णपणे शुद्ध होऊन परमेश्वराच्या चरणी स्वतःला समर्पित केले पाहिजे. "
९
कली परततो
ध्यान
वसंता - स्वामी, तुम्ही आधी म्हणालात की सर्वांना मुक्ती मिळेल. आता तुम्ही म्हणता की त्यांना कर्म भोगावी लागतील. हे कस काय ?
स्वामी - सत्ययुगात, १००० वर्षे सर्वजण मुक्तीचा आनंद उपभोगतील. सर्वांना सत्युगात अंतिम मुक्ती मिळाली तर त्यानंतर जागाच कार्य कस चालणार ? हे सत्ययुग संपल्यावर त्रेतायुगात येणार नाही... कली चालू राहील. कलिच कार्य कस चालणार ? त्यासाठी कर्म हवीत. म्हणूनच उरलेल्या कर्मांचा अनुभव सुरु होईल. १००० वर्षांच्या सत्ययुगाच्या शेवटी, ज्यांची कर्म शिल्लक आहेत ते पुन्हा जन्म घेतील. कलियुग चालू राहील. अनेक मुक्त होतील पण सर्व नाही.
वसंता - स्वामी, सत्ययुग संपल्यावर कर्म कशी कार्यरत होतील ?
स्वामी - हळूहळू सत्युगाचा प्रभाव कमी होत जाईल आणि कलीची पुन्हा सुरुवात होईल. ज्यांची आता अतिक्षय वाईट कर्म आहेत, ते त्यावेळी पुन्हा जन्म घेतील. त्यावेळी उदयास येणारा कली हा आत्तापेक्षाही अधिक वाईट असेल.
ध्यानाची समाप्ती
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा