रविवार, २९ नोव्हेंबर, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" तो केवळ एकच आहे, तो एकातूनच अनेक झाला आहे. " 

भाग - नववा 

आत्मगीते 

... पाहुनी त्यासी आकाश म्हणे .... 

' नवजन्म घेतो मी प्रत्येक युगात 

परि मानवी कामना मज करिती प्रदूषित 

केवळ आताच ऐकू येई मज ती दिव्य वाणी 

पाहण्या सर्वांसी ' त्याचे ' व्यक्त भाव !

कुंठीत झालो मी त्या युगायुगांच्या ध्वनीने 

दुमदुमल्या दाही दिशा, दिव्य वाणीने अन् स्तुतिगानाने 

न्हाऊन निघालो मी त्यांच्या कृपाप्रसादाने !'

*

अमृत मधुरा ! माझ्या प्रियतमे,

अवतारकथेची आहेस तू प्रस्तावना 

तुझ्या पातिव्रत्याच्या ज्योतीने 

बेचिराख केली कामना. अन्... 

प्रकट केले - सत्य त्रियुग अवताराचे  

*

उर्वरित प्रकरण पुढील भागात 

जय साईराम  

गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

         " विवेक बुद्धी हा आपला आतील आवाज आहे. जेव्हा आपण चूक करतो तेव्हा तो आपल्याला योग्य मार्गदर्शन करतो. हा सत्य आणि सचोटीचा आवाज आहे." 

भाग नववा 

आत्मगीते 

..... पाहुनी त्यासी अग्नी म्हणे ..... 

माझा सहभाग नको का यात ?

करोनी भस्मसात सारे अमंगल 

जपेन त्यांचे प्रेमविश्व दिव्य ज्योतीसम 

कोणाही न दिसोत दोष त्यांच्यात 

सदोष दृष्टीचा साचा नसेल तेथ

बहाल करेन ज्ञानचक्षू सकल जनास 

.... पाहुनी त्यासी जल म्हणे .....

' पूर्वीच्या काळी 

करिती पालन वचनांचे बळीराजासम

शब्दासाठी प्राण त्यागती 

सत्यासाठी सर्वस्व त्यागिले हरिश्चंद्राने 

राज्य, दारा, सूत, त्यागूनी राखण केली स्मशानात 

कालिच्या लोकांकडे पवित्रता नाही शब्दांची 

त्यास्तव दुःख भोगतो मी ' 

मंगल घटिका आली आता 

अपशब्दांनी प्रेमाचा अवमान न व्हावा. 

स्वर्गातून बरसेन मी 

पवित्र गंगेसम 

नद्या, जलौघ, महासागर वाहतील दुथडी भरून 

पावित्र्य परतू दे !

' प्रेम महिमा ' गातील शब्द अन सूर !   


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

सोमवार, २३ नोव्हेंबर, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

पूर्ण अवतार 

पुष्प - ३५ 

१) जर तुम्हाला राग आला असेल तर मौन बाळगा. परमेश्वराच्या कोणत्याही रूपाचे नाम उच्चारण करा. ज्या गोष्टींमुळे तुम्हाला वारंवार राग येतो त्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करा. 

२) ह्या क्षणापासून पुढे सर्व वाईट सवयींचा त्याग करा. त्यास विलंब करू नका वा पुढे ढकलू नका. त्या कधीही तुम्हाला आंनद देणार नाही. 

३) गरीबास दरिद्री नारायण माना ( परमेश्वराला दरिद्री रूपात पाहणे. ) आणि त्यांना अन्नदान करा. किमान थोड्या वेळासाठी, तरी त्यांना आनंदी बनवा. 

४) इतरांनी तुम्हाला कसे वागवावे ह्या अपेक्षेनुसार तुम्ही इतरांना वागवावे. 

५) अज्ञानातून केलेल्या चुका व पापं ह्याबद्दल पश्चाताप होऊ दे. सदैव सन्मार्गाचे अनुसरण करण्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करा त्यातून तुम्हाला धैर्य आणि शक्ती प्राप्त होईल. 

६) वस्तु वा सुखसोयींना तुमच्या जवळ फिरकु देऊ नका अन्यथा त्या तुमच्या परमेश्वराप्रत पोहोचण्याच्या इच्छेचा नाश करतील. 

७) भ्याडपणास अजिबात स्थान देऊ नका सदैव शाश्वत आनंदाच्या स्थितीत राहा. 

८) लोकांच्या स्तुतीसुमनांनी हुरळुन जावू नका. लोकांच्या दूषणांनी दुःखी होऊ नका. 

९) जर तुमच्या दोन मित्रांमध्ये एकमेकांविषयी द्वेष वा भांडणे असतील तर तुम्ही त्याचा मोठा मुद्दा न बनवता तुम्ही प्रेमाने व सहानभूतीने दोघांमधील जुनी मैत्री पुन्हा प्रस्थापित केली पाहिजे. 

१०) इतरांमधील दोष शोधू नका. त्याऐवजी तुमच्या स्वतःमधील दोष शोधा. व त्यांचे समूळ उच्चाटन करा. स्वतःचे परिक्षण करून शोधलेला एक दोष, इतरांमधील शोधलेल्या १०० दोषांहून तुमच्यासाठी हितकारक आहे. 

११) तुम्ही जरी एखादे पवित्र वा सत्कर्म केले नाही तरी चालेल परंतु पाप व दुष्कर्म करू नका. 

१२) इतरांनी तुमच्यामधील दोष दाखवल्यावर राग मानू नका. तुमच्यामधील दोष नाहीसा करण्यासाठी ते सहाय्यकरी ठरते. त्या बदल्यात इतरांमधील दोष शोधणे निरर्थक आहे. जरी तुमच्यामध्ये त्यांनी दाखवलेला तो दोष नसला तरी तुम्ही दुःख मानू नका.  

१३) जर तुमच्याकडे मोकळा वेळ असला तर तो वायफळ गप्पांमध्ये वाया न घालवता ध्यान वा सेवा ह्यामध्ये व्यतीत करा. 

१४) केवळ भक्त परमेश्वरास जाणतो व केवळ परमेश्वर भक्तास जाणतो. अन्य कोणीही जाणणार नाही. म्हणून ज्यांच्या मनात भक्तीभाव नाही त्यांच्याशी परमेश्वराविषयी बोलू नका. अन्यथा अशा लोकांशी बोलल्याने तुमचा भक्तीभाव कमी होऊ शकतो. 

१५) तुम्ही पुण्यकर्म वा सत्कर्म करू शकत नसाल वा करणार नसाल तर कोणतेही पापकर्म वा दुष्कर्म करण्याचा विचार वा कृती करू नका.  

१६) तुम्ही जाणत असलेल्या तुमच्यामधील दोषांविषयी लोकं काहीही बोलले तरी त्यावर भावनिक होऊ नका. त्याऐवजी लोकांनी त्यावर काही बोलण्याअगोदरच तो दोष तुमच्यामधून काढून टाका. तुमचे दोष दाखवणाऱ्या व्यक्तिबद्दल मनामध्ये राग वा कटूता बाळगू नका व प्रत्युत्तर म्हणून त्याचे दोष न दाखवता त्यांच्यापाशी कृतज्ञता व्यक्त करा. त्यांचे दोष काढणे ही तुमची घोडचूक ठरेल. तुमचे दोष तुम्हाला समजणे हे तुमच्यासाठी हितकारक आहे. इतरांचे दोष समजणे हे तुमच्यासाठी चांगले नाही. 

१७) जर कोणी तुमच्याशी एखाद्या विषयासंदर्भात गैरसमजूत करून घेऊन बोलली तर त्याच्या चुकीच्या समजूतीचा विचार करून त्यास पाठींबा देऊ नका. त्याच्या बोलण्यामधील फक्त चांगला अर्थ समजून घ्या. खऱ्या अर्थाची प्रशंसा करणे वांछनीय आहे. परंतु त्याला गैरअर्थ लावणे व त्याचे अनेक अर्थ काढणे हे केवळ आनंदाला बाधा आणणारे आहे . 

१८) जर तुम्हाला मनाची एकाग्रता विकसित करायची असेल तर तुमची नजर, गर्दीमध्ये बाजारामध्ये सर्वत्र भिरभिरू देऊ नका. केवळ तुमच्या पायाखालच्या रास्ता पाहा व कोणाशी धडक (टक्कर) होऊ नये म्हणून आवश्यक तेवढे आजूबाजूस पाहा. अन्य रूपांवर दृष्टीक्षेप टाकू नका. असे केल्याने तुमची एकाग्रता अधिक दृढ होईल. 

१९) गुरु आणि परमेश्वर ह्यांच्याविषयी मनात काही शंकाकुशंका असतील तर त्यांचा त्याग करा. जर तुमच्या भौतिक इच्छांची पूर्ती झाली नसेल तर तुमच्या भक्तीवर दोषारोप करू नका. कारण अशा इच्छा आणि ईश्वरभक्ती ह्यांच्यामध्ये काहीही संबंध नाही. आज न उद्या ह्या भौतिक इच्छांचा त्याग करावाच लागतो. व भक्तीचा कधी ना कधी तरी अंगीकार करावा लागतो. ह्याची पक्की खात्री बाळगा. 

२०) जर तुमची जप व ध्यान ह्यामध्ये योग्य प्रगती होत नसले. वा तुमच्या मनातील इच्छांची पूर्ती होत नसेल. ह्याचे खापर परमेश्वरावर फोडू नका. त्याने तुमचे मनोधैर्य अधिक खचेल व तुम्ही शांती गमावून बसाल. जप व ध्यान करताना नाउमेद होऊ नका. असे भाव मनात आल्यास तुमच्या साधनेत काहीतरी दोष आहे असे मानून त्यामध्ये योग्य ती सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. 

जय साईराम   

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

जन्मदिन संदेश

         " केवळ मौन हीच आत्मज्ञानी मनुष्याची भाषा आहे. मितभाषी होण्याचा सराव करा. ते तुम्हाला अनेक मार्गानी सहाय्य करेल. अविचाराने उच्चारलेल्या शब्दांमधून निर्माण झालेले अनेक गैरसमज व कलह मिटून त्याठिकाणी निःस्वार्थ प्रेम विकसित होईल. जर पाय घसरला व जखम झाली तर ती भरून निघते तथापि जीभ घसरून दुसऱ्याच्या काळजाला झालेली जखम जन्मभर चिघळत राहते. चार मोठ्या चुकांसाठी जिभेला जबाबदार धरले जाते. असत्यकथन, दोषारोपण, इतरांमधील दोष शोधणे व अतिवाचाळता. जर व्यक्तिगत तसेच सामाजिक शांती हवी असेल तर हे सर्व टाळले पाहिजे. जर लोक मितभाषी व मधुरभाषी बनले तर वैश्विक बंधुत्वाचा बंध अधिक बळकट होईल. आध्यात्मिक ग्रंथांमधून साधकांना मौन व्रत घेण्याचा उपदेश केला जातो. तुम्ही सर्वजण ह्या आध्यात्मिक मार्गाच्या विविध टप्प्यांवरील साधक असल्याने तुमच्यासाठीही ही साधना मोलाची आहे."

- बाबा 

२२ जुलै १९५८ च्या दिव्य संदेशातून.


जय साईराम 



 

रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" व्यक्तिगत आवडनिवडीने अंतर्ज्ञानाला झाकोळले आहे."  

भाग - नववा 

आत्मगीते 

...... पाहुनी त्यांसी धरती म्हणे ..... 

त्या दिव्य दंपतीच्या वास्तव्यास, 

त्यांचे विशुद्ध, कोमल प्रेम जपण्यास 

करुनी कायापालट,

मऊशार, मृदु बनेन मी 

..... पाहुनी त्यासी वायू म्हणे ..... 

माझाही सहभाग हवा न यात !

करेन रक्षण त्या प्रेमाचे वादळवारे रोखून 

लय प्रेमाची बिघडून न देईन 

बनेन आसरा, रक्षक होईन. 

कारण स्पर्श करिता, प्रेम होते कलंकित 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

        दिव्यत्व आपला खरा स्वभाव आहे, हे सत्य जाणून, कोणत्याही गोष्टीने संभ्रमित न होणे हे ज्ञानाचे सौंदर्य आहे."

भाग - नववा 

आत्मगीते 

स्वामींनी लिहिलेल्या कविता 

            परमेश्वराचा शोध घेत असता मी एकही क्षण वाया घालवत नाही. माझा प्रत्येक विचार आणि प्रत्येक भाग परमेश्वराशीच निगडित असतो. त्याला प्रतिसाद म्हणून स्वामी आता त्यांचे भाव व्यक्त करत आहेत. या काही कविता स्वामींनी मला ध्यानात सांगितल्या. 

' आपुल्या प्रेमाचा खजिना नाही बंदिस्त, पेटीत दागिन्यांच्या 

खुला ठेवला चौराह्यावर, पडण्या दृष्टीस सकलांच्या !'

" या! या! सकलजन !

पाहा, पाहा अन् जाणून घ्या "..... करीशी तू पाचारण 

ते पाहो वा न पाहो 

दृष्टीस पडे धरतीच्या 

उर्वरित प्रकरण पुढील भागात 

जय साईराम  

रविवार, १५ नोव्हेंबर, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

        " एखाद्याच्या जन्मापासून मृत्युपर्यंत उमटलेले भावच मनावर उमटलेले दीर्घ ठसे असतात ."

भाग - नववा 

आत्मगीते 

कोरस 

सुखाची आस का अंतरी 

वा कांक्षा मनी धनदौलतीची 

अंतर्मुख होऊनी 

करा साधना, करा साधना 

अंतरीचा मार्ग आक्रमा 


तेजोमय होवो अंतर्ज्योत 

दूर करा अज्ञानरात 

त्याग करीता साधनाफलाचा 

मुक्तीताऱ्याचे दर्शन होईल तुम्हा !


कोरस 

सुखाची आस का अंतरी 

वा कांक्षा मनी धनदौलतीची 

अंतर्मुख होऊनी 

करा साधना, करा साधना 

अंतरीचा मार्ग आक्रमा 

*

उर्वरित प्रकरण पुढील भागात 

जय साईराम  

गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२०

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

       " आत्मसाक्षात्कार झालेल्या योग्यांसाठी वेदांचा उपयोग एवढाच असतो जेवढा एखाद्या पाण्यानी तुडुंब भरलेल्या ठिकाणी असलेल्या छोट्याशा सरोवराचा !"

भाग - नववा 

आत्मगीते 

स्तूप गीत - साधना करा 

हे मुढजनांनो, 

शोध घेताय तुम्ही कशाचा ?

या बाह्य मायावी जगतात 

शोध घेताय तुम्ही कशाचा ?


कोरस 

सुखाची आस का अंतरी ?

वा कांक्षा मनी धनदौलतीची ?

अंतर्मुख होऊनी 

करा साधना, करा साधना 

अंतरीचा मार्ग आक्रमक 

हृदयातील तिमिरात 

दिसे एक दिव्य ज्योती 

तोचि अंतरात्मा जाणोनी 

द्या दृढ आलिंगन त्यासी, द्या दृढ आलिंगन त्यासी 


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

रविवार, ८ नोव्हेंबर, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

   " प्रज्ञान म्हणजे अंतर्ज्ञान, हे परमज्ञान आपल्या प्रत्येकामध्ये आहे."

भाग - नववा 

आत्मगीते 

प्रभू, साक्षात् इथे या क्षणी 

प्रभू, साक्षात् इथे या क्षणी 


साई आपुला प्रभू 

आपला प्रभू आहे येथे 

आपुल्या प्रतीक्षेत 

साईराम 


उठा,  जागे व्हा 

प्रभू साक्षात् ठाकला तुमच्या समोर 

मुक्ती प्रत्येक राष्ट्रासी 

मोक्षप्राप्ती प्रत्येक जीवासी 

समस्त विश्वबंधवांनो, 

या, सामील व्हा या सोहळ्यात 

साई आपुला प्रभू 

प्रेम आपुला मार्ग 

मुक्ती आपुला श्वास 

धर्म आपुली कर्म 

ना विचार ना चिंता 

ना बंधन ना बंध 

ना दुःख ना सुख 

उठा ! जागे व्हा !


प्रभू, साक्षात् इथे या क्षणी 

प्रभू, साक्षात् इथे या क्षणी 


सारेच आपुले आप्तजन 

साई आपुला प्रभू 

आपला प्रभू आहे येथे 

आपुल्या प्रतीक्षेत 

साईराम 


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 


गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

        " आत्मा म्हणजे काय ? ते शुद्ध चैतन्य आहे. जो अविनाशी, अजन्मा, अमर आहे."

भाग - नववा 

आत्मगीते 

मुक्ती गीत 

येथे आहे आपला प्रभू 

आपला प्रभू येथे आहे 

आपुल्या प्रतीक्षेत 

साईराम 


उठा, जागे व्हा 

प्रभू साक्षात ठाकला तुमच्या समोर 

मुक्ती प्रत्येक राष्ट्रासी 

मोक्षप्राप्ती प्रत्येक जीवासी 

समस्त विश्वबांधवांनो, 

या, सामील व्हा या सोहळ्यात


मुक्ती आपलं जन्मसिद्ध हक्क 

नका घेऊ माघार 

आपण मुक्त होणार 

आपण मुक्त होणार  


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

रविवार, १ नोव्हेंबर, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

          " सर्वकाही परमेश्वर आहे. प्रत्येक गोष्ट परमेश्वराचेच रूप आहे. तेथे केवळ परमेश्वरच आहे अन्य काही नाही."

भाग - नववा 

आत्मगीते 

आजवर नेहमीच होत आली धर्मसंस्थापना 

हे त्याचेच महान, पुरातन फळ 

परि या फळास लागली कीड 

म्हणून डळमळला राजमार्ग 

द्वापारयुगात केला त्यांनी लहानसा अभिनव प्रयोग 

यशस्वी झाला प्रयोग !

हे तर प्रेमाचे यश !


" दर्शविण्या या प्रयोगाचे विराट स्वरूप 

अवतार घेतो मी एक नूतन 

पुन्हा एकवार कार्य माझे केवळ धर्मसंस्थापनेचे 

परि तिचे कार्य आगळे - वेगळे, विरहवेदना न साहवती तिज 

त्या प्रीत्यर्थ तिने घातला पाया राजमार्गाचा, प्रेमग्राम अन् प्रेम धुळीने 

एक कुशल अभियंता ती !

धर्ममार्ग न खोदता 

घातला तिने प्रेमाचा पाया."

*

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम