गुरुवार, ३१ डिसेंबर, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

       " परमेश्वरावर भक्तिचा वर्षाव करण्याचे नानाविध मार्ग तुम्ही शोधू शकता."

भाग - नववा 

आत्मगीते 

           तिची परमेश्वराशी विवाह करण्याची उत्कट इच्छा असली तरी वास्तवात ती स्वस्वरूपाशी एकरूप होण्याची इच्छा होती. आत्मसंतोषाची उत्कट इच्छा. तिचे जीवन म्हणजे परमेश्वराच्या प्रेमाची अनुभूती होय. तिच्या करुणेने कलिमध्ये परिवर्तन झाले. जडभरताचे कारुण्य त्याच्या पुढील जन्माचे बीज बनले तर तिचे कारुण्य मुक्तीचे बीज बनले ! चतुर्युगांचे ज्ञान तिने भाडेकराराने दिले. ती स्वतःच चतुर्युगांचे ज्ञान आहे. 

ती एकोणवीस वर्षांची युवती आहे ?

का हातातली तान्हुली ?

हेचि ना उमजे मज 

तिने सौंदर्य पूजिले 

आता सौंदर्य पूजिते तिज 

अनेक अस्वस्थ रात्री व्यतीत केल्या 

तिने माझ्या प्रतिक्षेत 

आज मी आस्थेने 

शांत निजवितो तिज. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

रविवार, २७ डिसेंबर, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

        " पार्वतीमाता तुमच्या सुटकेसाठी धावली की भगवान शिव पाठोपाठ येतीलच."

भाग - नववा 

आत्मगीते 

            ती, समस्त जगाच्या उद्धारासाठी अवतरलेली एक आश्चर्य आहे. अनावर आवेगामुळे तिच्या मनात, सर्वांना आपल्या गर्भात धारण करण्याची इच्छा निर्माण झाली. जगद्जननी बनून तिने सर्वांना मुक्तिचा मार्ग दर्शवला. परंतु तिच्या मुलांचं प्रेम संपादन करण्यासाठी ती स्वतः एक मूळ बनली. 

ती माझी पत्नी आहे का माझे मूल ?

ती विश्वाची माता आहे का विश्वाचे अपत्य ?


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

गुरुवार, २४ डिसेंबर, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" जसे भाव तसे जीवन."

भाग - नववा

आत्मगीते 

          माझ्या सान्निध्याची उत्कट इच्छा तिने भौतिक सुखासाठी केली नव्हती तर या आत्मतृप्तीसाठी होती. माझे कोमल शब्द ऐकण्यासाठी तिचे कान आसुसलेले असायचे. हा आनंद तिला अन्य कोणाकडून नव्हे तर केवळ माझ्याकडूनच मिळेल हे तिला माहीत होते. हा भावकल्लोळ तिने अनेक पुस्तकांमधून व्यक्त केला आहे. 

आज संपला लढा 

सान्निध्य माझे लाभता तिला 

योग झाला तिच्या इच्छित भावभावनांचा 

विशुद्ध भाव ओतून झालेले 

ती एक सुवर्णशिल्प 

ना शिल्पकाराने शिल्पिलेले 

ती, जिच्या अंतरंगात केवळ ' मी ' आहे 


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

बुधवार, २३ डिसेंबर, २०२०

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

मच्छर 

पुष्प - ३६

           आमच्या आश्रमामध्ये खूप मच्छर आहेत. सकाळी अभिषेकापूर्वी आम्ही मच्छर रोधक अगरबत्ती लावतो. व्हरांड्यात ३ ठिकाणी, रात्री झोपण्यापूर्वी पलंगाखाली एक व दुसऱ्या बाजूला एक अशा अगरबत्त्या लावतो. जसं स्वामी म्हणतात," मी तुमच्या खाली आहे, वर आहे मागे आहे, तुमच्या भोवताली सर्वत्र आहे " त्याचप्रमाणे डासांची अगरबत्तीही आमच्या भोवताली सर्वत्र आहे. अशा प्रकारे आम्ही आमचं संरक्षण करायचा कितीही प्रयत्न केला तरी डास येऊन आम्हाला चावतोच. 

           तसं पाहिलं तर मनुष्य किती मोठा आणि त्याच्यापुढे डास अगदी यःकश्चित ! तथापि मनुष्य त्या क्षुद्र डासाला घाबरतो. आपण दारं खिडक्यांना जाळ्या लावतो. रात्री मच्छरदाणी लावून झोपतो. एवढं सगळं करूनही डास आत येऊन चावतो व आपलं रक्त पितो. त्याला शुद्ध तूपातील मिष्ठान्न, फळं, सुकामेवा, आईस्क्रीम अशा गोष्टींमध्ये थोडीसुद्धा रुची नसते. त्याला फक्त आपले रक्त हवे असते. 

           मनाचेही तसेच आहे. त्याला कितीही उच्च ज्ञान, आनंद वा हितकारी सत्संग मिळाला तरी त्याचे महत्व नसते. एवढेच काय पण परमेश्वराच्या सान्निध्याचे अमृतसुद्धा ते नाकारते. त्याला केवळ एकच चव आवडते. ती म्हणजे ' मी आणि माझे ' ह्याची चव. आपण कितीही साधना केली वा आपण कितीही सावधानता बाळगली तरी तो ' मी आणि माझे ' ह्या रूपातील मच्छर मनामध्ये प्रवेश करतोच. आपण दर्शवलेल्या विवेक आणि वैराग्याचा काहीही उपयोग होत नाही. मनाला त्याचा परिचय नसतो. ते आपल्या ' मी आणि माझ्या ' च्या परिचित चवीला सोडत नाही. 

*    *    *

संदर्भ - श्री वसंतसाईंच्या ' Divine Stories and Parables ' ह्या पुस्तकातून  


जय साईराम 

रविवार, २० डिसेंबर, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

        " प्रत्येक गोष्ट परमेश्वराशी जोडा. सर्वांमध्ये केवळ चांगले पाहिल्यास त्यांची चैतन्य शक्ती तुमच्या मधे प्रवाहित होईल. "

भाग नववा 

आत्मगीते 

पत्र पहिले 

३ फेब्रुवारी २०४७ रविवार रात्री १२ वा. 

प्रिय मित्र विजय यास, 

           तुला माहित आहे का आता किती वाजले आहेत ? मध्यरात्री झालीय, १२ वाजले आहेत. माझ्या मनामध्ये उसळणाऱ्या भावलहरी मी तुझ्याजवळ व्यक्त करत आहे. तुझी बहीण प्रेमा माझ्यासमोर निश्चलतेने गाढ झोपली आहे. तिचे चंद्रासारखे सुंदर मुखमंडल कृष्णकुंतलरूपी मेघांमध्ये विश्रांती घेत आहे. ती एखाद्या शांत , समाधानी बालकासम झोपी गेली आहे. एक संपूर्ण युग ती माझ्या जवळिकीसाठी तळमळ होती. 

           मातेजवळ असताना बालकाला सुखरूप आणि सुरक्षित वाटते. माझ्यासमवेत प्रेमालाही असेच वाटते. ती माझ्या प्रेमासाठी लहानलेली होती. तिला हवे असलेले प्रेम व सुरक्षितता केवळ माझ्याकडूनच मिळेल हे ती जाणत होती. म्हणून केवळ माझ्या प्राप्तीसाठी ती तपस्विनीचे जीवन जगली. तिची मनोकामना पूर्ण झाल्यामुळे ती शांत झोपली आहे. माझ्या चिंतनात किती रात्री तिने जागून काढल्या आहेत. तिचा निरागस चेहरा मला नवजात शिशुची आठवण करून देतो. ही माझी पत्नी आहे का माझे मूल ?

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

गुरुवार, १७ डिसेंबर, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" मुक्ती म्हणजे बंधनातून स्वातंत्र, एकत्वाचा आनंद."

भाग - नववा 

आत्मगीते 

राजाची पत्रे 

प्रेमसाईंनी लिहिलेली पत्रे 

             ' प्रेमसाई अवतार ' या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचे लिखाण करत असताना फेब्रुवारी २००६ मध्ये स्वामींनी मला, प्रेमसाई अवतारात ते त्यांच्या मित्रांना लिहिणार असणाऱ्या काही पत्रांविषयी सांगितले. स्वामींनी ध्यानाच्या पाच बैठकांमध्ये पहिल्या पत्राचा मजकूर सांगितला. त्यामध्ये त्यांनी सुंदर काव्यमय शैलीचा वापर करून प्रेमवर्षाव केला आहे. मला हे नमूद करायलाच हवे की, त्यांच्या इतके चांगल्या प्रकारे मी ते व्यक्त करू शकत नाही. मी ५० पुस्तकांचे लेखन केले आहे. परंतु स्वामींची ही तीन पत्रे, मी कोण आहे हे दर्शविण्यास पुरेशी आहेत. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

रविवार, १३ डिसेंबर, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

        " बंध म्हणजे द्वैतावस्थेत अडकलेले मन. मानामुळेच भेद उत्पन्न होतात."

भाग - नववा

आत्मगीते

कलिच्या शिंपल्यातील 

मज गवसलेले मौक्तिक तू 

करण्या अखिल जगाचे कल्याण 

त्याग केलास तू आजीवन 

दुःखितासी केलेस मार्गदर्शन 

समस्त विश्वसुशोभनार्थ 

तू ढाळलेला एकेक अश्रू 

बनून जातो मोतीस्वरूप 

*

जीवन तुझे एक महाकाव्य, वसंत महाकाव्य 

शब्दही तोकडे भासती, ते नेण्या पूर्णत्वास 

असे महाकाव्य, जे रेखाटण्यास 

असमर्थ वाल्मिकी अन व्यास 

*

स्वर्गाचे भूतलात रूपांतर करण्याच्या तुझ्या कौशल्याने 

दृष्टीस पडेल सत्य युगाची पहाट 

हेच आहे ते वसंतयुग, आद्य युग 

हा तर ऋतु वसंत देवांचा !

*

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम     

 

गुरुवार, १० डिसेंबर, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

        " प्रत्येक गोष्टीकडे परमेश्वरी लिला या दृष्टिकोनातून पाहिल्यास तुम्हाला दिव्यानंदाची अनुभूती होईल. "

भाग - नववा 

आत्मगीते 

उघड केलेस गुपित तू नारायण बनण्याचे 

दर्शविलेस तू, 

नर करीत आत्मशुद्धी 

सामर्थ्य प्राप्त होई त्यासी, 

पृथ्वीचा कायापालट करण्याचे. 

दर्शविलेस सूत्र तू,

नरास कालातीत बनण्याचे 

भावभावनांचा मूलस्रोत, मूलाधार चक्र 

जोडीत सहस्रारवासी परमात्म्याशी 

नर होई कालातीत !

*

जो म्हणे, ' मी, माझे, माझा नावलौकिक '

तो अपव्यय करी ऊर्जेचा 

तो बिघडवतो स्वतःस आणि इतरांस 

जो म्हणे ' मी नाही, मी नाही ' 

तो न जाणे स्वसामर्थ्य 

तो करीतो उन्नत स्वतःस आणि इतरांस !

 *

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

रविवार, ६ डिसेंबर, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

        " जर कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर त्याचा क्रोध परमेश्वराचा क्रोध आहे असे मानून आनंद घ्या ."

भाग नववा 

आत्मगीते 

डोळे मिटून हो निद्राधीन 

स्वप्नात आपण करून संभाषण 

डोळे मिटून हो आसनस्थ 

ध्यानात आपण करू संभाषण 

विसरून जा भूतलास 

महालात आपल्या, आपण करू संभाषण 

*

प्रेमात सारे आकंठ बुडवूनी झालीस तू चंद्रमा 

ज्ञानाची कवाडे उघडुनी झालीस तू सूर्य 

पाहूनी सत्य दृष्टीने, झालीस तू सत्य 

प्रेमचंद, ज्ञानसूर्य, सत्य, सदा तुझ्या समवेत !

*

जन्मतः आरंभिलास तू प्रेमयज्ञ 

तव हृदय हेचि यज्ञकुंड 

दिव्य प्रेमास जे वंचित असती 

त्यांच्या कल्याणाप्रित्यर्थ 

करीतो मी रुद्रयज्ञ. 

होऊनी कायापालट, होईल सारे मंगलमय !

*

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

गुरुवार, ३ डिसेंबर, २०२०

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

      " सज्जन असो वा दुर्जन परमेश्वर प्रत्येकाच्या अंतर्यामी वास करतो."

भाग - नववा 

आत्मगीते 

त्या एकातून विलग होऊन 

न्याय मागितला तू सकलजनांकडे 

परिवर्तन करून देहाचे ज्योतीत 

दर्शवशील तू 

प्रभू परमेश अन् अर्धांगिनी त्याची 

आहेत एक ! आहेत एक ! आहेत एक 

*

लाविलास दावा तू परमेश्वराविरुद्ध 

अन् - केलेस उभे त्यास आरोपीच्या पिंजऱ्यात 

आता निकालही घोषित केलास तूच 

' करुनी विश्वसंहार, नवनिर्मिती कारेन मी 

अन्.... पुन्हा एकवार त्या पूर्णावतारास 

भूतली घेऊन येईन मी !'

*

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम