गुरुवार, २७ सप्टेंबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

        " केवळ स्वतःमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी केलेल्या निरंतर प्रयत्नांद्वारे सत्याचा बोध होतो. " 

भाग चौथा 

हृद्गत ......... 

               २००८ मध्ये स्वामींनी पाठवलेल्या संदेशात असे म्हटले आहे, 
               " तुझ्या मुखातून आलेला प्रत्येक शब्द,  अंतर्यामी असणाऱ्या परमात्म्याचा शब्द आहे. या रुपामधून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द जगाला प्रकाशमान करेल. तो प्रेमात्मा आणि मी, प्रेममूर्ती यांच्यामध्ये काहीही भेद नाही. 
               आणि म्हणूनच हे ' मी ' विना ' मी ' चे आत्मचरित्र आहे. पूर्वी प्रलयामुळे जगाचा लय होत असे. आता माझ्या भावपुरच्या आवेगाने कलिचं परिवर्तन होईल. आतापर्यंत तुम्ही तीस वर्षापूर्वीचे माझे भावविश्व पाहिलेत. त्या काळातच माझी ही अवस्था होती, माझ्या प्रेमाचा आवेग एवढा जोरदार होता तर आता माझी ही अवस्था कशी असेल ? हा प्रेमाचा उद्रेक आहे, अश्रूंचा उद्रेक आहे, भावोद्रेक आहे. ज्ञानाचा स्रोत आहे. भाव- उद्रेकाने जग उलटे पालटे होईल. कलियुगाचे सत्ययुगात रूपांतर होईल. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

रविवार, २३ सप्टेंबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

मोती नववा

मन आणि विषय 

तारीख ५ डिसेंबर २००८ 
             मी स्वामींचे पुस्तक, ' मनोनिग्रह करा आणि मनोविजयी व्हा. ' हे पुस्तक उघडले आणि ९ व्या पानावरील खालील ओळी वाचल्या. स्वामी म्हणतात,
            " Even the highly educated do not make any effort to understand this. If you ask them ' what is mind ?' they say,' It does not matter. 
            If you ask, 
            ' What is matter ? ' they say,' Never mind. ' 
            मी यावर चिंतन केले ... 
            मन म्हणजे काय ? 
            विषय म्हणजे काय ?
            मन हृदयापासून वेगळे कसे ? 
            शरीराच्या  डाव्या बाजूस भौतिक हृदय असते. उजव्या बाजूस आध्यात्मिक हृदय असते. इथे परमेश्वर तांदळाच्या दाण्याच्या अग्रावर राहील इतका सूक्ष्म निळ्या प्रकाशरूपात वास करतो. शरीराचे व्यवहार नीट चालण्यासाठी भौतिक हृदय सहाय्यभूत असते. ते रक्त शुद्ध करून संपूर्ण शरीरात खेळवते. आध्यात्मिक हृदय मनाच शुद्धीकरण करून माणसांचा जन्मसिद्ध हक्क ' मुक्ती ' मिळवून देण्यास मदत करते. 
              मनाचे काय ? मन म्हणजे विचारांचे गाठोडे. विचारांचे मूळ कुठे आहे ? ते कुठून येतात ? याची जर मीमांसा तर असा निष्कर्ष निघेल की ' मी ' हेच मनाचे मूळ आहे. हा ' मी ' कोण ? ' मी ' हा नाव आणि रूप दर्शवतो. नाव आणि रूप म्हणजे काय ? त्याचा अर्थ ' देह '. आजही माणूस ' मी देही आहे ' असे म्हणत देह आणि रुपाला पुष्टी देत आहे. 
              आपण मनाचे मूळ शोधले, तसेच आता ' विषय ' बघू या. ' विषय ' म्हणजे काय ? विषयाच मूळ काय ? त्याचा उगम कुठे होतो ? आपण चिंतन करू या. 
             सर्वजण म्हणतात ' मी आणि माझे. ' मी ' हे मनाच मूळ आणि ' माझे ' हे विषयाच मूळ आहे. माणूस म्हणतो, ' माझा नवरा, माझी बायको, माझी संपत्ती, माझा व्यवसाय, माझी गाडी, माझे शहर .. ' अशारितीने तो ' माझे ' ची लांबच लांब साखळी निर्माण करतो. हे ' माझे ' अनेक ' विषय ' जवळ बाळगते, म्हणून मन सतत त्याचा पाठपुरावा करण्यासाठी धावत असत. हे कधी संपेल का ? मनाला जे दिसत हे हव असत. इच्छांचा ' मी ' बनतो. इच्छांचे विचार होतात. मन या अनेक विचारांचे गाठोडेच आहे. 
               हे मन म्हणजे ' मी ' ; ' मी ' देह दर्शवतो. मन सतत त्याला दिसणाऱ्या वस्तू आणि लोकांच्या मागे धावत असत. जन्मोजन्मी ते धावतच राहत. हा न संपणारा प्रवास आहे. 
              मनाच कार्य कस चालत ? आपण एक उदाहरण पाहूया. काल मी जेव्हा ' मन आणि विषय ' याविषयी बोलत होते, मी कान्हाला म्हटले, ' माझ्यासाठी एका शब्दाचा उच्चार करा. ' शब्द होता ' ट्रान्सेन्डेंटल ' त्यांनी तो शब्द उच्चारला आणि मी म्हटले, " काय म्हणालात ... डेंटल ... डेंटल ?" मी ' डेंटल ' म्हटल्याबरोबर निर्मलानी त्यांचा दात दाखवून म्हटले, " काल माझा दात दुखत होता. " मग सर्वजण आपापल्या दातांविषयी बोलायला  लागले. कान्हा म्हणाले , डॉ. लंबोदरान हे आपले डेंटिस्ट आहेत. " मी म्हणाले," त्यांचे वडीलही डेंटिस्ट आहेत."
              याप्रमाणे, डेंटिस्ट आणि दात यावर जणूकाही न संपणार संभाषण सुरु झाले. एका शब्दापासून आमच्या सर्वांच्या मनानी अनेक विचार निर्माण केले. त्यांना आपली दातदुखी आठवली. ' मी कोणत्या डॉक्टरकडे गेले होते, मी काय औषध घेतले, कोणत्या दिवशी ही घटना घडली, कोणत्या वर्षी '. सर्वांना त्यांच्या जीवनात घडलेल्या अनेक गोष्टींना उजाळा द्यायला सुरुवात केली. 
               म्हणूनच मनाला विचारांचे गाठोडे म्हटले आहे. जेव्हा एक शब्द त्याला स्पर्श करतो, त्यातून विचारांचा अखंड प्रवाह चालू होतो, मग त्या विचारांशी संबंधित नावे आणि रूपे मनात उभी राहतात. आपल्याला ती जागा, ती वेळ आठवते .... सर्व अगदी डोळ्यासमोर उभं राहत. अशाप्रकारे मन आणि विषय एकमेकांशी संबंधित आहेत. मन आणि विषय अतूट आहेत. जर ' मी ' नसेल तर विषयही नसेल. सामान्य माणसाचे जीवन ' मी ' वर केंद्रित असते, जिथे मन आणि विषय अलग करणे शक्य नाही. 
                हे दोन्ही वेगळे कसे करता येतील ? मनाला अध्यात्माकडे वळवले तरच हे शक्य आहे.

संदर्भ - वरील लेख श्री वसंत साईंच्या ' सत्ययुग आणि कर्मकायदा ' या पुस्तकातून.

जय साईराम

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
          " आपण केवळ अशा गोष्टींची वाच्यता केली पाहिजे ज्या आपण स्वतःहा आचरणात आणल्या आहेत. " 

भाग चौथा
हृद्गत ......... 

माझ्या लेखनाविषयी .... 

अज्ञानी आणि संकुचित मनाच्या माणसांना माझे लिखाण समजणे शक्य नाही. 
प्रज्ञावंतांना माझ्या विलापाचा गर्भितार्थ ज्ञात होवो. 
वयोवृद्ध ऋषिमुनींनो, माझी अश्रूपूर्ण कथा तुमच्या चरणांशी गाऊ दे. 
फक्त आपल्या दोघांना ही कथा समजली तरी पुरेसे आहे. 
इनाम मिळवण्याकरता किंवा प्रसिद्धीकरता मी लेखन  केले नाही. 
तुम्ही माझ्या लेखनावर एक दयार्द्र दृष्टिक्षेप टाकला तरी पुरेसे आहे. 
कृपा करून या धगधगत्या अग्नीवर पाण्याचा शिडकाव करा. 
माझा वेळ कमी कमी होत चाललाय. 
परमेश्वराचे अविभाज्य अंग बनून जाण्याची ही तृष्णा. 
फक्त तुम्हाला आणि मला समजली तरी पुरेसे आहे. 

*   *   *
उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम

गुरुवार, २० सप्टेंबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" त्याग ही सत्याची गुरुकिल्ली आहे. " 

भाग चौथा 

हृद्गत ......... 
 
               मला कोणतेही कर्मबंधन नाही.
               स्वामी तुम्ही म्हणालात, " पूर्ण श्रद्धेचे सामर्थ्य एवढे महान असते की ते कर्माच्या सर्व मर्यादा ओलांडू शकते. त्याच्यामध्ये परमेश्वराला सुवर्ण बेड्यांनी बांधून ठेवण्याची शक्ती असते. त्याला भक्तापुढे नमणे भाग पडते आणि तो त्याच्या इच्छा, मागण्या पुऱ्या करण्याचे कबूल करतो." 
              १०० % श्रद्धा म्हणजे तुम्हाला दुःख व क्लेश होणार नाही, याची परमेश्वर काळजी घेईल. 
              १०० % निष्ठा म्हणजे परमेश्वर तुम्हाला कधीही निराश करणार नाही. 
              १०० % श्रद्धा + १०० % निष्ठा म्हणजे १०० % भक्ती. 
              पराभक्ती हे भक्तीचे सर्वोच्च रूप आहे, जेथे परमेश्वर सुवर्णबंधनामध्ये बांधलेला असतो. इथे भक्त परमशांती आणि सस्मित स्वातंत्र्य ह्या अवस्थेत असतो. प्रत्येक भक्ताने ही स्थिती प्राप्त करण्याचे ध्येय ठेवले पाहिजे. मी ही अवस्था प्राप्त केली आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

रविवार, १६ सप्टेंबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" देहभाव गळून पडल्यावर सत्याचा साक्षात्कार होतो." 

भाग चौथा 

हृद्गत ......... 

               गतजन्मात केलेल्या कर्मफलांच्या गोण्या म्हणजे संचित कर्म. स्वामी म्हणाले, " तुला कोणतेही संचितकर्म लागू नाही. परमेश्वराच्या विशेष कृपेने आणि परमकरुणेने कर्मकायद्यात हस्तक्षेप करून पूर्वकर्मांचा संपूर्ण संहार केला आहे. "
              आगाम्य कर्म म्हणजे भविष्यकालातील जन्मामध्ये केली जाणारी कर्मे. स्वामी म्हणाले, " तुला यानंतर पुन्हा जन्म नाही. तुला पुन्हा जन्म नाही याची खात्री बाळग." 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, १३ सप्टेंबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

        " मनाची जडणघडण अशी करायला हवी की त्याला कोणीही अथवा कोणतीही गोष्ट स्पर्श करणार नाही ." 

भाग चौथा 

हृद्गत ......... 

              ..... लहान मुलांमध्ये भक्तीभाव सहज जागृत होतो. मोठ्यांसाठी मात्र हे सहजसुलभ नसून कष्टसध्य आहे. 
               ... प्रारब्ध, संचित आणि आगाम्य... मी या कर्मापासून मुक्त आहे. 
               प्रारब्ध म्हणजे या जन्मात केलेल्या कर्माचे फल, स्वामींना मी एक पत्र लिहिले होते त्यात मी म्हटले आहे.
             " कळत नकळत मी या जन्मामध्ये अनेक चुका केल्या आहेत. तुम्ही माझा मीरा म्हणून स्विकार कसा केला ? मी जर तुमची मीरा असेन, तर मला तुम्ही कान्हा आणि मीरा यांच्याबद्दल काहीतरी सांगा ना." २९ ऑगस्ट १९९४ रोजी कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने दिलेल्या संदेशात स्वामी मीरेविषयी बोलले. त्यांनतर मी स्वामींना २३ नोव्हेंबर १९९४ रोजी दुसरे पत्र लिहिले.  त्यामध्ये मी त्यांना विचारले, " मीराचे लग्न कान्हाशी झाले का राणाशी ?" नोव्हेंबरमध्ये मला मिळालेल्या ' सनातन सारथी ' मध्ये स्वामींनी याचे उत्तर दिले. ते म्हणाले," भौतिक स्तरावर राणा हा मीरेचा पती आहे." परंतु कृष्ण मीरेचा खरा पती आहे." स्वामींनी हे उत्तर देऊन सिद्ध केले की त्यांनी माझा पूर्ण स्वीकार केला आहे व मला प्रारब्ध कर्म नाही. स्वामींच्या करुणेने माझी सर्व कर्मे माफ झाली. धुतली गेली. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम

रविवार, ९ सप्टेंबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

              " अनंत अवकाशाला कोण मर्यादा घालणार ? अमर्याद महासागराला कोण बंधन घालणार ? त्याचप्रमाणे सर्वव्यापी प्रेमाला कोणत्याही मर्यादा व बंधने नाहीत." 

भाग चौथा 

हृद्गत ......... 

                ... तुझ्या दिव्य चरणांवर समर्पित करण्यासाठी हे एक आयुष्य पुरेसे नाही. माझा देह शुद्ध करून तसेच माझ्या प्रत्येक पेशीचं हृदय बनवून मी तुम्हाला अर्पण नको करू का ? प्रभू, तुम्हाला माझं प्रेम कळत नाही का ? मी तुम्हाला माझे सर्वस्व अर्पण केले असताना तुम्हाला अजून माझ्याकडून काय हवे आहे, की ज्याकरता तुम्ही मला एवढे दुःख भोगायला लावत आहात ? साई, माझ्यावर कृपा करा आणि मला तुमचे दर्शन द्या. तुम्हाला पाहताच मी तिथल्या तिथे विरघळून जाईन अशी तुम्हाला भीती वाटते का ? नाही. नाही तसं काही होणार नाही, मी होऊही देणार नाही. माझे प्राण आणि देह मला सोडून गेले तर मी त्या परमानंदाची अनुभूती कशी घेणार ? हे प्रभू, दिव्यानंदाच्या स्रोता ! तुझ्या अमृत महासागरात आकंठ बुडून जाऊन आनंद लुटण्यासाठी माझा देह आणि प्राण एकत्र असायला नकोत का ? 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम

गुरुवार, ६ सप्टेंबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाई नमः 

सुविचार

          " जर आपण रात्रंदिवस आपले भाव परमेश्वराला अर्पण केले तर ते २४ तास परमेश्वराच्या पूजेसमान ठरेल. " 

भाग चौथा

हृद्गत ......... 

             रंजले गांजलेले, अश्रू ढाळणारे, सांत्वनपर बोलणारे, प्रेमाने पत्र लिहिणारे, करुणदृष्टी असणारे या सर्वांना मी माझे जीवन समर्पित करू इच्छिते. मला तुम्ही वेडी म्हणा किंवा काही, परंतु यांच्यासाठी माझे जीवन समर्पित करावे असे मला वाटते. कान्हा तू माझ्याहून अधिक वेडा असला पाहिजेस, अस दिसतंय. मी यांत्रिकपणे तुझे नाम घेते त्यामध्ये खरा भावही नसतो. माझ्याकडून ते अंतःकरणपूर्वक घेतले जात नाही. तरीही तू मला तुझे जीवन दिलेस. माझे विचार तुझ्याकडे वळेपर्यंत तू प्रतिक्षा करतोस. तू माझ्या हाकेसाठी तळमळतोस. माझ्या हाकेसरशी धावत येतोस आणि मला सत्संग देतोस. तू माझ्या सर्व समस्या सोडवतोस आणि मला मुक्त करतोस. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

रविवार, २ सप्टेंबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" दिखाऊ कर्मकांडापेक्षा अंतर्भक्ती अधिक परिणामकारक आहे. "

भाग चौथा 

हृद्गत ......... 

             .... नवजात बालकाचा चेहरा सुंदर असतो. जर वाढत्या वयानुसार बालकातील गुणांनुसार त्याचा चेहरा बदलत गेला तर कसं होईल ? एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेल्या मुलांचे चेहरे वेगवेगळे असतील. एका मुलाचा चेहरा मनुष्याचा असेल, तर दुसऱ्याचा वाघाचा आणि तिसऱ्याचा कोल्ह्याचा असे झाल्यास जिकडे पहाल तिकडे वाघ, अस्वल, कोल्हा, गाढव, माकड, चित्ता, डुक्कर, साप यांचेच चेहरे दिसतील. मनुष्याचा चेहरा क्वचितच दिसेल. सुरुवातीला मनुष्याला हे चेहरे दाखवण्यास थोडी शरम वाटेल; परंतु हळूहळू तो सरावेल आणि त्यानंतर तो मनुष्याच्या, संतमहात्म्यांच्या चेहऱ्याकडे एखादा विचित्र प्राणी पाहिल्यासारखा पाहील. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम