ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
मच्छर
पुष्प - ३६
आमच्या आश्रमामध्ये खूप मच्छर आहेत. सकाळी अभिषेकापूर्वी आम्ही मच्छर रोधक अगरबत्ती लावतो. व्हरांड्यात ३ ठिकाणी, रात्री झोपण्यापूर्वी पलंगाखाली एक व दुसऱ्या बाजूला एक अशा अगरबत्त्या लावतो. जसं स्वामी म्हणतात," मी तुमच्या खाली आहे, वर आहे मागे आहे, तुमच्या भोवताली सर्वत्र आहे " त्याचप्रमाणे डासांची अगरबत्तीही आमच्या भोवताली सर्वत्र आहे. अशा प्रकारे आम्ही आमचं संरक्षण करायचा कितीही प्रयत्न केला तरी डास येऊन आम्हाला चावतोच.
तसं पाहिलं तर मनुष्य किती मोठा आणि त्याच्यापुढे डास अगदी यःकश्चित ! तथापि मनुष्य त्या क्षुद्र डासाला घाबरतो. आपण दारं खिडक्यांना जाळ्या लावतो. रात्री मच्छरदाणी लावून झोपतो. एवढं सगळं करूनही डास आत येऊन चावतो व आपलं रक्त पितो. त्याला शुद्ध तूपातील मिष्ठान्न, फळं, सुकामेवा, आईस्क्रीम अशा गोष्टींमध्ये थोडीसुद्धा रुची नसते. त्याला फक्त आपले रक्त हवे असते.
मनाचेही तसेच आहे. त्याला कितीही उच्च ज्ञान, आनंद वा हितकारी सत्संग मिळाला तरी त्याचे महत्व नसते. एवढेच काय पण परमेश्वराच्या सान्निध्याचे अमृतसुद्धा ते नाकारते. त्याला केवळ एकच चव आवडते. ती म्हणजे ' मी आणि माझे ' ह्याची चव. आपण कितीही साधना केली वा आपण कितीही सावधानता बाळगली तरी तो ' मी आणि माझे ' ह्या रूपातील मच्छर मनामध्ये प्रवेश करतोच. आपण दर्शवलेल्या विवेक आणि वैराग्याचा काहीही उपयोग होत नाही. मनाला त्याचा परिचय नसतो. ते आपल्या ' मी आणि माझ्या ' च्या परिचित चवीला सोडत नाही.
* * *
संदर्भ - श्री वसंतसाईंच्या ' Divine Stories and Parables ' ह्या पुस्तकातून
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा