गुरुवार, ३० जून, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
        " जेव्हा आपली भक्ती अधिक शुद्ध आणि परिपक्व होत जाते तेव्हा परमेश्वर आणि आपण यातील अंतर कमी होऊन गोष्टी आपोआप घडून येतात."
१०
कली म्हणजे कर्म 

तारीख २१ डिसेंबर २००८ संध्याकाळचे ध्यान 

वसंता - स्वामी, तुम्ही म्हणालात की, आपण लोकांची कर्म आपल्या शरीरावर घेतली..... म्हणजे नक्की काय?
स्वामी - कलियुग हे काही साधेसुधे आहे का? किती कर्म ! जगात काही ज्ञानी व भक्तसुद्धा आहेत, पण तरीही त्यांची काही कर्म आहेतच. त्यांना मुक्ती मिळावी म्हणून आपण त्यांची कर्म घेतली. पंचमहाभूते शुद्ध  होत आहेत ? त्यांची अशुद्धता तू तुझ्या पंचेंद्रियांवर घेतेस आणि त्रास भोगतेस. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 
उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम  

रविवार, २६ जून, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
        " भक्ती आणि प्रेम यांच्याद्वारे पसरणारी स्पंदने सिद्धीद्वारे प्रसूत होणाऱ्या स्पंदनांहून अधिक शक्तीशाली असतात. "
कली परततो 

            मला शिष्य गोळा करायचे नाहीत. मला नाव, प्रसिद्धी काही नको आहे. मी इथे आले आहे ती प्रत्येकाला मुक्ती मिळवून देण्यासाठी. म्हणूनच या आणि मला सामिल व्हा. उठा ! जागे व्हा ! त्वरित सुरवात करा. हा अवतार पुन्हा येणार नाही. ही संधी दवडू नका. सगळ्याचा त्याग करा. कशाचीही अपेक्षा करू नका. फक्त परमेश्वर शाश्वत आहे. फक्त तोच आनंद आहे. इतर सर्व विसरून जा. ही दुर्मिळ संधी आहे. या, या, मला सामिल व्हा. आपण आपल्या प्रवासाची सुरुवात नूतन पहाटेच्या दिशेने करू या. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम   

गुरुवार, २३ जून, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

       " जो अहंकार आणि इच्छा यांच्या मलीनतेपासून मुक्त असतो त्याच्या मनाच्या आरशामध्ये सत्य झळाळते. "

कली परततो  

           आता योग्य वेळ आहे. एक क्षणही दवडू नका. घोर तपश्चर्या करा, तुमच्यात सुधारणा करा, परिवर्तन करण्यासाठी सगळे प्रयत्न करा. आता फक्त २८ वर्षे उरली आहेत. या काळात पृथ्वी शुद्ध होईल. 

           स्तूपाद्वारे स्वामींचे आणि माझे भाव संपूर्ण जगाचे परिवर्तन करत आहेत. पंचमहाभूते शुद्ध होत आहेत. पंचेंद्रिये शुद्ध होत आहेत. विचार करा, पटवून घ्या आणि स्वतःला बदला. जसजस वातावरण शुद्ध होईल, तसतस शुद्धीकरण सोप होत जाईल. उशीर करू नका. या, या मी तुम्हा सर्वांसाठी अश्रू ढाळते आहे. मी तुम्हाला मुक्तीकडे घेऊन जाईन. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार - ७ जानेवारी 

" प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक विचार, उच्चार आणि आचार यांमधून त्यांचा अंतर्यामी भगवान व्यक्त व्हावा. "


स्वामी नेहमी सांगतात की, विचार, उच्चार आणि आचार यांमध्ये सुसंवाद असावा.. सर्वांनी जीवनात ह्याचा सराव करायला पाहिजे. पण कोण असं करतंय? माणूस विचार करतो एक, बोलतो दुसरंच आणि वागतो तिसरेच ! लहानपणी स्वामींनी एक नाटक लिहिलं होतं; त्याचं नाव होतं,'चेप्पी नाटा चेस्तारा ', म्हणजे बोलावे तसे चालावे. तथापि शिक्षक, राजकारणी, शास्त्रज्ञ, आणि आध्यात्मिक जीवन जगणारे हा नियम पाळत नाहीत. खरं तर समाजातील सर्वच स्तरांवर हे असच आहे. आध्यात्मिक जीवनात विचार, उच्चार आणि आचाराचा सुसंवाद अतिशय महत्वपूर्ण आहे. पुष्कळ जण आध्यात्मिक पुस्तकं वाचतात, व्याख्यानं ऐकतात. त्यांनी वाचलेलं आणि ऐकलेलं आचरणात आणलं नाही तर उपयोग काय? ज्यांना आध्यात्मिक जीवनात प्रवेश करायचा आहे त्यांनी त्यांच्या विचार,उच्चार आणि आचारांमध्ये सुसंवाद आणणं अनिवार्य आहे. जर तुम्हाला कोणी विचारलं की, काय विचार करते/तो  आहेस? , तर तत्क्षणी तुम्हाला संकोच न वाटता उत्तर देता आलं पाहिजे. तुम्ही उत्तर देऊ शकला नाहीत किंवा तुम्हाला लपवाछपवी करायची गरज वाटली तर तुमचा सर्व अभ्यास व्यर्थ आहे. तुम्हाला तुमच्या मनातील विचार व्यक्त करता येत नसेल तर तो विचार एक तर  चुकीचा आहे किंवा वाईट आहे.  

वाईट कृत्य करू नका. तुमच्या मनात सतत नाव, प्रसिद्धी, पैसा अशा गोष्टींचे विचार असल्यामुळे तुम्ही बोलता एक आणि वागता वेगळंच. शाळेत लहान मुलांना शिकवलं जातं की, " खोटं कधी बोलू नये." खरं तर लहान मुलांना खोटं म्हणजे काय हेच माहिती नसतं. जेव्हा मला शाळेत, "खोटं बोलू नये "  असं शिकवलं गेलं तेव्हा मी घरी गेल्यावर लगेचच विचारलं की,"खोटं म्हणजे काय?" मला सांगितलं गेलं की ज्या गोष्टी जशा घडतात तशाच सांगाव्यात, त्यात बदल करू नये. तरीसुद्धा मला काहीही कळलं नाही. लोकांना असं बोलायची गरजच काय? 

एक उदाहरण. एक दिवस वडील आपल्या लहान मुलाला सांगतात,"संध्याकाळी एक माणूस येईल.तू त्याला सांग की मी घरी नाहीये." तो माणूस आला तेव्हा मुलानं त्याला सांगितलं की,"माझे वडील घरी नाही येत." तो निरागस मुलगा विचार करतो,'शाळेत सांगतात,खोटं बोलू नका. आणि बाबांनी मला खोटं बोलायला लावलं.' जग हे असं आहे. आपणच आपल्या मुलांना खोटं बोलायला शिकवतो. पालकच जर असे असतील तर मोठं झाल्यावर ते मूल कसं वागेल? आध्यात्मिक जीवनात आपण लहान मुलासारखं निष्पाप व्हायलाच हवं.  आपण आपला प्रत्येक विचार, उच्चार आणि आचार यांची छाननी करायलाच हवी; आणि ह्यांमध्ये सुसंवादआहे ह्याची खात्री करणं अत्यंत जरुरी आहे. सर्वोत्तम अवतार सत्यसाई इथे आले, त्यांनी ही शिकवण दिली. पण लक्षात कोण घेतो? जे कोणी  स्वामींच्या शिकवणीचं अनुसरण करतील ते लाभान्वित होतील; आणि जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतील. 

कली युगात सहसा भगवान अवतरत नाही. तरीही त्यांच्या करुणेमुळे तसंच प्रेमामुळे मानवाला शिकवण देण्यासाठी ते आले. ह्या काळात जन्मलेले सर्व अतिशय भाग्यवान आहेत. आपण स्वामींची निदान एक तरी शिकवण आचरणात आणावयास हवी.


जय साईराम 

रविवार, १९ जून, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

          " मायेच्या पिंजऱ्यातून स्वतःला मुक्त करा, परमेश्वर हवा ही एकमात्र इच्छा ठेवा. "

९ 

कली परततो 

            माझे भाव नवनिर्मितीच्या प्रत्येक अंगात प्रवेश करतील. पक्षी, प्राणी, झाडे, प्रत्येक व्यक्तीमध्येसुद्धा प्रवेश करतील. गुहेत असणारे गोप कलियुगाचे प्रतिनिधित्व करतात. कृष्णाने निर्माण केलेली मुले, गाई-वासरं यांची प्रतिकृती सत्ययुगाच्या नवीन निर्मितीचे प्रतिनिधित्व करतात. 

            ज्याप्रमाणे गोप, गाई-वासरं एक वर्षांनी गुहेतून बाहेर निघाली आणि नवी निर्मिती अदृश्य झाली, त्याचप्रमाणे १००० वर्षांचे सत्ययुग संपल्यावर कलियुग परत येईल. 

            गुहा ही कर्माच्या तराजूचे द्योतक आहे. १००० वर्षांनंतर नवी निर्मिती अदृश्य होईल. गुहा उघडेल आणि माणसं आपआपली पूर्वकर्म आणि संस्कार यानुसार पुन्हा जन्म घेतील. कलियुग पुन्हा सुरु होईल. खाली दिलेल्या तक्त्यावरून हे स्पष्ट होईल की, आगामी सत्ययुग आणि कलियुगात होऊ घातलेल्या घटनांचे पुरावे श्रीमद्भागवत या धर्मग्रंथामधील गोष्टीरूपात अस्तित्वात आहेत. 

धर्मग्रंथाचा पुरावा

प्रत्यक्ष अनुभव

गोप, गाई-वासरं

कलियुगातील माणसं

ब्रह्याने गुहेत लपवली

कर्माचा तराजू थांबला

गुहेत एक वर्ष ठेवली

सत्ययुगाच्या १००० वर्षापर्यंत कर्मतराजू थबकला

कृष्णाची नवीन निर्मिती,नवीन गोप, गाई-वासरं

नवीन निर्मिती, सत्ययुगात केवळ सत्य आणि प्रेमभाव

एक वर्षानंतर गुहा उघडते आणि जुने गोप परत येतात

१००० वर्षानंतर जे पुढील कलियुगात जन्म घेतील त्यांचा कर्मतराजू कार्य करू लागतो

 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ...... 

जय साईराम 

गुरुवार, १६ जून, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार  
" चिरकाल आनंद म्हणजे परमेश्वराशी एकात्मता."
कली परततो 

           ब्रम्ह्देव बाळकृष्णाच्या गोकुळातील दिव्य लीला पहात होते. त्यांना कळत नव्हतं की एवढं लहान बालक इतके अचाट पराक्रम कसे काय करू शकत ? एक दिवस कृष्णाची परीक्षा घेण्यासाठी ब्रम्हाने गोप व गाई-वासरांना पळवून एका गुहेत बंदिस्त केल. कृष्णाला या नाट्याच सत्य ठाऊक असल्याने त्याने नूतन गोप व गाई-वासरं निर्माण केली आणि त्यांना नेहमीप्रमाणे सायंकाळी परत पाठविले. ही मुले प्रेम आणि विनम्रतेने ओतप्रोत होती. त्यांच्या पालकांना मुलांच्या वागण्यातील बदल जाणवला. गाईंनी दूध जास्त दिले आणि त्या वासरांवर खूप प्रेम करू लागल्या. सर्वांमधून निःस्वार्थ, शुद्ध प्रेमाचा झरा वाहू लागला. कृष्णाने मुले, त्यांचे कपडे, गुरं हाकायचा काठ्या अगदी सर्व काही पुन्हा निर्माण केले. ब्रम्हदेवांनी गुहेत बंदिस्त केलेली गोप व गाई-वासरे वेगळी होती ; त्यांच्यावर पूर्वजन्माचे संस्कार नव्हते. केवळ परमेश्वराच्या संकल्पाने त्यांची निर्मिती झाली होती. त्यामुळेच त्यांची वागणूक आदर्श होती.    

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

रविवार, १२ जून, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
      " आपण जन्म का घेतला ? पुन्हा केवळ मृत्यु पावण्यासाठी आपण जन्म घेतला आहे का ? आपण मुक्ती होण्यासाठी आणि इतरांसमोर आदर्श उदाहरण प्रस्थापित करण्यासाठी जन्म घेतला आहे. "
कली परततो 

           तुम्ही सध्याच्या कलियुगात मुक्ती मिळवू शकाल आणि पुढील कलियुगात पुन्हा जन्माला न येण्यासाठी कठोर प्रयत्न करू शकता. आपले पूर्वज इतके भाग्यवान नव्हते म्हणून त्यांनी स्वामींना पाहिले नाही. त्यांचे जीवन, तो काळ आपल्यापेक्षां निराळा होता. आपल्याला प्रत्यक्ष चालताबोलता परमेश्वर लाभला आहे, तेव्हा आपण त्याचा पूरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे. कर्माचा सूक्ष्म मुद्दा विस्तृतपणे सांगणारे हे पुराणातील एक उदाहरण मी खाली देत आहे. सत्ययुग कसे येणार आणि ते युग संपेल तेव्हा काय होईल हे कळण्यासाठी तुम्हाला त्याची मदत होईल. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

गुरुवार, ९ जून, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
          " जर तुम्ही अखंड नामस्मरण केलेत तर ते तुमच्या श्वासाइतके स्वाभाविक बनून जाते. "
 
कली परततो 

          येणारे कलियुग कसे असेल याची ही एक झलक आहे. परमेश्वराला घट्ट पकडून ठेवा, म्हणजे तुम्हाला त्या भयंकर कलियुगात जन्म घेण्याची वेळच येणार नाही. आपण सध्याच्या आयुष्याचे मार्गक्रमण योग्यरितीने करूया म्हणजे १००० वर्षांनंतर येणाऱ्या कलिमध्ये आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही. 
          सध्याच्या कलियुगात आपला जन्म झाला म्हणून आपण स्वतःला नुसत भाग्यवानच समजू नये तर, प्रत्यक्ष अवतार इथे वावरत असल्यामुळे आपल्यावर दुहेरी कृपा झाली आहे. ज्यांना अवताराची ओळख पटली आहे, त्यांनी पुन्हा सत्ययुगात जन्म घेऊन परमेश्वरासोबत राहण्यासाठी खडतर प्रयत्न करावे. जरी तुम्ही तुमचे कर्माचे ओझे कमी करू शकला नाहीत तरी निदान नवीन कर्म तरी करू नका. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

रविवार, ५ जून, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

          " मन वेड्या माकडासारखे आहे ते सांगेल तसे वागू नका. बुद्धीचा वापर करून विवेकाने वागा. "

कली परततो 

            याचाच अर्थ असा की सत्ययुगाच्या जन्मापूर्वी, म्हणजेच आता मुक्ती मिळवता येईल. पुढच्या कलियुगाच्या शेवटी माणसांना मानवी इतिहासातील महाभयंकर अशा काळाला तोंड द्यावे लागेल. ते कसे असेल बरं ?

             त्या कलीच्या शेवटच्या काळात पृथ्वीवर भ्रष्टाचारी लोकांचा बुजबुजाट होईल. ते त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करतील. दुष्काळ आणि अवर्षणामुळे लोक दऱ्याखोऱ्यांमध्ये धाव घेतील. घेतील. ते झाडपाला, कंदमुळांवर जगण्याचा प्रयत्न करतील. त्यांचे आयुर्मान फार तर ५० वर्षे राहील. 


संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

गुरुवार, २ जून, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
     " परमेश्वराच्या सान्निध्यात धन, नावलौकिक हे सर्व शून्यवत आहे. परमेश्वर हवा हीच एकमात्र इच्छा धरा." 
कली परततो 

           उदाहरणार्थ, आता माझ्या विश्वमुक्तीच्या वरामुळे, अगदी 'दुष्ट दारुडा ' सुद्धा मोक्ष मिळवेल. सत्ययुग संपेपर्यंत त्याच्या कर्माचे भोग पुढे ढकलले जातील, त्यानंतर तो कलिच्या काळ्याकुट्ट काळात पुन्हा जन्म घेईल. त्यावेळी दुष्ट लोक कलिला जास्तीत जास्त खालच्या पातळीवर नेतील, आणि अशा कंपनांमुळे अधिक दुष्ट प्रवृत्ती निर्माण होतील. या दुष्ट प्रवृत्ती कुटुंबामध्ये रुजल्या जातील आणि येणाऱ्या अनेक पिढ्यांपर्यंत त्या चालू राहतील. 
           पुढील दहा वर्षात, स्वामी आणि मी ह्या जगाचा निरोप घेण्यापूर्वी, धरती शुद्ध होईल. पंचमहाभूतांच्या शुद्धीकरणामुळे, सर्वांची पंचेंद्रिये शुद्ध होतील आणि त्यामुळे लोकांचे परिवर्तन होईल. ह्यावेळी मुक्ती मिळवण्याची चांगली संधी आहे. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम