रविवार, १८ जून, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

          " परमेश्वर केवळ एकच आहे, आपण सर्वजण त्याची लेकरे आहोत हे सत्य आहे." 

प्रकरण नऊ 

साधनापथावरील पत्रे 

                   प्रभू ! तुमच्या मनोरंजनासाठी तुम्ही हे विश्व निर्माण केलेत. तुम्ही निर्माण केलेला मानव जेव्हा मार्गावरून घसरला तेव्हा त्याला सुधारण्यासाठी, आपल्या छत्रछायेत घेण्यासाठी तुम्ही भूतलावर आलात. तुम्ही आमच्यासाठी  अनेक महान कार्ये केलीत. स्वामी ! साईराम !तुम्ही आतापर्यंत केलेल्या वाटचालीने तुमचे पाय दुखत असतील. बोलून बोलून तुमचे दिव्य मुखही थकले असेल. 
                   हे प्रभूवरा ! या सर्वासाठी आम्ही तुमचे आभार कसे मानावे ?
                   तुमच्या निर्मितीतील एका अज्ञात कोपऱ्यात राहणाऱ्या माझ्यासारख्या एका यःकश्चित जीवामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी तुम्ही कृपा वर्षाव केलात. 
                   तुमच्या दिव्य चरणांवर अनेक प्रणाम. प्रभू तुम्हीच माझे रक्षण करत आहात. तुम्हीच माझा आसरा आहात. मी पूर्णपणे तुमच्यावर विसंबून असावे ;तसेच मला क्षणोक्षणी तुमच्या सान्निध्याची अनुभूती घेता यावी, यासाठी कृपा करून मला आशीर्वाद द्या. 
                   हे प्रभू, मी तुम्हाला क्षणभरही विसरू शकत नाही. साईराम, साईराम तुम्ही माझ्यावर काय जादू करत आहात ? पुन्हा पुन्हा मी तुमच्या दिव्य चरणांवर नतमस्तक होत आहे. ही माझ्या प्रेमाची छोटीशी झलक आहे. तुम्ही दाखवलेल्या करुणेप्रति माझ्या कृतज्ञतेची झलक आहे. तुमच्या दिव्य चरणांशी मी संपूर्ण शरणागत झाले आहे. स्वामी, कृपया माझा स्वीकार करा. तुम्हीच माझे एकमेव आश्रयस्थान आहात. 
तुमची प्रेमळ बालिका 
वसंता 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा