ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" ज्याप्रमाणे निर्वात जागी ठेवलेला दिवा न फडफडता तेवत असतो त्याप्रमाणे आत्मज्योत तेजाने निरंतर तळपत असते."
प्रकरण नऊ
साधनापथावरील पत्रे
माझ्या दिव्य भगवंताच्या चरणकमलांना
अनंत कोटी प्रणाम !स्वामी हे पत्र म्हणजे तरी काय आहे ? पहाटे चार वाजल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी सतत तुमच्याशी बोलत असते. मग आता नवीन सांगण्यासारखं काय आहे ? गेले दोन दिवस माझे मन आनंदाची अनुभूती घेत आहे. रात्रंदिवस मला तुमचे सान्निध्य जाणवत आहे. प्रत्येक कर्म करताना तुम्ही माझ्या समीप असल्याची अनुभूती येत आहे. प्रभू !केवढा हा कृपेचा वर्षाव ! प्रत्येक क्षणी मला तुमचे अस्तित्व जाणवावे, ही माझी इच्छा शेवटी तुम्ही पूर्ण करत आहात. लहान वयापासूनच आंडाळप्रमाणे माझ्या जीवनाचे ध्येय आहेत, असे मला वाटे. जर आंडाळप्रमाणे मी तुमच्यामध्ये सदेह विलीन झाले तर मी तुमची अनुभूती कशी घेऊ शकेन ? जर मी खडीसाखर बनले तर मी त्या गोडीची चव कशी घेऊ शकणार ? म्हणून आता माझे ध्येय आहे चार्लस् पेनं ! त्याच्या प्रमाणेच मलाही प्रत्येक क्षणी तुमची प्रत्यक्ष अनुभूती घ्यायची आहे. मला तुमचे दर्शन, स्पर्शन आणि संभाषण हवे आहे. बाबा, कृपया माझ्यावर करूणा करा, जास्तीत जास्त करूणा करा. स्वामी, तुम्हीच माझे आश्रयस्थान आहेत. माझे रक्षणकर्ते आहेत. शरणम् शरणम्.
तुमची प्रिय बालिका
वसंता
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा