ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
जन्मदिन संदेश
" केवळ मौन हीच आत्मज्ञानी मनुष्याची भाषा आहे. मितभाषी होण्याचा सराव करा. ते तुम्हाला अनेक मार्गानी सहाय्य करेल. अविचाराने उच्चारलेल्या शब्दांमधून निर्माण झालेले अनेक गैरसमज व कलह मिटून त्याठिकाणी निःस्वार्थ प्रेम विकसित होईल. जर पाय घसरला व जखम झाली तर ती भरून निघते तथापि जीभ घसरून दुसऱ्याच्या काळजाला झालेली जखम जन्मभर चिघळत राहते. चार मोठ्या चुकांसाठी जिभेला जबाबदार धरले जाते. असत्यकथन, दोषारोपण, इतरांमधील दोष शोधणे व अतिवाचाळता. जर व्यक्तिगत तसेच सामाजिक शांती हवी असेल तर हे सर्व टाळले पाहिजे. जर लोक मितभाषी व मधुरभाषी बनले तर वैश्विक बंधुत्वाचा बंध अधिक बळकट होईल. आध्यात्मिक ग्रंथांमधून साधकांना मौन व्रत घेण्याचा उपदेश केला जातो. तुम्ही सर्वजण ह्या आध्यात्मिक मार्गाच्या विविध टप्प्यांवरील साधक असल्याने तुमच्यासाठीही ही साधना मोलाची आहे."
- बाबा
२२ जुलै १९५८ च्या दिव्य संदेशातून.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा