रविवार, २७ सप्टेंबर, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

        " केवळ साधना आणि परिवर्तन याद्वारे परमेश्वर प्राप्ती होते. "

भाग - नववा 

आत्मगीते 

कमी होणार नाही का आपल्यातील अंतर ?

काल पुढे सारतो आहे 

सर्व काही संपत आहे 

हे प्रभू, कृपावर्षाव कर मजवर 

तुझे दिव्य चरण, माझा एकमेव आश्रय 

घट्ट धरून ठेविले मी त्यास 

*

हे साईशा ! अपशब्द मी उच्चारिता

क्षमा कर तू मला 

तुझ्या दिव्या महिम्याचे गुणगान मी करी 

जणू काजवा करी सूर्याची बरोबरी 

अरेरे ! हा गर्व तर नव्हे माझा ?

*

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२०

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुवीचार 

         " साधनेच्या मार्गद्वारे साधक अध्यात्मातील ऊंच ऊंच शिखरे पादाक्रांत करतो. "

भाग - नववा 

आत्मगीते 

परमधामही नको मज 

हवेत केवळ तुझे चरण 

शांतीचा शोध अन्यत्र का घेती जन ?

पर्तीतल्या गवताच्या पात्याचेही भाग्य थोर !

*

आस लागली जीवास तव अनुभूतीची 

विनविते तुज, न करी अव्हेर 

अप्राप्य असेल जर तव सामीप्य 

तर अमान्य आहे मज वेदांचे सत्य 

*

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम    

बुधवार, २३ सप्टेंबर, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

पुष्प - ३३

पूर्ण अवतार 

          दशावतारांचा एक अवतार म्हणजे पूर्ण अवतार होय. श्री सत्यसाई बाबा पूर्ण अवतार आहेत. ह्या एका अवतारकार्यामध्ये प्रत्येक अवतारातील कार्यांचा समावेश आहे. हे कलियुग अत्यंत वाईट आहे. ह्यामध्ये प्रेमाचा अभाव आहे. हा अवतार प्रेमावर अधिष्ठित नूतन विश्वाची निर्मिती करण्यासाठी भूतलावर आला आहे. 

१ ऑगस्ट २००९ ध्यान 

वसंता - स्वामी, मला आता हे सहन करणे अशक्य झाले आहे. तुमच्याशिवाय माझे मन कशालाही स्पर्श करत नाही. तुम्ही मला कधी बोलावणार ?

स्वामी - रडू नकोस, लवकरच आपण एकमेकांना भेटू. मी नक्की तुला बोलावेन. 

         स्वामी आणि मी स्वर्गात गेलो. अनेक देवदेवता, ऋषीमुनी तेथे आले अगस्त्य ऋषी म्हणाले, " हे सर्व अवतारकार्यासाठी घडत आहे. सर्वांनी आपापल्या तपोबलाचा एक भाग ह्यासाठी दिला आहे. काळजी करू नका सर्व ठीक होईल. "

          आता आपण स्वामी काय म्हणाले हे तपशील्वारपणे पाहू या. स्वामी म्हणाले सर्व देव देवता, ऋषी, चिरंजीवी आणि अन्य जगतातून आलेले सर्व ह्यांनी वैश्विक कर्मांसाठी त्याच्या तपोबलाचा एक भाग दिला आहे. वैश्विक कर्मांचा संहार हे प्रचंड महान कार्य आहे. इतर अवतारातील कार्यांसारखे नाही. 

          कोणीही कर्मकायद्याचे उल्लंघन करू शकत नाही . तथापि सर्वांच्या कर्माचा संहार व्हायलाच हवा. मग हे कार्य पूर्ण कसे होणार ? केवळ प्रत्येकाच्या कर्मांचा समतोल राखूनच हे कार्य करणे शक्य होईल. ह्या कार्याच्या पूर्णत्वासाठी चौदा भुवनांमध्ये वास करणाऱ्या प्रत्येकाने आपापल्या तपोबलाचा एक भाग देऊ केला आहे. हा सर्वांचा एक संयुक्त प्रयास आहे.

          ७० वर्षांच्या वियोगामुळे परमेश्वर आणि त्याच्या शक्तीला शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. देव, ऋषी व अन्य लोकांमधील रहिवास्यांनी कर्मांच्या तराजूचा समतोल राखण्यासाठी त्यांच्या तपोबलाची शक्ती दिली. विरहाच्या वेदनांनी मी विलाप करत असल्यामुळे, ऋषींनी येऊन माझे सांत्वन केले. हजारो वर्षांपूर्वी हा संकल्प करण्यात आला होता त्यामुळे ऋषिंनी माझ्या आणि स्वामींच्या नाडीमध्ये हे लिहून ठेवले आहे. मी स्वामींना ह्या विषयी विचारल्यावर ते म्हणाले, " अनेक वर्षांपूर्वी हा संकल्प केला होता. म्हणून तो नाडीग्रंथांमध्ये लिहिला आहे. हे महत्कार्य असल्यामुळे, हे ह्याच पद्धतीने घडले पाहिजे."

          अनेक चतुर्युग लोटली. तथापि आताचे कलियुग ह्यासाठी योग्य काल आहे . गत युगामध्ये वृत्रासुराचा वध करण्यासाठी दधिची ऋषींनी प्राणार्पण केले. त्यानंतर इंद्राने त्यांच्या मेरुदंडापासून असुरांचा वध करण्यासाठी वज्रास्त्र बनवले. ही वेगळी वेगळी कथा आहे. जगातील कोट्यवधी लोकांच्या कर्मांचा संहार करणे ही काही सोपी गोष्ट नव्हे. हे अवतारिक कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी १४ भुवनातील लोकांनी त्यांचे एक भाग तपोबल दिले. 

          १० वर्षांपूर्वी ऋषिंनी स्वामींच्या आणि माझ्या नात्याचे अंशतः वर्णन केले होते. त्यांनी मुक्ती निलयमविषयीही लिहिले होते. आता १० वर्षांनंतर अधिक उघड करत आहेत. स्वामींच्या नाडीमध्ये हे स्पष्ट लिहिले आहे की स्वामी आणि मी आम्ही जगात् पिता व जगत् माता आहोत. ह्या पालकांच्या वियोगामुळे जगातील सर्वजण दुःख भोगत आहेत. त्यांचा योग झाल्यावर जगामधील दुःखांचा अंत होईल. तथापि आम्हा दोघांची भेट होण्यामध्ये वैश्विक कर्मांचा अडथळा येत आहे. परिणामतः देवांना व ऋषींना आपले तपोबल द्यावे लागले. स्वामींचे अवतार कार्य यशस्वी होण्यासाठी आपण एकजूट व्हायला हवे हे त्यांना माहित आहे. अज्ञानामुळे जगातील लोकांनी आम्हाला विलग केले. आता देव, ऋषी व १४ भुवनांमध्ये वास करणाऱ्यांनी, स्वामी आणि मी, आम्हा दोघांची भेट होऊन वैश्विक कर्मांचा संहार करण्यासाठी एक मार्ग शोधून काढला आहे. 

. . . . . 

संदर्भ - श्री वसंतसाईंच्या ' SatyaSai Baba - 10  Avtaras in 1 ' ह्या पुस्तकातून. 


जय साईराम  

रविवार, २० सप्टेंबर, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" केवळ प्रेमानेच सत्याची प्राप्ती होते ."

भाग - नववा 

आत्मगीते 

कामना नसे मज धनसंपदेची 

वा माझे आज्ञापालन करणाऱ्या दरबाराची 

पर्तीच्या पवित्र भूमीवर 

परमेशाच्या दयेने एकत्र जमती सारे 

या पवित्र भूतलावरील महात्म्यांच्या घोळक्यात 

सामील व्हायचे मला हे साईश्वरा !

जर मी तुमच्या महालातील भिंत असते... 

तर स्वर्गीय आनंद पाहण्याचे भाग्य मला लाभते 

*

माझ्याकडे माझे असे काहीच नाही 

माझे सारे काही तूच आहेस 

हे माझ्या पर्तीश्वरा 

इथे आहेच काय ?

तुझ्या सुवासिक दिव्य चरणांशिवाय 

*

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२०

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

    " प्रत्येकाला वैयक्तिक आकलनानुसार सत्याचे प्रकटीकरण होते."

भाग - नववा 

आत्मगीते 

वाल्मिकींनी दर्शवला अध्यात्ममार्ग 

हा मार्ग दुर्गम, दुर्धर 

या अध्यात्ममार्गावर 

वाटचाल करिते मी आनंदगीत गात 

ना मायेचा अंधःकार 

ना भय द्वंद्व कर्मांचे 

ना कृष्णमेघ संभ्रमाचे 

ऐका मधुर संगीत भक्तीचे 


ही सत्याची पहाट 

चैतन्याचा बहर 

जिकडे पाहावे तिकडे 

परमशांती दिव्यत्वात 


कोमल पुष्पांच्या ताटव्यावर 

भूषवितो साई झुल्यास 

हलकेच झुलवी त्या राजराजेश्वरास 

वाऱ्याची मंद मंद झुळुक 


पवित्र व्रजभूमीवर 

दयाघन साईंच्या चरणी 

लाभला स्पर्श दिव्य आनंदाचा 

हृदय अनुभवे स्वर्गीय शांती 


हे विश्व विना सूर्यचंद्रांचे 

हे विश्व साईंचे 

दिव्यानंदात मग्न विश्व 

हे साईंचे विश्व 

*

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

सोमवार, १४ सप्टेंबर, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

       " जेव्हा समस्वभावी लोक एकाच ध्येयासाठी प्रार्थना करतात तेव्हा त्यांचे ध्येय साध्य होते. "

भाग - नववा 

आत्मगीते 

माझ्या अश्रुंच्या महापुराने वेढिले त्यांचे चरण 

परि ते न देती प्रतिसाद माझ्या व्याकुळ आर्जवास 

त्यांचे प्रेम माझे रूप 

त्यांचे नाम माझा श्वास 

त्यांचे विचार माझे हृदय 

आहे का काही फरक आम्हा दोघांत ?

*

वियोगात ढाळीते मी दुःखाश्रू 

आणि संयोगात आनंदाश्रू 

अस्वस्थ अश्रू, तृषार्त अश्रू 

आनंदाश्रू , दुःखाश्रू 

हे मायामाधव, केवळ तुझ्यामुळेच 

वाहती माझ्या नेत्रातून गंगा अन कावेरी 

*

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

गुरुवार, १० सप्टेंबर, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

       " प्रत्येक गोष्टीकडे आपण ईश्वरलिला या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. हे विश्व म्हणजे त्या सर्वश्रेष्ठ परमेश्वराचे नाट्य आहे. " 

भाग - नववा 

आत्मगीते 

साईनाम घेता 

पापे पळती दाही दिशा 

हे तुझेच बोल असती 

इतुका समीप असोनी तू 

वंचित का मी तव दर्शनास 

टिपकागदावरील डागासम 

हे कर्म तर नव्हे माझे ?

थकले रे साई, या असत्य जगतात 

कृपा करोनी मजवर रक्ष रक्ष साईश्वर !

*

प्रिय मधुर प्रभुदेवा,

अंतरात माझ्या अक्षय झरा 

तुझ्या निदिध्यासाचा 

वेढिले हृदयास माझ्या 

अक्षय झऱ्याने त्या 

नयनातील अश्रुधारा 

जणु ओघवती कावेरी 

अश्रू ओघ हा दूर सारीतो विचारचक्रास 

त्या प्रक्षुब्ध ओघात केवळ निःशब्द विरह वेदना 

अन् उभयांतातील अनुल्लंघनीय अंतर 


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

रविवार, ६ सप्टेंबर, २०२०

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

        " प्रथम साधना करून आपण मोक्ष प्राप्त केला पाहिजे आणि नंतर स्वतःला संपूर्णपणे समर्पित केले पाहिजे ."

भाग - नववा 

आत्मगीते 

चातकापरि वाट पाहते मी साई 

तुझ्या करुणावर्षावाची 

आश्रय दे मज तव चरणांशी 

अपराध घाल पोटात, हे साई माते !

तोडून टाक सारे बंध माझे 

माझी आर्जवे का ऐकू न येती तुज ?

विसरलास का तू तुझे वचन ?

*

सगेसोयरे, सखेसोबती 

अर्जित धनसंपदा 

सोडतील संगत आपुली एके दिनी 

करा निरंतर नामस्मरण 

जीवनपथावर पावलोपावली 

तोच आपुला संगती 

*

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" आपण इथेच, याक्षणी मुक्ती प्राप्त करू शकतो." 

भाग - नववा 

आत्मगीते 


वायुची तुलना त्यांच्या पदन्यासाशी 

मधुकोषमय सुमने जणू त्यांचा सुगंधजी 

गिरीपर्वत दर्शविती त्यांचे सामर्थ्य 

शीतल चंद्रमा, त्यांचे मुखमंडल 

पर्जन्यधारा त्यांची कृपावृष्टी 

ऋतु वसंत त्यांचा आनंद 

मधाळ वाणी त्यांची दीनांचा आहार 

छत्रछाया त्यांची विश्रामवाटिका 

मरुभूमीत उपजे हिरवाई त्यांच्या करुणेने 

चंदेरी घंटानाद त्यांची रसाळ वाणी 

वेद त्यांच्या पाऊलखुणा 

जीवनातून चराचरात प्रकटे 

अस्तित्व अंतर्यामीचे ! 

*

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम