ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" परमेश्वराप्रत पोहोचण्याच्या प्रवासामध्ये (मनातील ) भाव अत्यंत महत्वाचे आहे. "
३
मन आणि विषय
... हे परमेश्वराच्या सर्वव्यापकत्व या तत्वाशी जोडते.
... हे 'सर्वतो पानिपादम् ' या श्लोकाची आठवण करून देते.
... 'सर्वतो पानिपादम्' या श्लोकामुळे स्वामीच सर्वकाही आहेत हा विचार मनात येतो.
दुसऱ्याच क्षणाला मी मोराच पीस पाहते, आणि मी त्याला कृष्णाच्या रूपाशी जोडते. माझ्या विचारांची शृंखला मोरपीसापासून सुरु होते आणि परमेश्वरापर्यंत जाऊन संपते. मोर हा 'विषय', विचारांची शृंखला म्हणजे मन. अशाप्रकारे मी जे पाहते त्याला परमेश्वराशी जोडते.
या विचारांच मूळ काय ? त्याचा उगम कुठे ? एक विचार आला की लगेच दुसरा त्याच्यामागे येतो, मग तिसरा. अशाप्रकारे, सर्व विचार उभे राहतात. या विचारांचा उगम कुठे ? परमेश्वर, फक्त परमेश्वर. माझे सर्व विचार फक्त परमेश्वरापासून उगम पावतात. मी प्रत्येक गोष्टीचा फक्त उगमच पाहते, म्हणून ते आदिमूल होते. माझ मन अशाप्रकारे विचार करते. आता 'विषय' बघू या.
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा