ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" प्रेमवृद्धीसाठी एका नात्याची आवश्यकता असते. परमेश्वर तुमचा एकमेव सच्चा मित्र आहे. सदैव तुम्ही त्याला तुमच्या सोबत ठेवा."
प्रकरण आठ
प्रेमरूप भाव धारण करतात
१९९२ मध्ये मी एक गीत लिहिले. त्यामध्ये मी लिहिले," प्रल्हादाने निर्मिला नरहरी अवतार माझ्या प्रेमाने निर्मिले तुमचे रूप." कवितेचे नाव आहे, ' तुमचे आनंददायी रूप कोणी निर्मिले ' ही कविता मी खाली देत आहे.
प्रल्हादाने निर्मिला नरहरी अवतार
माझ्या प्रेमाने निर्मिले माझे प्रभू
प्रकटले तुमचे आनंददायी रूप,
माझ्या आर्त हाकांमधून
हे प्रभू,
कोणी दिला तुमच्या देहास गुलाबगंध ?
मी, माझ्या हृदयाच्या गाभ्यातून दिलेल्या सादेने
कोणी घडवले तुमचे दिव्य चरण कमल?
मी, माझ्या करूण रुदनाने
कोणी चितारले तुमचे मनमोहक रूप ?
मी, माझ्या अश्रूंच्या महापुराने
अहाहा ! तुमच्या मोहक स्मिताचे सौंदर्य
माझ्या अनंत प्रेमाचे साम्राज्य तर नव्हे ?
तुमच्या अधरांची लाली
जणू माझ्या भक्तीचे सौंदर्य
खट्याळ तुमचे नेत्र
जणू माझ्या रक्तात भिनलेले तुमचे नाम
तुमचे नर्तन करणारे सुवर्ण चरण ?
माझ्या हृदयाचे संगीत
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा