बुधवार, २३ सप्टेंबर, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

पुष्प - ३३

पूर्ण अवतार 

          दशावतारांचा एक अवतार म्हणजे पूर्ण अवतार होय. श्री सत्यसाई बाबा पूर्ण अवतार आहेत. ह्या एका अवतारकार्यामध्ये प्रत्येक अवतारातील कार्यांचा समावेश आहे. हे कलियुग अत्यंत वाईट आहे. ह्यामध्ये प्रेमाचा अभाव आहे. हा अवतार प्रेमावर अधिष्ठित नूतन विश्वाची निर्मिती करण्यासाठी भूतलावर आला आहे. 

१ ऑगस्ट २००९ ध्यान 

वसंता - स्वामी, मला आता हे सहन करणे अशक्य झाले आहे. तुमच्याशिवाय माझे मन कशालाही स्पर्श करत नाही. तुम्ही मला कधी बोलावणार ?

स्वामी - रडू नकोस, लवकरच आपण एकमेकांना भेटू. मी नक्की तुला बोलावेन. 

         स्वामी आणि मी स्वर्गात गेलो. अनेक देवदेवता, ऋषीमुनी तेथे आले अगस्त्य ऋषी म्हणाले, " हे सर्व अवतारकार्यासाठी घडत आहे. सर्वांनी आपापल्या तपोबलाचा एक भाग ह्यासाठी दिला आहे. काळजी करू नका सर्व ठीक होईल. "

          आता आपण स्वामी काय म्हणाले हे तपशील्वारपणे पाहू या. स्वामी म्हणाले सर्व देव देवता, ऋषी, चिरंजीवी आणि अन्य जगतातून आलेले सर्व ह्यांनी वैश्विक कर्मांसाठी त्याच्या तपोबलाचा एक भाग दिला आहे. वैश्विक कर्मांचा संहार हे प्रचंड महान कार्य आहे. इतर अवतारातील कार्यांसारखे नाही. 

          कोणीही कर्मकायद्याचे उल्लंघन करू शकत नाही . तथापि सर्वांच्या कर्माचा संहार व्हायलाच हवा. मग हे कार्य पूर्ण कसे होणार ? केवळ प्रत्येकाच्या कर्मांचा समतोल राखूनच हे कार्य करणे शक्य होईल. ह्या कार्याच्या पूर्णत्वासाठी चौदा भुवनांमध्ये वास करणाऱ्या प्रत्येकाने आपापल्या तपोबलाचा एक भाग देऊ केला आहे. हा सर्वांचा एक संयुक्त प्रयास आहे.

          ७० वर्षांच्या वियोगामुळे परमेश्वर आणि त्याच्या शक्तीला शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. देव, ऋषी व अन्य लोकांमधील रहिवास्यांनी कर्मांच्या तराजूचा समतोल राखण्यासाठी त्यांच्या तपोबलाची शक्ती दिली. विरहाच्या वेदनांनी मी विलाप करत असल्यामुळे, ऋषींनी येऊन माझे सांत्वन केले. हजारो वर्षांपूर्वी हा संकल्प करण्यात आला होता त्यामुळे ऋषिंनी माझ्या आणि स्वामींच्या नाडीमध्ये हे लिहून ठेवले आहे. मी स्वामींना ह्या विषयी विचारल्यावर ते म्हणाले, " अनेक वर्षांपूर्वी हा संकल्प केला होता. म्हणून तो नाडीग्रंथांमध्ये लिहिला आहे. हे महत्कार्य असल्यामुळे, हे ह्याच पद्धतीने घडले पाहिजे."

          अनेक चतुर्युग लोटली. तथापि आताचे कलियुग ह्यासाठी योग्य काल आहे . गत युगामध्ये वृत्रासुराचा वध करण्यासाठी दधिची ऋषींनी प्राणार्पण केले. त्यानंतर इंद्राने त्यांच्या मेरुदंडापासून असुरांचा वध करण्यासाठी वज्रास्त्र बनवले. ही वेगळी वेगळी कथा आहे. जगातील कोट्यवधी लोकांच्या कर्मांचा संहार करणे ही काही सोपी गोष्ट नव्हे. हे अवतारिक कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी १४ भुवनातील लोकांनी त्यांचे एक भाग तपोबल दिले. 

          १० वर्षांपूर्वी ऋषिंनी स्वामींच्या आणि माझ्या नात्याचे अंशतः वर्णन केले होते. त्यांनी मुक्ती निलयमविषयीही लिहिले होते. आता १० वर्षांनंतर अधिक उघड करत आहेत. स्वामींच्या नाडीमध्ये हे स्पष्ट लिहिले आहे की स्वामी आणि मी आम्ही जगात् पिता व जगत् माता आहोत. ह्या पालकांच्या वियोगामुळे जगातील सर्वजण दुःख भोगत आहेत. त्यांचा योग झाल्यावर जगामधील दुःखांचा अंत होईल. तथापि आम्हा दोघांची भेट होण्यामध्ये वैश्विक कर्मांचा अडथळा येत आहे. परिणामतः देवांना व ऋषींना आपले तपोबल द्यावे लागले. स्वामींचे अवतार कार्य यशस्वी होण्यासाठी आपण एकजूट व्हायला हवे हे त्यांना माहित आहे. अज्ञानामुळे जगातील लोकांनी आम्हाला विलग केले. आता देव, ऋषी व १४ भुवनांमध्ये वास करणाऱ्यांनी, स्वामी आणि मी, आम्हा दोघांची भेट होऊन वैश्विक कर्मांचा संहार करण्यासाठी एक मार्ग शोधून काढला आहे. 

. . . . . 

संदर्भ - श्री वसंतसाईंच्या ' SatyaSai Baba - 10  Avtaras in 1 ' ह्या पुस्तकातून. 


जय साईराम  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा