ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" माया सत्याला दडवून ठेवते. एकोहम् बहुस्यामि हे सत्य जाणा. "
पुष्प ३० पुढे सुरु
तो महाअवतार येथे आला, आता तो त्याचे महात्म्य मला सांगतो न् मी लिहिते. साधारणतः वेद पुराणे पाठाच्या स्वरुपात पाहायला मिळतात . इथे स्वामी अन् मी आमच्या जीवनकथेद्वारे सर्व उलगडून दाखवतो . सत्य म्हणजे काय ? सत्याचरण कसे करावे ? परमेश्वर प्राप्ती कशी करावी ? हे सर्व आम्ही स्पष्ट केले आहे . कोणीही त्याचे महात्म्य पूर्णत्वाने जाणू शकणार नाही . एकदा स्वामी यासंदर्भात बोलले होते .
" माझे खरे स्वरूप जाणण्यासाठी तुम्ही हजारो वर्षे तप केले वा संपूर्ण मानवजातीने एकत्र येऊन यासाठी कळकळीचे प्रयत्न केले तरी माझे सत्य स्वरूप तुम्ही जाणू शकणार नाही . "
त्यांचे खरे स्वरूप कोणीही जणू शकणार नाही . असा हा परमेश्वर आपण याची देही याची डोळा पाहिला . हे आपले अहोभाग्यच म्हटले पाहिजे . ही संधी आपण चुकवता कामा नये . तुम्ही तर संतमहात्मे , ऋषिमुनी , भिक्षु , मठाधिपती या सर्वांहून भाग्यवान आहात , म्हणून ही संधी चुकवू नका . प्रयत्न केल्यास ज्ञानाद्वारे परमेश्वर प्राप्ती होऊ शकते . मायेतून जागे व्हा ! स्वामींचे अवतार कार्य दर्शविण्यासाठी मी येथे आले आहे . आता माझे कार्य जाणून घ्या .
स्वामी न आल्यामुळे मी अविरत अश्रू ढाळत होते . तेव्हा एस.व्ही. वैदीश्र्वरन कोविलला गेले . त्यांनी नाडीग्रंथ पाहिले . मी ह्या अवताराच्या थोरवीचा प्रसार सर्वत्र कसा करत आहे , ज्ञानाचा प्रसार कसा करत आहे व माझ्या सेवाव्रताबाबत अगस्त्य ऋषीनी लिहिलेल्या नाडीमध्ये स्पष्ट लिहिले आहे .
उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा