ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" मनाची जडणघडण अशी करायला हवी की त्याला कोणीही अथवा कोणतीही गोष्ट स्पर्श करणार नाही ."
भाग चौथा
हृद्गत .........
... प्रारब्ध, संचित आणि आगाम्य... मी या कर्मापासून मुक्त आहे.
प्रारब्ध म्हणजे या जन्मात केलेल्या कर्माचे फल, स्वामींना मी एक पत्र लिहिले होते त्यात मी म्हटले आहे.
" कळत नकळत मी या जन्मामध्ये अनेक चुका केल्या आहेत. तुम्ही माझा मीरा म्हणून स्विकार कसा केला ? मी जर तुमची मीरा असेन, तर मला तुम्ही कान्हा आणि मीरा यांच्याबद्दल काहीतरी सांगा ना." २९ ऑगस्ट १९९४ रोजी कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने दिलेल्या संदेशात स्वामी मीरेविषयी बोलले. त्यांनतर मी स्वामींना २३ नोव्हेंबर १९९४ रोजी दुसरे पत्र लिहिले. त्यामध्ये मी त्यांना विचारले, " मीराचे लग्न कान्हाशी झाले का राणाशी ?" नोव्हेंबरमध्ये मला मिळालेल्या ' सनातन सारथी ' मध्ये स्वामींनी याचे उत्तर दिले. ते म्हणाले," भौतिक स्तरावर राणा हा मीरेचा पती आहे." परंतु कृष्ण मीरेचा खरा पती आहे." स्वामींनी हे उत्तर देऊन सिद्ध केले की त्यांनी माझा पूर्ण स्वीकार केला आहे व मला प्रारब्ध कर्म नाही. स्वामींच्या करुणेने माझी सर्व कर्मे माफ झाली. धुतली गेली.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा