ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
मोती नववा
मन आणि विषय
मी स्वामींचे पुस्तक, ' मनोनिग्रह करा आणि मनोविजयी व्हा. ' हे पुस्तक उघडले आणि ९ व्या पानावरील खालील ओळी वाचल्या. स्वामी म्हणतात,
" Even the highly educated do not make any effort to understand this. If you ask them ' what is mind ?' they say,' It does not matter.
If you ask,
' What is matter ? ' they say,' Never mind. '
मी यावर चिंतन केले ...
मन म्हणजे काय ?
विषय म्हणजे काय ?
मन हृदयापासून वेगळे कसे ?
शरीराच्या डाव्या बाजूस भौतिक हृदय असते. उजव्या बाजूस आध्यात्मिक हृदय असते. इथे परमेश्वर तांदळाच्या दाण्याच्या अग्रावर राहील इतका सूक्ष्म निळ्या प्रकाशरूपात वास करतो. शरीराचे व्यवहार नीट चालण्यासाठी भौतिक हृदय सहाय्यभूत असते. ते रक्त शुद्ध करून संपूर्ण शरीरात खेळवते. आध्यात्मिक हृदय मनाच शुद्धीकरण करून माणसांचा जन्मसिद्ध हक्क ' मुक्ती ' मिळवून देण्यास मदत करते.
मनाचे काय ? मन म्हणजे विचारांचे गाठोडे. विचारांचे मूळ कुठे आहे ? ते कुठून येतात ? याची जर मीमांसा तर असा निष्कर्ष निघेल की ' मी ' हेच मनाचे मूळ आहे. हा ' मी ' कोण ? ' मी ' हा नाव आणि रूप दर्शवतो. नाव आणि रूप म्हणजे काय ? त्याचा अर्थ ' देह '. आजही माणूस ' मी देही आहे ' असे म्हणत देह आणि रुपाला पुष्टी देत आहे.
आपण मनाचे मूळ शोधले, तसेच आता ' विषय ' बघू या. ' विषय ' म्हणजे काय ? विषयाच मूळ काय ? त्याचा उगम कुठे होतो ? आपण चिंतन करू या.
सर्वजण म्हणतात ' मी आणि माझे. ' मी ' हे मनाच मूळ आणि ' माझे ' हे विषयाच मूळ आहे. माणूस म्हणतो, ' माझा नवरा, माझी बायको, माझी संपत्ती, माझा व्यवसाय, माझी गाडी, माझे शहर .. ' अशारितीने तो ' माझे ' ची लांबच लांब साखळी निर्माण करतो. हे ' माझे ' अनेक ' विषय ' जवळ बाळगते, म्हणून मन सतत त्याचा पाठपुरावा करण्यासाठी धावत असत. हे कधी संपेल का ? मनाला जे दिसत हे हव असत. इच्छांचा ' मी ' बनतो. इच्छांचे विचार होतात. मन या अनेक विचारांचे गाठोडेच आहे.
हे मन म्हणजे ' मी ' ; ' मी ' देह दर्शवतो. मन सतत त्याला दिसणाऱ्या वस्तू आणि लोकांच्या मागे धावत असत. जन्मोजन्मी ते धावतच राहत. हा न संपणारा प्रवास आहे.
मनाच कार्य कस चालत ? आपण एक उदाहरण पाहूया. काल मी जेव्हा ' मन आणि विषय ' याविषयी बोलत होते, मी कान्हाला म्हटले, ' माझ्यासाठी एका शब्दाचा उच्चार करा. ' शब्द होता ' ट्रान्सेन्डेंटल ' त्यांनी तो शब्द उच्चारला आणि मी म्हटले, " काय म्हणालात ... डेंटल ... डेंटल ?" मी ' डेंटल ' म्हटल्याबरोबर निर्मलानी त्यांचा दात दाखवून म्हटले, " काल माझा दात दुखत होता. " मग सर्वजण आपापल्या दातांविषयी बोलायला लागले. कान्हा म्हणाले , डॉ. लंबोदरान हे आपले डेंटिस्ट आहेत. " मी म्हणाले," त्यांचे वडीलही डेंटिस्ट आहेत."
याप्रमाणे, डेंटिस्ट आणि दात यावर जणूकाही न संपणार संभाषण सुरु झाले. एका शब्दापासून आमच्या सर्वांच्या मनानी अनेक विचार निर्माण केले. त्यांना आपली दातदुखी आठवली. ' मी कोणत्या डॉक्टरकडे गेले होते, मी काय औषध घेतले, कोणत्या दिवशी ही घटना घडली, कोणत्या वर्षी '. सर्वांना त्यांच्या जीवनात घडलेल्या अनेक गोष्टींना उजाळा द्यायला सुरुवात केली.
म्हणूनच मनाला विचारांचे गाठोडे म्हटले आहे. जेव्हा एक शब्द त्याला स्पर्श करतो, त्यातून विचारांचा अखंड प्रवाह चालू होतो, मग त्या विचारांशी संबंधित नावे आणि रूपे मनात उभी राहतात. आपल्याला ती जागा, ती वेळ आठवते .... सर्व अगदी डोळ्यासमोर उभं राहत. अशाप्रकारे मन आणि विषय एकमेकांशी संबंधित आहेत. मन आणि विषय अतूट आहेत. जर ' मी ' नसेल तर विषयही नसेल. सामान्य माणसाचे जीवन ' मी ' वर केंद्रित असते, जिथे मन आणि विषय अलग करणे शक्य नाही.
हे दोन्ही वेगळे कसे करता येतील ? मनाला अध्यात्माकडे वळवले तरच हे शक्य आहे.
संदर्भ - वरील लेख श्री वसंत साईंच्या ' सत्ययुग आणि कर्मकायदा ' या पुस्तकातून.
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा