रविवार, २९ मे, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" चिरंकाल आनंद म्हणजे परमेश्वराशी एकात्मता." 
कली परततो 

            त्यानंतर मात्र, कली भयानक स्वरूप घेईल. सध्याच्या युगात ज्यांनी अतिशय वाईट कर्म केली आहेत असे लोक त्या काळात त्यांच्या कर्माच्या जड ओझ्यांसह पुन्हा जन्म घेतील. त्या काळास काळाकुट्टकलिच म्हणावे लागेल. त्यावेळी जन्मास येणारी माणसे दुष्ट स्वभावाची, राक्षसी गुणांची असतील, आणि ते कलियुग असह्य असेल.  

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 
उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

गुरुवार, २६ मे, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
           " परमेश्वराचे नामस्वरूप हृदयामध्ये स्थापित करा म्हणजे तुम्हाला त्याच्याशी थेट संवाद साधता येईल. " 
कली परततो 

             तरीसुद्धा ती शेवटची वर्ष ही सत्य-प्रेमा युगाची असल्याकारणाने ज्यांची अगदी थोडीशीच कर्म बाकी आहेत, त्यांना अंतिम मोक्ष मिळण्याची शक्यता आहे. दुसर कलियुग अजून यायचे असल्याने लोकांना त्याच्या भीषणतेची लागण लागली नसेल. म्हणूनच मुक्तिची शक्यता अधिक आहे. ज्यांची थोडीशीच कर्म शिल्लक आहेत अशा लोकांना सत्युगाच्या शेवटी आणि कलियुगाच्या प्रारंभी अंतिम मुक्ती मिळू शकते. कलिच चक्र फिरू लागेल. तरीसुद्धा पुष्कळांना अंतिम मुक्ती मिळण्याची दाट शक्यता आहे, कारण सत्ययुगाची शक्ती हळूहळू कमी होत जाईल. कलिची पहिली १००० वर्षे ही तितकीशी कठीण नसतील. त्यामध्येसुद्धा कोणी प्रयत्न करून मुक्ती प्राप्त करू शकतो. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 
उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम  

सोमवार, २३ मे, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार - जानेवारी ६

     " जो स्वार्थ आणि अपेक्षांपासून मुक्त असतो त्याला कर्म बाधत नाही."

ज्यांची वृत्ती स्वार्थी नसते ते कर्मांच्या परिणामांपासून मुक्त असतात. स्वार्थी मनुष्याच्या जीवनाचा केंद्रबिंदू अहंकार असतो. "मला हे हवंय, मी ते करू का? अशा प्रकारे त्यांचं आयुष्य त्यांच्या 'मी' भोवतीच फिरत असतं. ते म्हणतात मला डॉक्टर व्हायचं आहे, मी इंजिनियर होणार, राजकारणी होणार वगैरे. ह्या माध्यमांमधून त्यांना नाव, प्रसिद्धी आणि हुद्दा हवा असतो. आध्यात्मिक क्षेत्रातही अशा प्रकारच्या इच्छा-आकांक्षा  दिसून येतात. एखाद्याला मठाधिपती होण्याची इच्छा असते. त्यांना नाव, प्रसिद्धी,पैसा आणि गर्दी हवी असते. स्वार्थामुळे आध्यात्मिक जीवन सुद्धा कसे बिघडते हे ह्यातून दिसून येते. अहंकारी मनुष्य अध्यात्माचा प्रसार कसा बरं करू शकेल? आध्यात्मिक गुरु अथवा नेत्यानं एकाच ठिकाणी राहून स्वतःस भगवत भक्तीत पूर्णपणे झोकून द्यावयास हवं. अशा साधनेमुळं त्याच्या भोवतालचं वातावरण बदलतं. तामिळनाडूच्या रमण महर्षींनी घरादाराचा त्याग केला आणि त्यांनी  तिरुवण्णामलाईला वास्तव्य केले.

भगवत गीतेच्या ५व्या अध्यायात श्रीकृष्ण संन्याशाच्या अवस्थेविषयी हे सांगतो. संन्यासी इथे काहीही करत नाहीत असं भासतं, तथापि ते सर्वकाही करत असतात. त्यांच्या ह्या अवस्थेद्वारे ते त्यांच्या भोवतीचं वातावरण तसंच त्यांच्याकडे येणाऱ्या माणसांमध्ये परिवर्तन घडवून आणतात. ते स्वार्थरहित जीवन जगतात. परंतु जे स्वार्थी असतात ते अपेक्षा आणि इच्छा यांनी भरलेले असतात. त्यांना प्रसिद्धी,पैसा, गर्दी वगैरे सर्व हवं असतं. ते त्यांच्या पादपूजेसाठी पैसे गोळा करतात, आणि अजूनच प्रसिद्ध होतात. तिरुपतीच्या मंदिरात तुम्ही पैसे भरले तरच तुम्ही रांगेत पुढे जाऊ शकता, नाहीतर दोन तीन दिवस थांबावं लागतं. आजकाल आध्यात्मिक दिग्गज सुद्धा हा मार्ग चोखाळतात. मी दिल्ली आणि श्रीलंका येथे गेले होते तेव्हा तेथील भक्तांना माझी पादपूजा करायची होती. मला हे सर्व नको होते म्हणून मी सर्वाना ह्यापासून परावृत्त केले. मी स्वामींच्या चरणांची धूळ आहे. मला ना नाव, ना रूप ना व्यक्तित्व. मला माझी अशी ओळखच नाहीये त्यामुळे मला स्वार्थ नाही.

माझ्या कठोर तपश्चर्येमुळे माझं सहस्रार उघडलं आणि माझी कुंडलिनी स्तूपाचं रूप धारण करत बाहेर आली. त्यावेळेस मी स्वामींकडे प्रार्थना केली की ," अमृताचा एकही थेंब माझ्या शरीरात पडता कामा नये तर निर्माण होणारा प्रत्येक थेंब बाहेर जाऊन जगाच्या उद्धाराकरिता उपयोगी व्हावा." माझ्या मनात कुठलाही स्वार्थ नाही. स्वामींनी मला मुक्ती बहाल केली.मी एकटीनेच त्याची अनुभूती घेण्याऐवजी स्वामींना सांगितलं की त्यांनी सर्वाना मुक्ती बहाल करावी. मी निःस्वार्थ असल्यामुळे मला अपेक्षा  नाहीत. तरीसुद्धा ही काया भगवंतास अर्पण करावी ही माझी एक इच्छा आहे. ही एकच एक अपेक्षा आहे. माझ्या अंतिम क्षणी माझी काया ज्योतिस्वरूप होऊन स्वामींच्या देहात विलीन होईल. मला स्वतःचं नाव आणि रूप नाही हे मी ह्याद्वारे सिद्ध करीन. लोकांनी माझ्या पावलांची भक्ती करावी,किंवा पाद्यपूजा करावी; हे मला नकोय. मला फक्त स्वामींच्याच चरणांची धूळ होऊन रहायचं नाहीय तर सर्वांचीच पाद-धुली व्हायचं आहे. ह्या माझ्या भाव कंपनांमुळे मी तो प्रेम-अश्व होते, ज्यावर पाय ठेऊन सर्वजण मुक्ती पथावर मार्गक्रमण करतात. 

मुक्ती निलयमच्या प्रवेश द्वाराजवळ दोन छोटी मंदिरं आहेत. एक नागांचं तर दुसरं दुर्गा मातेचं. काल त्यांची प्रतिष्ठापना नवीन मंदिरात केली गेली.त्यावेळी जे.पी.ना खाकी रंगाचा एक छोटा कागद मिळाला; त्यावर १४ हा अंक लिहिला होता.

२० जून २०१६ ध्यान 

वसंता: स्वामी, माझे प्रभू, तुम्ही माझ्याशी बोला. मी झोपता कामा नये. 

स्वामी : चल,आपण जाऊ यात. 

वसंता: स्वामी, हा १४ अंक लिहिलेला पेपर काय सुचवतो? 

स्वामी : तू १४ विश्वे पुर्णम (निर्दोष) करतेस. चौदा विश्वे असलेले मानवी शरीर सुद्धा निर्दोष होते. 

वसंता: स्वामी, त्या कागदावर पानासारखे आकार आहेत, ते काय स्वामी?

स्वामी : ती पाने तूझं सदा हरित अस्तित्व दर्शवतात. 

वसंता: अमरला पूर्ण बरं करा नं, स्वामी. 

स्वामी : तो बरा होईल. 

ध्यान समाप्त.  

आता आपण पाहू यात. जे.पी.ना खाकी रंगाचा एक छोटा कागद मिळाला; त्यावर १४ हा अंक लिहिला होता. त्यावर पानासारखे काही आकार होते आणि त्या आकारात SV, त्रिशूल,आणि ॐ दिसत होते. स्वामी म्हणाले की, माझी तप-शक्ती आणि त्यांची कृपा ह्यामुळे चौदा जगतं निर्दोष केली जातात. एवढंच नाही तर हरएक मानवाच्या शरीरातील चौदा अंतर-जगतं सुद्धा निर्दोष होतात. मानवी  शरीरात सात वरील जगतं तर सात खालील जगतं असतात. सदाहरित अस्तित्व हिरव्या पानांनी व्यक्त होतं. येणारं सत्य-युग एक हजार वर्षांसाठी सदाहरित असेल.  

तो कागद नागदेवतांच्या देवळाजवळ का मिळाला? काल आम्ही माझ्या जुन्या दैनंदिनी मध्ये संदेश शोधत होतो. मी  एक नोंद वाचली. त्यात स्वामी सांगतात की, आम्ही दोघे इडा आणि पिंगला नाड्यांप्रमाणे अविभक्त आहोत. ह्या दोन नाड्या कुंडलिनीपासून निघतात आणि आज्ञा चक्रात एक होतात. पुढे स्वामी म्हणतात की," आपण कधीच वेगळे नसतो, कायम एकत्रच असतो. म्हणून मी तुला 'हे एकाकी कमलिनी’ ही कविता दिली." 

स्वामींनी काही वर्षांपूर्वी दिलेल्या ह्या कवितेत ते, कुंडलिनीच्या प्रत्येक चक्रामध्ये आम्ही कसे संयुक्त आहोत हे सांगतात. स्वामी आणि मी एकत्र आहोत. जेव्हा सर्वजण जीवन्मुक्त अवस्था प्राप्त करतील तेव्हा त्यांची मूलाधारातील शक्ती जागृत होऊन आज्ञा चक्रातील शिवास जाऊन मिळेल. हे इडा आणि पिंगला नाड्यांचं ऐक्य आहे.  

२१ जून २०१६, मध्यान ध्यान 

वसंता : स्वामी, मी इतरांकरिता एवढी का बरं रडते?

स्वामी : तू एवढ्यासाठीच इथे आली आहेस. तू सर्वांसाठी आक्रंदन करून त्यांना मुक्ती मिळवून देतेस. 

वसंता : ठीक आहे स्वामी. मी इडा- पिंगला नाड्या, दुर्गेचा कर्मसंहार, विनायकाचं अडथळे दूर करणं आणि अखेरीस मुक्तीची प्राप्ती ह्या विषयी लिहू का?   

स्वामी : छान. लिही.

ध्यान समाप्त.  

आता आपण पाहू यात. श्रीलता डॉक्टरकडे गेली होती. परतल्यावर ती मला पहायला आली. मी तिला पाहिल्याक्षणी मला रडू कोसळले. "मी सगळ्यांसाठी का अशी रडते? हा माझा स्वभाव आहे. माझे हे अश्रू आणि मी करत असलेलं तप सर्वाना मुक्ती देतात." 

इडा आणि पिंगला ह्या कुंडलिनीच्या दोन महत्वाच्या नाड्या एकमेकींत गुंतलेल्या असतात. त्या मूलाधार चक्रातून आज्ञा चक्रात वरपर्यंत जातात. इथे त्या समोरासमोर येतात. प्रत्येकाच्या कुंडलिनीत जेव्हा हे घडतं तेव्हा ते जीवन्मुक्त अवस्था प्राप्त करतात. स्वामींनी इडा आणि पिंगला ह्या दोन नाड्यांची तुलना आम्हा दोघांशी केली. आम्ही दोघे अविभक्त आहोत. मुक्ती निलयम मध्ये दोन नागांकरता एक नवीन मंदिर बांधलं आहे. दुर्गेसाठी सुद्धा एक देऊळ आहे. दुर्गा माता कर्म संहार करते. ज्ञानमुक्ती गणेशाचं मंदिर आधीपासूनच आहे. गणेश ज्ञान प्रदान करतो तसेच मुक्तीच्या मार्गावरील अडथळे दूर करतो. मुक्ती निलायमचा स्तूप सर्वाना मुक्ती प्रदान करतो. मंदिरं दक्षिणेला आहेत तर मुक्ती स्तूप उत्तरेला.अखेरच्या काळात पांडवांनी सर्वत्याग केला आणि ते सर्व उत्तर दिशेला चालू लागले. एक एक पांडव एकामागोमाग एक पडत गेला. तथापि मागे वळूनही न पाहता धर्मराज उत्तरेला चालत राहिला. अखेरीस त्यानं सशरीर स्वर्ग प्राप्त केला.  

मुक्ती निलयम हे स्वामींचं कार्यक्षेत्र आहे. अखिल जगताला मुक्ती द्यावी ही माझी इच्छा आहे. मुक्ती निलयममध्ये माझ्या जवळ राहणाऱ्यांना शारीरिक पातळीवर भोग भोगावे लागत आहेत. स्वामी म्हणतात की ही त्यांची लहान लहान कर्मे आहेत. जे काटक आणि स्थिर आहेत तेच माझ्यासोबत तसेच भगवंताजवळ राहू शकतात. हा काळ अतिशय खडतर आहे. अडथळ्यांवर विजय प्राप्त करण्याकरता आपण सर्व नाग देवता, दुर्गा माता आणि विनायकाची प्रार्थना करू यात. स्वामींच्या अवतार कार्यासाठी तुम्ही निवडले गेले आहात हे ह्यामधून तुम्ही सिद्ध करा. नाहीतर तुम्हीसुद्धा सामान्य माणसांसारखे व्हाल; दुसरा कली तुमची वाट पाहत आहे.

जय साईराम 

रविवार, २२ मे, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
        " परमेश्वरावर प्रेमाचा वर्षाव केलात की तुमच्याकडे खऱ्या प्रेमाचा चेहरा असेल. "
कली परततो 

         पुढील नऊ वर्षात जगातून सगळी नकारात्मक भावकंपने नाहीशी करायलाच हवीत आणि अवघे जग शुद्ध करायला हवे. पंचमहाभूतांमध्ये स्वामींचे आणि माझे भाव भरून राहतील, त्यामुळे सर्वांची पंचेंद्रिये शुद्ध होतील. सर्वांना स्वतःचे परिवर्तन करण्यासाठी ही अद्भुत संधी आहे. अशुद्धता कमी होत गेली की शुद्ध कंपनांनी अवकाश व्यापेल. मानवासाठी ही परिवर्तनाची सर्वात मोठी संधी आहे. 
            इथे एक उदाहरण देते. एक माणूस, ज्याची बरीचशी कर्म भोगून झाली आहेत, तो १००० वर्षांच्या सत्युगात अनेकदा जन्म घेतो. उरलेल्या कर्मांची त्याच्या हिशोबवहीत नोंद आहेच. सत्ययुगात माझे आणि स्वामींचे भाव त्याच्यात कार्यरत असतील. सत्युगाच्या शेवटच्या १०० वर्षात त्याची पूर्वीची कर्म हळूहळू पुन्हा कार्यरत होऊ लागतील.  

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 
उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

गुरुवार, १९ मे, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" परमेश्वराला त्याच्या इच्छेनुसार तुमचे जीवन चालवू द्या. "

कली परततो 


              कलियुगाची जीवनपद्धती स्वामी सत्ययुगास अनुकूल करत आहेत. कळसाला पोहोचलेला कली सत्युगात कसा बदलतो हे दाखवण्यासाठी हे अद्वितीय युग येत आहे. याच कारणासाठी ' न भूतो न भविष्यती ' असा परमोच्च अवतार अवतरला आहे. मानवाच्या पहिल्या युगाची पहाट कशी होते याच प्रात्यक्षिक स्वामी करत आहेत. आता प्रत्येकाने आपल्या खात्यात नवीन कर्मांची भर पडू नये म्हणून स्वतःचे परिवर्तन करण्याचा आटोकाट प्रयत्न करायला हवा. मानवजातीसाठी ही सुवर्णसंधी आहे, हे लक्षात ठेवून आपण येणाऱ्या २८ वर्षात स्वतःचे परिवर्तन करायलाच हवे.  


संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

सोमवार, १६ मे, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" परमेश्वर हाच एकमात्र गुरु आहे. "

कली परततो 

           भगवान श्री सत्यसाईबाबा अवतरित झाले. स्वतःच्या प्रेमाने लोकांना जागृत करीत स्वामी स्वतःचे सत्य प्रकट करीत आहेत. स्वामी जगाला आजपर्यंत अज्ञात असलेले ज्ञान उघड करून सांगत आहेत. स्वामींचे अवतारकार्य मानवतेला विविध प्रकारांनी लाभ देत आहे. त्यांच्या शैक्षणिक संस्था ह्या पुरातनकालीन गुरुकुलसारख्या आहेत. इथे, अगदी लहान वयापासून मुलांना मानवी मूल्ये आणि आध्यात्मिक शिक्षण दिले जाते. हे 'एज्युकेअर ' (आत्मोद् भव शिक्षण ) आध्यात्मिक शिक्षण आणि मानवी मूल्यांवर अधिक भर देते. जगभरातील लोकांना आता याची जाणीव होऊ लागली आहे. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

गुरुवार, १२ मे, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
       " संयम आणि एकाग्र मन याद्वारे मनामध्ये सुविचार व सद् भावना निर्माण होतात." 
कली परततो 

          सत्ययुगात, १००० वर्षे फक्त स्वामींचे आणि माझे भाव कार्यरत राहतील. सत्ययुगाच्या शेवटी कली परतेल. जर आमचे सत्य आणि प्रेम पूर्णपणे कार्यरत राहिले तर ते कलियुग असू शकत नाही. कर्म असलेली माणस असतील तरच कली कार्य करू शकतो. जर सर्वांना अंतिम मुक्ती मिळाली तर कलियुग कस चालेल ? चार युगांच्या चक्रात सर्वप्रथम सत्ययुग येतं. त्यानंतर त्रेता, द्वापार आणि शेवटी केली. असे हे चार युगांचे चक्र आहे. आता अनपेक्षितपणे, कली संपायच्या आधीच, कली चालू असतानाच सत्ययुग उदयास येणार आहे. जेव्हा हे अद्वितीय सत्ययुग संपेल तेव्हा, कली परत यायलाच हवा. नाहीतर चार युगांच चक्र पूर्ण होणार नाही.
 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 
उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

रविवार, ८ मे, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
       " पूर्णपणे शुद्ध होऊन परमेश्वराच्या चरणी स्वतःला समर्पित केले पाहिजे. " 
कली परततो
 
ध्यान 
वसंता - स्वामी, तुम्ही आधी म्हणालात की सर्वांना मुक्ती मिळेल. आता तुम्ही म्हणता की त्यांना कर्म भोगावी लागतील. हे कस  काय ?
स्वामी - सत्ययुगात, १००० वर्षे सर्वजण मुक्तीचा आनंद उपभोगतील. सर्वांना सत्युगात अंतिम मुक्ती मिळाली तर त्यानंतर जागाच कार्य कस चालणार ? हे सत्ययुग संपल्यावर त्रेतायुगात येणार नाही... कली चालू राहील. कलिच कार्य कस चालणार ? त्यासाठी कर्म हवीत. म्हणूनच उरलेल्या कर्मांचा अनुभव सुरु होईल. १००० वर्षांच्या सत्ययुगाच्या शेवटी, ज्यांची कर्म शिल्लक आहेत ते पुन्हा जन्म घेतील. कलियुग चालू राहील. अनेक मुक्त होतील पण सर्व नाही. 
वसंता - स्वामी, सत्ययुग संपल्यावर कर्म कशी कार्यरत होतील ?
स्वामी - हळूहळू सत्युगाचा प्रभाव कमी होत जाईल आणि कलीची पुन्हा सुरुवात होईल. ज्यांची आता अतिक्षय वाईट कर्म आहेत, ते त्यावेळी पुन्हा जन्म घेतील. त्यावेळी उदयास येणारा कली हा आत्तापेक्षाही अधिक वाईट असेल. 
ध्यानाची समाप्ती 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम   

गुरुवार, ५ मे, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
        " योग्य वेळ येताच परमेश्वर कवच तोडून आपल्याला मुक्त करेल." 
प्रेम निरपेक्ष असते 

          आपण कुठल्याही अटी न घालता परमेश्वरावर निरपेक्ष प्रेम करायला हवे. माझे प्रेम हे असे आहे. एका बाजूला,' मला तुम्ही हवेत, मी तुमच्यावर प्रेम करते ' हे भाव माझ्या हृदयातून उफाळून वर येतात. तर दुसऱ्या बाजूस मी नेहेमी म्हणते, 'मला काही नको स्वामी' माझ प्रेम परमेश्वराकडून कशाचीही अपेक्षा करत नाही म्हणून ते सर्वव्याप्त होते. 
          माझ्या हृदयाच्या खोल गाभ्यातून निघणारे हे शब्द जगभर निनादतात. एकदा मी स्वामींना म्हणाले, " मला हिमालयात घेऊन जा. मी उंच शिखरावरून ओरडेन 'स्वामी, मी तुमच्यावर प्रेम करते', जगभर त्याचा आवाज घुमू देत."
          अगदी जन्मापासून आतापर्यंत फक्त हाच एक विचार माझ्यात आहे; तोच माझा प्राण आहे. वैश्विक मुक्ती ही त्याचीच फलश्रुती आहे. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम  

रविवार, १ मे, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
        " परमेश्वराने आपल्याला अमृतपुत्र म्हणजे हुबेहुब त्याचा नमुना म्हणून निर्माण केले आहे."
प्रेम निरपेक्ष असते

ध्यान 
वसंता - स्वामी, माझं तुमच्यावर प्रेम आहे, मला तुम्ही हवे आहात. मला उडण्याची शक्ती द्या म्हणजे मी प्रशांती निलयममध्ये येईन, आणि साई कुलवंत हॉलवर बसून मोठ्याने ओरडेन, ' माझ तुमच्यावर प्रेम आहे.' हा आवाज संपूर्ण प्रशांती निलयममध्ये निनादेल. सर्वजण तुम्हाला येऊन विचारतील, ' हा आवाज कसला ?"
स्वामी - ह्या प्रेमाला मी काय करू ? मी एका अवतारात हे ऋण फेडू शकत नाही. 
वसंता - स्वामी, तुम्ही काही करायची आवश्यकता नाही . मी तुमच्याकडून कशाचीही अपेक्षा करत नाही. माझ्या प्रेमाच्या बदल्यात मला काही नकोय. प्रेमाचा प्रवाह माझ्या हृदयातून मुक्तपणे वाहत असतो.... मी काय करू ?
ध्यानाची समाप्ती  

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम