रविवार, २१ जून, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय २ 
कर्मकायदा - अवतार कायदा

 
            अरविंदांच्या सावित्रीमध्ये १०३ पानावर स्वामींनी काय सुचित केले ते आपण पाहू.

            .....तथापि अल्प तिच्या हाकेला प्रतिसाद देतात आणि अत्यल्प तिच्या दिव्यत्वाला. ते तिच्या दिव्यत्वाची पाऊलवाट चोखाळू  शकत नाहीत व आपल्या खुज्या मानवी आवाक्याने ते मागे पाडतात. ती त्यांची अग्रणी आहे, त्यांची हृदयसम्राज्ञी तरीही त्यांच्या स्वभावापासून फार वेगळी. ते तिचा आदर करतात. तिला धरून ठेवतात, परंतु ते तिची उंची गाठू शकत नाही. काहीजण आपल्या क्षुद्र उद्दिष्ट पूर्तीसाठी तिच्यावर भार टाकू पाहतात, किंवा बंड करून तिच्या प्रेमाचे जोखड झुगारून टाकण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांनाही तिचे प्रेम मनापासून हवे असते.


संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम





रविवार, १४ जून, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय १
मानवतेचा इतिहास

 वैश्विक स्फोट

२३ ऑक्टोबर १९३८
अमावस्येची काळोखी रात 
अहो आश्चर्यम्
अवस्थेच्या अंधाऱ्या रात्री 
जाहला पुनवेचा जन्म!

पिता मधुरकवी आळ्वार
माता वेदवल्ली
दक्षिणेकडील मधुरैसमीप 
वडक्कम्पट्टी ग्राम तयांचे
कन्येच्या आगमने आनंद त्यांसी शब्दातीत
सानुल्या या देवदूताचे 
नामाभिधान केली 'वसंता'
केवढे समर्पक नामकरण 
केले तयांनी अजाणता!
वसंता अर्थात वसंतऋतु 
अखेरीस त्या शुष्क मानवी जीवांना
गवसले प्रयोजन
आनंदाचा उत्सव करण्या 
प्रभुवराचे गुणगान गाण्या!

स्वागत तुझे माता मेरी 
साक्षात् प्रभूशी विवाह करी!
या! सकल जन या... 
तिची कथा पुढे ऐकण्या!

कट्टर गांधीवादी पिता 
आचारी जीवनी भगवद्गीता! 
असे अत्यंत दानशूर 
स्वातंत्र्य सैनिक शूरवीर 
तळपला शुक्र तार्‍यासम 
सच्चा पुत्र भारत मातेचा

वेदवल्ली, वैष्णव भक्तपरायण
रात्रंदिन प्रार्थनेत रममाण
पतीस घडतात तुरुंगवास 
त्या दुर्बल स्त्रीस 
आसरा ना कोणी दूजा
केवळ एक प्रभू परमेश, प्रभू परमेश!

हे प्रभू आहेस कोठे तू?
अंतरलास का मजसी तू?
हे माझ्या कृष्णा ! 
मज उध्दरणार नाहीस का ?
तिच्या करूण हृदनाचे पडसाद उमटती स्वर्गलोकी
भार असह्य वसुंधरेसी 
प्रभू म्हणे," परतुनी ये स्वगृहासी 
प्रतिक्षेत मी तवा नेत्रातील अश्रू पुसण्यासी!"

भगवंतासाठी अपयश येते क्वचित
कसे ? ते पाहू आपण 
बालवसंतेने नेली पुढे 
मातेची प्रज्वलित ज्योत 
त्या प्रखर ज्योतीने 
जर दाहिले प्रभुंवरा 
तर दोष कोणा द्यावा बरे?

धगधगता अग्नी भक्तिचा 
उद्रेक ज्वालामुखीचा 
अर्थात स्फोट विश्वाचा 
'ब्रम्हांड स्पोर्ट' सिद्धांत नव्हे हा 
आहे साक्षात स्फोट ब्रम्हांडाचा!

भगवंताशी संकल्प बदल अनिवार्य आता 
२७ मे २००१ या शुभदिनी 
मांगल्ये दिले ब्रह्मचारी बाबांनी
देऊनी मांगल्ये केली घोषणा मूक  
"आम्ही दोघ आहोत एक "

नायक नायिकेचा विवाह 
होऊनही सदा जीवन सुखी होता
कथेची होते सुफळ सांगता!

परी अम्मा याहुनी न्यारी 
वसंता न केवळ, ही आहे विश्वमाता
तिचे विश्व, तिची लेकरे दुःखात चूर असता 
असेल का संतोष तिच्या चित्ता ?

जोवरी ना देसी वैश्विक मुक्ती 
नसे मज शांती विश्रांती 
अग्निप्रवेश, नरकयातना 
सिद्ध मी याहूनी घोर सत्वपरीक्षा देण्या 
पाऊले ना ढळतील माझी मार्गावरूनी 

हा मार्ग वैश्विक मुक्तीचा, 
मानवा, दानवा 
कीटक, पशु, जलचरा 
मुक्त करील चराचरा


संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम



गुरुवार, ११ जून, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय १
मानवतेचा इतिहास

            त्याच पानावर स्वामींनी एक ओळ अधोरेखित केली.

            ......काळ व इतिहासातून माणूस काहीही शिकत नाही.

           वेळ सतत बदलत राहते. युगे बदलतात. मनुष्याने अनेक काव्य वाचली आहेत; परंतु त्यापासून तो काहीही शिकला नाही. यामुळे तो स्वतःच स्वतःचा कट्टर शत्रू होतो. रामायण, भागवत, महाभारत, भगवत् गीता किती बरं दिव्य पुस्तके इथे आहेत! तथापि या पुस्तकांनी शिकवलेले सूक्ष्म अर्थ लोक आचरणात आणत नाहीत. परिणामतः माणूस पुन्हा पुन्हा जन्मास येऊन मृत्यू पावतो. माणूस जन्मास न येण्यासाठी जन्माला आले हे विसरला आहे. म्हणून, मार्ग दर्शविण्यासाठी अवतार अवतरला.



संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम



 

मंगळवार, ९ जून, २०२६


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

प्रकरण - २

कुमारी पासून कुबेरापर्यंत 
 
            उद्घाटन समारंभाची वेळी भगवानांनी आमच्यावर भरभरून  कृपावृष्टी केली. पूर्ण होती देताना स्वामींच्या खुर्चीवरील कमळ खाली पडले. वेदिकेवर ठेवलेल्या सात पादुकांच्या जोड्यांवर विभूती व तेल साक्षात झाले.  तेलाचे सृजनीकरण कर्मसंहाराचे घटक आहे. जे लोक ह्या ठिकाणी या ध्यान सभागृहात येतील त्यांच्या कर्मांचा नाश होईल व त्यांना मुक्ती प्रदान केली जाईल. हे दर्शविण्यासाठी दोन दिवस तेल सुजित झाले. भगवान म्हणाले जसे पक्षांचे प्राण्यांचे आश्रयस्थान असते तसे साई गीतालयम सभागृह लोकांसाठी एक आश्रयस्थान आहे.
             भगवान यांनी या उद्घाटन समारंभासाठी तई पूसम पौर्णिमेचा दिवस निवडला. हा एक शुभ योगच म्हणायचा! ह्या पवित्र दिनी संत वल्लालर सर दिव्य तेजा मध्ये विलीन झाले. अंडाळ आणि वल्लालर  प्रमाणे मलाही लहानपणापासूनच परमेश्वरामध्ये सदेह विलीन व्हायचे आहे. मी नेहमी ह्यासाठी प्रार्थना करते. या आमच्या संयोगासाठी स्वामींनी हाच दिवस निवडल्याचे आताच मला ज्ञात झाले. ते म्हणाले की ह्या तई पूसम दिवशी माझा त्यांच्याशी सदेह संयोग होईल. मी म्हणाले," तई पूसम हा दिवस साई गीतालयमचा उद्घाटन दिन आणि आमचा विवाह दिन म्हणून साजरा केला जाईल."


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
 
जय साईराम

रविवार, ७ जून, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय १
मानवतेचा इतिहास

            मी स्वामींच्या एका दृष्टीक्षेपासाठी, एका स्पर्शासाठी, एका शब्दासाठी तळमळते आहे. स्वामींनी लाखो लोकांना दर्शन, स्पर्श, संभाषण दिले आहे; ते मला हे देऊ शकत नव्हते का ? हे अवतार कार्य आहे. हे असंच व्हायला हवे. यामुळे त्यांचे प्रेम व जवळीकीसाठी मी कासावीस आहे. हे मला न मिळाल्यामुळे मी जग बदलण्याची शपथ घेतली. या अवतारकाळात स्वामींनी जे काही केलं ते त्यांना प्रेमावतार काळात आल्यानंतर अनुभवावेच लागेल. आता ते मला हुरहुर लावतात, तेव्हा त्यांना माझ्या प्रेमाचा ध्यास लागून राहील. हा कर्म कायदा आहे भगवान स्वतः या कायद्याची प्रात्यक्षिक करतो.

           द्वैत सर्वांचे मूळ आहे. सर्वाभूती परमेश्वर आहे. जेव्हा मानवाला हे उमजते तेव्हा त्याचे दुःख निवते, दुःख त्याला स्पर्श करू शकत नाही, तू जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो.



संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


रविवार, ३१ मे, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय १
मानवतेचा इतिहास

            एक कोळी स्वतःभोवती जाळी विणतो व स्वतःच्या मध्यभागी बसतो. अगदी असेच प्रत्येक मनुष्याने स्वतःभोवती संस्कारांचे जाळे बनविले आहे. पूर्वीच्या जन्मांमध्ये त्यांनी जे काही केले असते, त्याचे या जन्मात संस्कार होतात. हे त्याने स्वतः निर्माण केलेलं जाळं आहे. मानव स्वतः विधीलिखित लिहून स्वतःला शापित करतो. कोणाचीही या जाळ्यातून सुटका नाही. हा कर्म कायदा आहे. भगवंत सुद्धा या कर्म कायद्याला बांधील असतो. हे कसे काय? आपण पाहू या.

             रामावताराच्या काळात वालीने तप करून वर प्राप्त केला. जो कोणी त्याच्याशी युद्ध करेल त्याची अर्धी शक्ती वालीला मिळेल असा तो वर होता. रामाने सुग्रीवास  वालीशी युद्ध करण्यास सांगितले. त्यावेळी झाडामागे लपून रामाने बाण मारून  वालीचा वध केला. जर रामाने हे केलं नसतं तर वालीचा वध कोणीही करू शकले नसते. हे अवतार कार्य होते. अवतार अवतरतो तेव्हा सर्व योजना आखतो, सर्वकाही त्यानुसारच घडले पाहिजे. पुढील युगात वाली नावाच्या पारध्याने झाडामागून कृष्णाच्या पायाच्या अंगठ्यावर बाण मारला व त्याचा मृत्यू झाला. रामाच्या चुकीच्या कृतीमुळे हे सर्व घडले. कर्म कायद्यापासून कोणाचीही सुटका नाही याचे प्रात्यक्षिक अवतार स्वतः करतात. आपण अजून एक उदाहरण पाहू.


संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, २८ मे, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय १
मानवतेचा इतिहास

           स्वामींनी पुस्तकात हे अधोरेखित केले. या आधी त्या पुस्तकात काय झाले ते आपण पाहू. नारद ऋषी सावित्रीकडे येऊन सत्यवान च्या प्रारब्धाबाबत बोलतात." मानवासाठी जीवन अंतर्गत दुःख व अश्रू आहे. आपल्यामधील दुष्ट शक्ती कार्यरत असतात. भगवंताने हा कायदा कशासाठी केला? मानवतेला हा शाप आहे का?" ती हे अजून विस्ताराने सांगण्यास सांगते.
            हा कर्म कायदा आहे. प्रत्येक व्यक्ती स्वतःच तिच्या दुःखाचे कारण आहे. पूर्वी त्याच्याकडून झालेल्या दुष्कृत्यांमुळे तो आज या स्थितीत आहे. जन्मोजन्मीचे दुर्गुण त्याच्या यातनांची कारण आहे. प्रत्येक व्यक्ती स्वतःची विधीलिखित घडवित असते. तो स्वतः त्याच्या शापित जीवनाचे कारण आहे. जन्मल्याक्षणी मतभेद व भेदभाव निर्माण होतात, आणि  ते पावलोपावली वाढत जातात. मूल दुःख व अश्रूंमधून जन्मास येते. ते एक एक पाऊल उचलून टाकत असता हे घडत राहते. म्हणून हे जाळं आहे.



संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, २४ मे, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय १
मानवतेचा इतिहास

           अरविंदांनी हे सगळं कसं बरं लिहिले ? त्यांनी जे काही लिहिले आहे ते सर्व माझे जीवन दर्शविते. मला याचे अतिशय आश्चर्य वाटते. आमची भविष्यात होऊ घातलेली पहिली भेट सुद्धा त्यांनी सुचित केली आहे. या भूतलावर जन्मास असलेली ही वसंत सरिता अथक धावत राहिली. ती अखेरीस साई सागरास मिळाली. तिचा उगम जेथून झाला तो स्त्रोत तिने प्राप्त केला. ७३ वर्षानंतर स्वामी मला बोलावतील आणि मी कोण आहे हे सर्व जगास दाखवतील.
            आपण पान नं. १२५ पाहूया,
            .....आमच्या आयुष्याचा जन्मच वेदनेतून होतो व रडतच आम्ही जन्मतो. आमच्या ठाईसहारक शक्तींचा वास असतो. आम्ही एखाद्या वेढलेल्या किल्ल्याप्रमाणे असतो. मानव जातीलाच काहीतरी शाप आहे अगदी जन्मापासून त्यांच्यावर द्वंद्वात्मक परिस्थिती लाभलेलीच असते. प्रत्येक पावलावर एक फास असतो. चुका आणि दुःख गुणाकाराने वाढतच असतात.


संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, १४ मे, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय १
मानवतेचा इतिहास

           आता पान ११७,
           .....सावित्री त्याला वाकून नमस्कार करते वहात जोडून त्याच्या पाया पडते.
           त्याच्या गळ्यात माळ घातल्यानंतर ती हे करते. पुन्हा स्वामींनी अधोरेखित केले,
           ....सत्यवानने तिला आपल्या कवेत घेतले. नदी जशी महासागरात विलीन व्हावी त्याप्रमाणे तिचे अस्तित्व त्याच्यात विलीन झाले हे सावित्रीला जाणवते.
             या ओळींच्या आधी पुस्तकात लिहिले आहे,' सावित्री गाडीतून खाली उतरते, फुले गोळा करते त्वरित एक माळ गुंफते व सत्यवानाच्या गळ्यात घालते. नंतर ती त्याच्या पाया पडते.' हे माझ्या जीवनात घडेल. स्वामी येतील, मला बोलावतील. आम्ही त्यांच्याकडे गाडीने जाऊ. कारमधून उतरू. स्वामी आमची स्वागत करतील. विलात करीत, अश्रू ढाळत मी त्यांच्या पवित्र चरणांवर नतमस्तक  होईन. स्वामी मला उचलतील आणि आलिंगन देतील. त्यावेळी मला जाणवेल, ' नदी जशी सागराला जाऊन मिळते त्याप्रमाणे माझ अस्तित्व "त्या' च्या मध्ये वाहून गेले. ७३ वर्षांनी ही तळमळ आहे! किती दुःख? किती यातना? विभक्त करताना येणारे जुळे. आम्ही विभक्त झालो, हे यातून दिसून येते. वियोगानंतर आमच्या मिलनाचा हा पहिला दिवस असेल. आम्ही जागतिक करणे वाहत आहोत आणि विश्वमुक्तीसाठी दीर्घकाळ वियोग सहन करीत आहोत. केवळ त्या दिवशी आम्ही आमची पूर्णम् अवस्था प्राप्त करू. आदी पुरुषापासून दूर गेलेल्या शक्तीचे ' त्या' च्याशी मिलन होईल.



संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


गुरुवार, ७ मे, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय १
मानवतेचा इतिहास

             आमच्या विवाहाच्या वेळी स्वामींना सर्व काही माहीत होते. मला भगवंताशी विवाह करायचा होता. तथापि भूलोकावर हे शक्य नाही असे मला माझ्या कुटुंबीयांनी सांगितले. त्यांनी मला तीन मुलगे सुचविले व एकाची पसंती करायला सांगितले. माझ्या नकळत मी स्वामींना पसंत केले. त्यांनी माझ्याशी वेगळ्या रूपात विवाह केला. जरी रूपे बदलली तरी भगवान व शक्ती हे आमची सत्य आहे; आत्मा अपरिवर्तनीय आहे. दोघांमधील अंतर नाहीसे झाले. दोन हृदयांचा संयोग झाला; परंतु माझे मन अशांत होते. अजूनही मला वाटत होते," आम्हा दोघांमध्ये अंतर आहे!"

            २००१ मध्ये स्वामींनी मला ' पुट्टू मांगल्य ' करून ते व्हाईटफील्डच्या वृंदावनला घेऊन यायला सांगितले. स्वामींनी मांगल्य हस्त स्पर्शाने आशीर्वादित केल्यानंतर मी ते गळ्यात घातले. केवळ त्या क्षणी आमच्या मधील अंतर गळून पडले. अंतरीची खून पाठवून माझा जीव त्यांच्या जीवात गाड प्रेमाने विसावला. यानंतरच आमचा खरा प्रवास सुरू झाला.


संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, ३ मे, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय १
मानवतेचा इतिहास

             माझ्या जीवनप्रवासाचा मार्गदर्शक स्वामी, माझ्या अंतरात आहेत. ते केवळ अंतर्यामी नाही तर माझ्या बाह्य जीवनाची सोबती ही आहेत. अगदी बालवयापासून मला भगवंताशी विवाह करायचा होता. या ज्वलंत इच्छेमुळे भगवान माझे पती झाले. भगवंताने माझ्याशी विवाह केला; परंतु या सत्यापासून मी अनभिज्ञ होते. काही काळ गेल्यानंतरच स्वामींनी सांगितले की, त्यांनीच माझ्याशी विवाह केला. 
            आता आपण ११३ पानावरील उतारा पाहू.
             .....सत्यवान सावित्री दोघांना एकमेकांची ओळख पटते. आठवणींच्या पटलावर त्यांचा पूर्ण भूतकाळ दृश्यमान होतो. रूपे बदललेली पण आत्मा नाही. दोघांमधील अंतर क्षणात गळून पडते व अंतरीची खून पटवून जीव जीवनात गार्ड प्रेमाने विसावतो.



संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


गुरुवार, २३ एप्रिल, २०२६


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

प्रकरण - २

कुमारी पासून कुबेरापर्यंत 
 
            लहानपणापासून मला कृष्णाची विवाह करायचा होता. आता ६३ व्या वर्षी माझे नातेवाईक माझी मुले आणि पती या सर्वांनी मला साईकृष्णाला देऊन टाकले. ही घटना मी विसरू शकत नाही खरोखर एक अजब चमत्कार! केवळ परमेश्वरालाच त्याच्या लीला ठाऊक! स्वामींनी कसे मला सर्व बंधना मधून मुक्त केले व केवळ त्यांचाच एक बंधन आहे हे दर्शविले. हा काही संन्यास समारंभ नसून विवाह समारंभ आहे! तरुण असताना मी स्वतः अंडाळ असल्याची कल्पना करून मी तिच्या ' वारनम अयिराम ' . हा श्लोक पुन्हा पुन्हा गाऊन आनंद घेत असे. ह्या श्लोकामध्ये श्रीकृष्णाशी झालेल्या तिच्या स्वप्न विवाहाचे वर्णन करते. आज हे सत्यात उतरले आहे. अखिल विश्व या विवाह समारंभाचे साक्षी आहे. " यद् भावम् तद् भवति " तुम्ही ज्याचा विचार करता ते बनता. मी कल्पिलेला कृष्णाची विवाहाचा प्रसंग आता वास्तवात उतरला आहे वा वास्तव बनला आहे. मी ४० वर्षे गृहस्थाश्रमी संन्यासी होऊन जीवन जगले. आता संन्यासी बनून मी कृष्णाबरोबर गृहस्थ जीवन जगत आहे! ज्या चमत्काराने माझी मनोकामना पूर्ण केली त्या चमत्काराचे कोणालाही आकलन होणार नाही.


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
 
जय साईराम


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय १
मानवतेचा इतिहास

             सत्यवान- सावित्रीची गोष्ट सर्वांना माहीत आहे. तरीही महान संत अरविंदांचे लिखाण वेगळे आहे. ते दुसरी कथा सांगत होते. ते त्रिकाळ ज्ञानी आहेत. त्यांना भूतकाळ, वर्तमान व भविष्याचे ज्ञान आहे. ते त्या सत्यवानसंबंधी लिहीत नव्हते; तर भविष्यात होणारा अवतार भगवान श्री सत्यसाईबाबांबद्दल लिहीत होते. त्यांनी अवतार व त्याची शक्ती, यांच्या अवतार कार्याबाबत लिहिले. स्वामींचा जन्म २३ नोव्हेंबर १९२६ ला झाला. दुसऱ्या दिवशी २४ नोव्हेंबर, १९२६ ला अरविंद यांनी घोषित केले, "आज कृष्ण स्थूल रूपात अवतरला." या घोषणेनंतर ते एकांतात गेले व क्वचितच दृष्टीस पडले.
             अशारीतीने स्वामींनी सावित्री पुस्तकातील पुष्कळ भाग अधोरेखित केले व मला माझ्या जीवनाशी त्या भागांची तुलना करावयास सांगितले. आता आपण पाणी १०६ पाहू.
             .....तुझ्या अंतरंगातील धगधगणाऱ्या मार्गदर्शकाशिवाय इतर कोणाची तुला गरज नाही. तुझा होऊ घातलेला जीवनसाथी व सोबती तुझी वाट पाहत आहे.




संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, १९ एप्रिल, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय १
मानवतेचा इतिहास

             स्वामींनी १९९८ मध्ये माझ्या उदरात विश्व ठेवले. मी मातृभावामुळे विश्वपरिवर्तन घडविले. कलियुगात या भूतलावर खरा आनंद कुणालाही माहित नाही. फसव्या आनंदाच्या शोधा ते इकडून तिकडे भरकटत आहेत. सर्व जन्ममृत्यूच्या चक्रात अडकले आहेत. खरे तर निखळ आनंद केवळ परमेश्वरापासून प्राप्त होऊ शकतो.

             'मी व माझे' यावरील ममत्वाचा त्याग केला तरच निखळ आनंद निर्माण होतो. जगास याचे प्रात्यक्षिक करण्यासाठी मी इथे आले. जागतिक कर्मे स्वीकारून मी यातना भोगत आहे. हे माझ्या मातृभावामुळे साध्य होते. स्वामींनी जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे.



संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, १६ एप्रिल, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय १
मानवतेचा इतिहास

             हे माझ्याशी तंतोतंत जुळते. वसंता म्हणजे वसंत ऋतुचे आगमन-  माझा जन्म. पूर्वी स्वामींनी मला 'वैश्विक स्फोट' ही कविता दिली. त्यात माझा जन्म व जीवनाचे वर्णन आहे. हा अध्याय त्या पूर्ण कवितेने संपतो.

अवसेच्या अंधाऱ्या रात्री वडकंपट्टी ग्रामी
जाहला पुनवेचा जन्म

           त्यांनी माझ्या माता-पित्यांबद्दलही लिहिले. पुढे स्वामींनी घोषित केले की, ते व मी आम्ही दोघं,'असूनही एक झालो दोन' अशा रीतीने त्यांनी आमची अवस्था जगासमोर उघड केली, होय. मी विश्वमाता आहे. अखिल विश्व मी माझ्या उदरात वहावे, माझ्यापासून सर्व जन्माला यावेत यासाठी स्वामींकडे अश्रू ढाळले. ' उपनिषदांच्या पलीकडे' या पुस्तकात मी हे लिहिले आहे.
 

संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, १२ एप्रिल, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय १
मानवतेचा इतिहास

२८ सप्टेंबर २०१३ मध्यान्ह ध्यान 

वसंता : स्वामी मी सावित्री वर लिहू का?
स्वामी : होय, तू लिही. अरविंदांनी तुझ्या जीवनाबद्दलच लिहिले आहे.
वसंता : आता मला समजलं स्वामी, मी लिहीन.
ध्यान समाप्त.
          स्वामींनी श्री अरविंद यांच्या 'सावित्री' या पुस्तकातील अध्यायांमधील काही भाग सुचित केले. मी वाचल्यानंतर माझ्या लक्षात आले की ते सर्व माझ्या जीवनाशी निगडित होते. सावित्रीच्या व माझ्या जीवनशैलीमध्ये आमच्या जन्मापासूनच साधर्म्य आहे. तिच्या जन्माबाबत १०१ पानावर स्वामींनी काय अधोरेखित केले ते आपण पाहू,
           ....वसंत ऋतु बहरला. अशाच एका बहराच्या अत्युच्च क्षणी, सृष्टीच्या सौंदर्याचा उत्सव साजरा करत असता, सत् चित् आनंदासाठी तिने दिलेल्या हाकेला ओ देत एक दैवी आत्मा पृथ्वीवर अवतरला. सावित्री जन्मली. अपूर्ण काय हाती घेण्यास आदिमाता भूतलावर परत आली.


संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


गुरुवार, ९ एप्रिल, २०२६


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

प्रकरण - २

कुमारी पासून कुबेरापर्यंत 
 
            प्रथम गणेश होम, नवग्रह होऊन आणि लक्ष्मीनारायण सुदर्शन होऊन झाले. अखेरी संन्यास होऊन करण्यात आला. ह्या होमाच्या अगोदर माझे मंगळसूत्र काढले व ते फुले फळे व इतर पूजा साहित्य बरोबर एका तबकात ठेवण्यात आले. त्यानंतर ते माझ्या यजमानांनी दुर्गा देवीच्या चरणी अर्पण केले. इथून पुढे त्यांना माझे यजमान म्हणणे उचित ठरणार नाही. आता माझी आणि त्यांचे नाते मित्रत्वाचे आहे. असा मित्र जो परमेश्वराचे कार्य करण्यासाठी मला सहाय्य करतो.  श्री मनोहरननी स्वतःच्या हातानी मी काढलेले मंगळसूत्र  दुर्गा देवीच्या चरणी अर्पण केलेले पाहून सर्वांचे डोळे पाणावले. माझ्या आयुष्यात अशी घटना घडेल असे कोणालाही वाटले नव्हते. स्वामी म्हणाले की अशी घटना कोणाच्याही जीवनात घडलेली नाही. कोणतीही स्त्री आपले मंगळसूत्र काढण्यास व आपल्या पतीकडून ते परमेश्वरास अर्पण करण्यास राजी होणार नाही. मी दीर्घकाळ गृहस्थाश्रमात असूनही संन्यासी होते व आता मी पूर्णपणे शास्त्रसंमत संन्यासी आहे. मंगळसूत्र काढण्याच्या घटनेने मला रामकृष्ण परमहंस आणि पवित्र धागा तोडल्याची आठवण करून दिली. पवित्र अग्नीमध्ये पूर्ण होती देताना मी म्हणाले, "भगवान आम्ही आमचे जीवन आपणास समर्पित करतो."


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
 
जय साईराम


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
            इथे माझी पृथ्वीवरील अवतरण सूचित केले आहे. पूर्वी एकदा स्वामी म्हणाली की कलियुगाच्या लोकांचे रुदन ऐकून व त्यांच्या यातना पाहून महालक्ष्मी धरतीवर अवतरली. मी अशी अवतरले. मी कलियुग तोडून प्रकृतीचे विधीलिखित बदलण्यासाठी आले. कलीचा कायदा म्हणजे कर्मकायदा. हा कायदा तोडून मी प्रकृतीचा अधःपात थांबविते. हा विनाश प्रकृतीचे विधीलिखित आहे मी स्वामींपासून नियुक्त झाल्यामुळे, माझ्यापाशी असलेल्या सर्व शक्तीनिशी मी हे करते. "त्या"ने मला वेगळ्या रूपात आणले मी "त्या"ची शक्ती आहे.
            स्वामी व मी इथे आलो. कलियुगाला मुक्त करण्यासाठी अखिल विश्वाची कर्मे आमच्या देहांवर घेतली. या आपत्काली मृत्यूघटकेच्या वेळी मी अश्वत्थ वृक्ष परत विश्वात आणून पृथ्वीवर-  मानवी मातीवर त्याचे आरोपण करते. या जगात मी स्वामींना परत आणि असा याचा अर्थ आहे. "त्या"च्या संसार वृक्षाचे पृथ्वीवर रोपण झाले. मी पृथ्वीचे वैकुंठात परिवर्तन करते, तिला स्वर्गाची शाखा करते. प्रकृती सर्वांना मुक्ती बहाल करते. ती स्वतः झेप घेऊन मानवाला अमृतवाकडे घेऊन जाईल.
 



संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, ५ एप्रिल, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
            स्वामींनी सर्वप्रथम ९७ पानावरील उतारा निर्देशित केला. या पानावर स्वामींनी खालील वाक्य अधोरेखित केले,
           पृथ्वीवर स्वर्गाचे पदार्पण होईल.....
           या ओळीच्या बाजूला समासात स्वामींनी लिहिले,"वैकुंठ!" त्याच पानावर स्वामींनी खालील उतारा उद्घृत केला.
            मी तुझा आक्रोश ऐकला आहे. होय! आत्मिक शक्तीने कलिचा कायदा तोडून प्रकृतिचा अधःपत थांबविणारा अवतरणार आहे. मृत्युच्या महाभयंकर घटकेच्या वेळी बीजारोपण होईल. स्वर्गाच्या शाखेचे मानवी मातीवर आरोपण होईल. प्रकृती तिच्या मरते पायरीवरून (अमृतत्वाकडे) झेप घेईल.




संदर्भ सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, २ एप्रिल, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
प्रस्तावना 

             एकेक चक्र पार करत गेल्यानेच मनुष्य परमेश्वर प्राप्ती करू शकतो. एक व्यक्ती आध्यात्मिक मार्गावर प्रगती करत भगवान प्राप्ती कशी करते. सत्यवान् - सावित्री कथेमधून शब्दबद्ध केले आहे. आणि अमृतत्वास कशी प्राप्त होते हे श्री. अरविंद सत्यवान्- सावित्री या कहाणी मधून दर्शवितात. अरविंदांनी या पुस्तकात जे काही लिहिले आहे त्या सर्वांचे प्रात्यक्षिक मी व स्वामी या स्थूल जगात करीत आहोत. तथापि एखादी गोष्ट वाचणे आणि स्वामी व माझ्या जीवनामध्ये घडणारे सर्वांनी. चक्षुर्वेसत्यं पाहणे यामध्ये खूप फरक आहे. हे पुस्तक वाचून सर्वांनी अंतर्गत अध्यात्मिक प्रवासासाठी स्वतःस तयार करायला हवे.
             सावित्री तिच्या पतीचे विधीलिखित बदलते. स्वामी व मी एका युगाचे विधीलिखित बदलतो! आम्ही कलियुगाचे सत्ययुगात परिवर्तन करतो.
             पुष्कळ वर्षांपूर्वी स्वामींनी मला सांगितले होते की, नारदाचा अंश अवतरून आपली कथा लिहील. त्यावेळी मला या पुस्तकाची माहिती नव्हती. नारदाचा कोणता अंश आमची जीवनगाथा लिहावयास येईल हे पाच वर्षानंतर आत्ता स्वामींनी दाखविले. हे आहेत श्री. अरविंद. अवतार म्हणून अवतरलेल्या स्वामींच्या जीवन कार्याचे त्यांनी या पुस्तकात वर्णन केले आहे.

* एम्.पी. पंडितांच्या 'संक्षिप्त सावित्री' पुस्तकामधून.
टीप : यापुढे ढळक अक्षरातील उतारे हे योगी अरविंदांच्या ' सावित्री ' या मूळ पुस्तकातील आहेत.
  

  
संदर्भ सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम




रविवार, २९ मार्च, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
प्रस्तावना 

            श्री अरविंदच्या 'सावित्री' या  पुस्तकातील पुष्कळ भाग अधोरेखित करून स्वामींनी दिव्य संदेश म्हणून मला दिले. मी स्वामींना विचारता स्वामी म्हणाले," मी या पुस्तकात अधोरेखित केलेल्या भागांवर आधारित तू तुझ्या जीवनाची तुलना सावित्रीच्या जीवनाशी कर."
           पुस्तक वाचायला सुरुवात केल्यानंतर मी अचंबित झाले; कारण माझी व सावित्रीची जीवनशैली समांतर आहे. मी विचार केला," श्री अरविंदना माझ्याबाबत कसे बरे ठाऊक झाले?" या पुस्तकात त्यांनी जीवात्म्याचा अंतर्गत प्रवास व सत्यप्राप्तीच्या मार्गावर येणाऱ्या अडथळ्यांचा करावा लागणारा सामना याविषयी लिहिले आहे. कुंडलिनीचे एकेक चक्रपार करून जात असता जे बदल घडतात ते अरविंद आणि सविस्तर लिहिले आहेत.

  
संदर्भ सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


गुरुवार, २६ मार्च, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
आभार 

            श्री अरविंद यांचे 'सावित्री' हे काव्य, त्यांची दूरदर्शी व स्फूर्तीदायक सत्य दृष्टी यांची, श्री वसंतसाई व वसंतसाई बुक्स अँड पब्लिकेशन ट्रस्ट कृतज्ञता व्यक्त करतात. आज हे पुस्तक त्यांच्या सावित्री मुळे अस्तित्वात आले.

          'संक्षिप्त सावित्री' हे पुस्तक लिहिणाऱ्या एम.पी. पंडितांना शतशः धन्यवाद. वसंतसाई अम्मांच्या लेखनास मार्गदर्शन करून स्फूर्ती देणाऱ्यासाठी भगवान सत्यसाईबाबांनी या पुस्तकातील काही भाग अधोरेखित केले.

           प्रिय वाचक ....
          या पुस्तकातील श्री वसंतसाई, श्री सत्यसाईबाबांचा उल्लेख स्वामी असा करतात.

  
संदर्भ सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

सोमवार, २३ मार्च, २०२६


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

प्रकरण - २

कुमारी पासून कुबेरापर्यंत 
 
            त्यानंतर आम्ही स्वामींचा फोटो व पादुका घेऊन नागरसंकिर्तन करत गावामध्ये मिरवणूक काढली. मी माझी कृष्णाची मूर्ती बरोबर घेतली. दारातच (लहान मुलगा) मणिवन्ननने माझे पाय धरले वरडत रडत 'मी तुला जाऊ देणार नाही' असे म्हणाला. मी म्हणाले," स्वामींनी मला सांगितले आहे मला गेलेच पाहिजे. ही सर्व माया आहे." माझ्या कृष्णाच्या मूर्तीला, श्री मनोहरनना  व मला हार घालण्यात आले. मी माझ्या कृष्णासोबत जीवन प्रवासाच्या पुढील टप्प्यासाठी पाऊल उचलले. मिरवणुकीच्या अग्रस्थानी असलेल्या सुवासिनी ध्यान सभागृहात पोहोचल्या. आम्ही श्री गणेशाला प्रदक्षिणा घालून ध्यान सभागृहाच्या पायऱ्या चढलो. एस. व्ही. नी दूधभात कालवला. कोदाईंनी त्याचे तीन उंडे बनवले आणि मला भरवले. ते खाऊन मी श्री मनोहर यांच्या सह सभागृहात प्रवेश केला.
             रंगीत दिव्यांच्या माळा व फुलांनी सभागृह सुशोभित केले होते. सभागृह इंद्राच्या दरबारासारखे भासत होते. लोक दोन्ही बाजूला बसली होती. व्यासपीठावर मध्यभागी स्वामींचा भव्य फोटो लावला होता. या फोटो त्यांचा उजवा हात चिन्मुद्रेत होता. त्यांच्या अनामिकेचा अग्रभाग अंगठ्यावर दाबला होता व बाकीची तीन बोटी मिटलेली होती. एका भक्ताने याचे सुंदर स्पष्टीकरण दिले. जर एखाद्याने तिन्ही गुणांवर नियंत्रण मिळवले तर जीव आणि शिव यांची मिलन होते. हे मुक्ती स्थळ आहे ती महिला भक्त म्हणाली, आम्हा तुम्ही तिन्ही गुणांवर विजय मिळवला आहेत. तुम्हाला मोक्ष प्राप्त झाला आहे आणि तुमचा भगवानांची योग झाला आहे.


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
 
जय साईराम