गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१
रविवार, २६ सप्टेंबर, २०२१
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" या जगामध्ये आपण केवळ धडे घेण्यासाठी जन्म घेतला आहे."
३
मन आणि विषय
उदाहरणार्थ, जेव्हा मी दरवाजा बघते, तेव्हा तो केवळ दरवाजा म्हणून न पाहता मोक्षाचे द्वार म्हणून पाहते. ' उशी ' ला तामीळमध्ये ' तलै यणै ' असा शब्द आहे; त्याचा अर्थ ' डोक्याच बांध घालण ' असा आहे. पण मी म्हणते, ' हे डोक्याचे बांध घालुन नाही, तर मनात उठणाऱ्या विचारांना बांध घालण होय. ' याप्रमाणे, मी जे पाहते त्याला परमेश्वराशी जोडते. माझे सर्व विचार परमेश्वराकडेच वळलेले आहेत. लहानपणापासून मी माझ्या इंद्रियांना आणि मनाला अशाप्रकारे परमेश्वराशी जोडण्याची सवय लावली. प्रत्येक गोष्टीत इंद्रियांना आणि मनाला अशाचप्रकारे परमेश्वराशी जोडण्याची सवय लावली. प्रत्येक गोष्टीत मी परमेश्वर पाहते. माझ मन फक्त ईश्वराशी योग साधते म्हणूनच माझे सर्व विचार फक्त त्याच्यावरच केंद्रित असतात. माझ्यासाठी 'माझे' असे फक्त परमेश्वरच आहे.
इथे अजून एक उदाहरण देते. मुक्ती निलायममध्ये अनेक मोर फिरत असतात. पण मोर माझ्या दृष्टीस पडले की मला लगेच ' द पीक ऑफ आय इज पीकॉक्स आय ' हा मी लिहिलेला निबंध आठवतो.
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
पुष्प - ४५
आध्यात्मिक माया
एकदा एका गावकऱ्याने साधूला विचारले," तुम्ही मला सांगता की देवावर प्रेम कर, पण हे कसे करावे "? साधूने विचारले ," तू कोणावर सर्वात जास्त प्रेम करतोस? " त्याने सांगितले," मी कोणावरच प्रेम करीत नाही , पण मला माझे कोकरू खूप आवडते." साधू उत्तरले, " मग तू कोकराला देव समज व त्याची पूजा कर." मनाची एकाग्रता खरी महत्वाची. आपले मनच एका गोष्टीवर केंद्रित झाले पाहिजे. आपल्याकडे श्रद्धा व भक्ती असली पाहिजे. मी हे लिहीत असताना मला एका भक्ताचा फोन आला. त्या म्हणाल्या, " दुसऱ्या एका भक्तांच्या घरी माझ्या चित्रावर विभूती साक्षात झाली आणि प्रसादासाठी ठेवलेल्या केळावर ' ओम् ' हे पवित्र अक्षर उमटले. मी तिला सांगितले " हे त्या भक्ताच्या श्रध्देमुळे व विश्वासामुळे झाले ."
अशा कृपाप्रसादाच्या घटना भक्ताची परिपूर्ण श्रद्धा व प्रेम यामुळे घडतात. देवाचे आशीर्वाद अनाकलनीय पद्धतीने व्यक्त होत असतात.
जिथे जिथे मनाची एकाग्रता असेल तिथे यश नक्कीच मिळेल. मग ते कोकरू असले काय वा माणूस असला काय ? ऋषी असले काय की देव असला काय ? तुम्ही केवळ परमेश्वरचरणी, जे शुद्ध व पवित्र सत्य आहे, व जो तुमच्या सर्व प्रार्थना ऐकतो त्याच्या चरणी आश्रय घेणे श्रेयस्कर आहे. परमेश्वरावर मन एकाग्र करा. साधनेद्वारे तुम्ही तुमच्या अंतर्यामी असलेल्या परमेश्वरांस बहिर्यामी करा.
संदर्भ - श्री वसंतसाईंच्या ' चमत्कार माया ' ह्या पुस्तकातून
जय साईराम