ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जसे लोखंड वितळून साच्यात ओतले जाते तसेच आपण पुन्हा पुन्हा आपले जीवन भक्तीमध्ये वितळून आध्यात्मिक शिस्त अंगी बाणवली पाहिजे."
प्रकरण नऊ
साधनापथावरील पत्रे
हे भगवान ' साईराम '
अनंत कोटी प्रणाम !
तुम्ही म्हणालात की तुम्ही आणि कान्हा एकच आहात, हे खोटं आहे की काय ? तुम्ही मला का बरं एवढा मनस्ताप देता ? तुम्ही म्हणालात, " माझ्या कृपेवर तुझा अधिकार आहे. हवी तेव्हा हक्कने मागून घे. माझ्या कृपेसाठी तुला हात पसरावे लागणार नाहीत." माझी आज काय दशा झाली आहे पहा . आज मी एखाद्या भिक्षेकऱ्यासारखी सर्वांपुढे हात परसरते आहे. कालच मी संन्यासिनी अंबिकाप्रिया यांना पत्र लिहिले. मी त्यांना माझ्यासाठी, माझ्या साधनेसाठी प्रार्थना करण्याची विनंती केली . मी अनेक संतमहात्म्यांकडेही यासाठी रडून आर्जव करत आहे. मी रोज समस्त भक्त, ज्ञानी सिध्दपुरुष, चिरंजीवी यांच्याकडे प्रार्थना करते की त्यांनी माझ्या आध्यात्मिक प्रगतीसाठी मला आशीर्वाद द्यावेत. स्वामी, मला तुमची कृपा केव्हा प्राप्त होणार ?
कान्हा, तू गजेंद्रावर नाही का करुणा केलीस, तू त्रिवक्रामध्ये नाही का परिवर्तन घडवलेस ? तू एका शिळेचे स्त्रीमध्ये रूपांतर केलेस, ना ? तू गोवर्धन पर्वत उचललास, होय ना ? माझ्या विनवण्यांकडे तू दुर्लक्ष का करतो आहेस ? तू जर मला सोडून दिलंस तर मी कुठे जाऊ ?
" मी आणि साई एक आहोत " असे कान्हा म्हणाला ते खोटं आहे का ? मी तुमचा आवाज ऐकला हेही खोटं आहे का ?
कान्हा, कान्हा कृपा करून तुझ्या कृपेचा वर्षाव कर.
तुमची प्रिय बालिका
वसंता
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम