ॐ श्री साई वसंतसाई साय नमः
सुविचार
" महाकारण जगतात जीव सत्याशी म्हणजेच परमेश्वराशी एक होतो . "
पुष्प ३० पुढे सुरु
वसंता - स्वामी , या आठ पोपटांच्या कार्डाची विशेषता काय आहे ?
स्वामी - आंडाळप्रमाणे तुलाही परमेश्वराशी विवाह करण्याची इच्छा आहे . तू सदैव अष्टाक्षरी मंत्र जपलास; अगदी पोपटासारखा, पुन्हा पुन्हा . आपण आदि आहोत; पूर्णम् व त्याची अर्धांगी . तू अनाहत चक्रात आरोहण केलेस , व माझे तिथे अवतरण झाले . हे विश्वब्रम्ह गर्भ कोटम् आहे ; आपल्या हृदयांचा संगम. ही आहे नवनिर्मिती .
वसंता - आता मला समजले स्वामी . मी लिहीन .
आता आपण याविषयी पाहू . आंडाळची कथा मी पुष्कळ वेळा बालवयातच ऐकली होती , त्यामुळे माझ्या मनात तिच्यासारखे कृष्णाशी विवाह करून त्याच्यामध्ये विलीन होण्याची इच्छा निर्माण झाली . तेव्हापासून मी पोपटाप्रमाणे सदैव ' ॐ नमो नारायणाय ' मंत्राचा जप करू लागले . काही काळ गेल्यानंतर स्वामींनी मला हा मंत्र जपणे थांबविण्यास सांगितले ; कारण हा मंत्र जपण्याने मी समाधी अवस्थेत गेले असते .
तमिळ संत आंडाळच्या खांद्यावर नेहमी एक पोपट असतो . इथे स्वामींनी आठ पोपट चितारले होते . ते आठ पोपट मुक्ती स्तूपाच्या स्तंभाप्रमाणे उभ्या रेषेत होते . अनाहत चक्र प्राप्तकरण्यासाठी मी साधना केली . स्वामी या चक्रामध्ये अवतरले . स्वामी व मी आदि ( वैकुंठ ) आहोत , पूर्णम् व त्याची अर्धांगी . ४ पोपट अधोगामी दाखवून स्वामींनी त्यांचे अवतरण ( सहस्त्रार या वरच्या चक्रातून अनाहत यां खालच्या चक्रात येणे . ) सूचित केले . मी खालच्या चक्रातून ( मूलाधार ) वरच्या ( अनाहत ) चक्रात गेल्यामुळे ४ पोपट ऊर्ध्वगामी दाखवले . अनाहत चक्रात आमचे मिलन झाले . हे विश्वब्रम्ह गर्भकोटम् आहे . इथून नवनिर्मिती स्तूपाद्वारे समस्त विश्वामध्ये प्रवेश करेल.
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ......
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा