गुरुवार, ९ जानेवारी, २०२५


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

 
             मदुराई मधील एका भक्ताच्या घरामध्ये बराच वेळा मांगल्य आणि जोडवी साक्षात झाली आहेत. त्यांनी गरजू गरीब लोकांसाठी विनामूल्य सामुदायिक विवाह आयोजित केले आहेत. एकदा अशाच दोन जोडप्यांच्या विवाह समारंभास मी उपस्थित होते. त्यांना संसारासाठी लागणारी भांडीकुंडी भेट देण्यासाठी मला त्यांनी आमंत्रण दिले होते. ते मला त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी आमंत्रित करत असत परंतु माझ्या कामामुळे मला जाणे शक्य होत नसेल. योगायोगाने मी भगवानांकडे मांगल्य मागितल्यानंतर त्या भक्तांनी मला फोन केला. मला स्वप्नातही अशा महत्त्वाच्या घटनांची मालिका यातून सुरू होईल असे वाटले नव्हते. प्रत्येक गोष्ट त्यांच्या संकल्पानुसार घडते.
             एक महिना अगोदर दिनांक ७ फेब्रुवारी रोजी स्वामींनी मला 'इथेच, याक्षणी मुक्ती' भाग दोन हे पुस्तक प्रकाशित करण्यास सांगितले. पुस्तकाच्या छपाईचे काम चालू होते. मी स्वामींची शक्ती आहे यावर  शिक्कामोर्तब करणारे अनेक विलक्षण अनुभव आणि घटना या पुस्तकामध्ये नमूद केल्या आहेत. ध्यानामध्ये मी स्वामींना म्हणाले," स्वामी तुम्ही श्री चेट्टियाराच्या घरी पहिल्या पुस्तकावर (इथेच, या क्षणी, मुक्ती भाग -१) स्वाक्षरी केलीत. तुम्ही त्यांच्याशी पुस्तकाविषयी बोललात व फोटोसुद्धा घेण्यात आले. तरीसुद्धा काही जणांचा त्याच्या खरेपणावर विश्वास नाही. मग ते त्याच पुस्तकाच्या दुसऱ्या भागावर कसा विश्वास ठेवतील. ह्याच्या सत्यतेविषयी अनेक पुरावे दर्शविल्यानंतर ही काही जण म्हणतात की हे सर्व म्हणजे माझ्या कल्पनेचा अविष्कार आहे. लोक या मांगल्याविषयी काय विचार करतील?
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा