गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२०

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

    " प्रत्येकाला वैयक्तिक आकलनानुसार सत्याचे प्रकटीकरण होते."

भाग - नववा 

आत्मगीते 

वाल्मिकींनी दर्शवला अध्यात्ममार्ग 

हा मार्ग दुर्गम, दुर्धर 

या अध्यात्ममार्गावर 

वाटचाल करिते मी आनंदगीत गात 

ना मायेचा अंधःकार 

ना भय द्वंद्व कर्मांचे 

ना कृष्णमेघ संभ्रमाचे 

ऐका मधुर संगीत भक्तीचे 


ही सत्याची पहाट 

चैतन्याचा बहर 

जिकडे पाहावे तिकडे 

परमशांती दिव्यत्वात 


कोमल पुष्पांच्या ताटव्यावर 

भूषवितो साई झुल्यास 

हलकेच झुलवी त्या राजराजेश्वरास 

वाऱ्याची मंद मंद झुळुक 


पवित्र व्रजभूमीवर 

दयाघन साईंच्या चरणी 

लाभला स्पर्श दिव्य आनंदाचा 

हृदय अनुभवे स्वर्गीय शांती 


हे विश्व विना सूर्यचंद्रांचे 

हे विश्व साईंचे 

दिव्यानंदात मग्न विश्व 

हे साईंचे विश्व 

*

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा