ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
पुष्प - ४५
आध्यात्मिक माया
एकदा एका गावकऱ्याने साधूला विचारले," तुम्ही मला सांगता की देवावर प्रेम कर, पण हे कसे करावे "? साधूने विचारले ," तू कोणावर सर्वात जास्त प्रेम करतोस? " त्याने सांगितले," मी कोणावरच प्रेम करीत नाही , पण मला माझे कोकरू खूप आवडते." साधू उत्तरले, " मग तू कोकराला देव समज व त्याची पूजा कर." मनाची एकाग्रता खरी महत्वाची. आपले मनच एका गोष्टीवर केंद्रित झाले पाहिजे. आपल्याकडे श्रद्धा व भक्ती असली पाहिजे. मी हे लिहीत असताना मला एका भक्ताचा फोन आला. त्या म्हणाल्या, " दुसऱ्या एका भक्तांच्या घरी माझ्या चित्रावर विभूती साक्षात झाली आणि प्रसादासाठी ठेवलेल्या केळावर ' ओम् ' हे पवित्र अक्षर उमटले. मी तिला सांगितले " हे त्या भक्ताच्या श्रध्देमुळे व विश्वासामुळे झाले ."
अशा कृपाप्रसादाच्या घटना भक्ताची परिपूर्ण श्रद्धा व प्रेम यामुळे घडतात. देवाचे आशीर्वाद अनाकलनीय पद्धतीने व्यक्त होत असतात.
जिथे जिथे मनाची एकाग्रता असेल तिथे यश नक्कीच मिळेल. मग ते कोकरू असले काय वा माणूस असला काय ? ऋषी असले काय की देव असला काय ? तुम्ही केवळ परमेश्वरचरणी, जे शुद्ध व पवित्र सत्य आहे, व जो तुमच्या सर्व प्रार्थना ऐकतो त्याच्या चरणी आश्रय घेणे श्रेयस्कर आहे. परमेश्वरावर मन एकाग्र करा. साधनेद्वारे तुम्ही तुमच्या अंतर्यामी असलेल्या परमेश्वरांस बहिर्यामी करा.
संदर्भ - श्री वसंतसाईंच्या ' चमत्कार माया ' ह्या पुस्तकातून
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा