गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
        " प्रेमवृद्धिसाठी एका नात्याची आवश्यकता असते. परमेश्वर तुमचा एकमेव सच्चा मित्र आहे सदैव तुम्ही त्याला तुमच्या सोबत ठेवा. "
१२
कर्मसंहार 

तारीख ९ डिसेंबर २००७ 
          मी स्वामींच्या वाढदिवसाच्या उत्सवाची डिव्हीडी पहिली. त्यात स्वामींना तेल लावण्याचा पवित्र विधी केला गेला. त्या पवित्र विधीत ज्यांनी स्वामींना तेल लावले त्या प्रत्येक दांपत्याला  आशीर्वाद दिले. आम्हाला आश्चर्य वाटले की, स्वामींनी सफेद कफनी घातली नाही आणि प्रवचनही दिले नाही. ते गंभीर दिसत होते, त्यांनी बरेच केक कापले, आणि त्यांच्या खुर्चीतून व्हरांड्यात फेऱ्या मारत होते. मी मनाशीच म्हटले, ' माता ईश्वराम्मा असताना तेल लावण्याचा पवित्र विधी होत असे. ही पद्धत बंद होऊन बरीच वर्षे झाली. या वर्षी हा सोहळा का बरं झाला असेल ?'
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

रविवार, २५ सप्टेंबर, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
    " इंद्रियांकडे धाव घेणाऱ्या मनाला वैराग्याद्वारे दुसरीकडे वळवा. ही इंद्रिये शाश्वत आनंदाचे शत्रू आहेत. "
१२
कर्मसंहार 

         गेल्या वर्षी १७ नोव्हेंबरला माझं ' भगवंताचे अखेरचे ७ दिवस ' याचे इंग्लिश पुस्तक प्रकाशित झाले. त्यानंतर मला प्रशांती निलयममध्ये येण्यास बंदी घेतली गेली. 
         मी मुक्ती निलायमला परत गेले आणि असह्य यातना भोगल्या. मी माझ पेन फेकून दिले आणि सतत रडत राहिले. मी जीवनमरणाशी झगडत होते. त्या दरम्यान स्वामींनी मला अनेक गोष्टी सांगून माझी सांत्वना केली. मी तेवीस दिवस त्या व्यथेत घालवले. 
         स्वामी म्हणाले, " अर्जुनाप्रमाणे तू तूझे गांडीव फेकून दिलेस. उचल तुझ पेन आणि लिही. "
         नंतर स्वामींनी माझ्या पेनवर विभूती साक्षात् करून आशीर्वाद दिले आणि म्हणाले की मी पुट्टपर्तीत घडलेल्या यातनादायक घटना लिहाव्या. त्याच दिवशी मला बातमी मिळाली की दर्शनाचेवेळी स्वामींनी माझी चार पत्रे घेतली.    
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
 
उर्वरित प्रकरण पुढील भागात..... 
जय साईराम 

शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार -  १० जानेवारी  

" प्रेम हा भगवतप्राप्तीचा राजमार्ग आहे. "

 प्रेम हा भगवत प्राप्तीचा एकमेव मार्ग आहे. यासाठी दुसरे कुठलेही मार्ग अस्तित्वात नाहीयेत. स्वामींनी हे, "प्रेम ईश्वर आहे, प्रेमात न्हाऊन जीवन व्यतीत करा" असं नि:संदिग्धपणे सांगितलंय. भगवंत प्रेमस्वरूप आहे. आपण त्याच्यापासून जन्मतो, म्हणून आपणसुद्धा प्रेम व्हावयास हवे. ज्याच्याकडे प्रेम आहे तो सर्वत्र, सर्वकाळ केवळ प्रेम पाहतो. प्रथम आपण स्वतःस प्रेममय करावे. प्रेमाच्या अभावामुळे जा त, प्रजात, धर्म, राष्ट्र, मी आणि माझं असे अनेक भेद निर्माण होतात. माणूस विचार करतो, " हे माझं आहे आणि ते इतरांचं ." अशा संकुचित विचारांमुळे माणूस भिंती निर्माण करतो. अखिल विश्व भगवंताचा महाल आहे. तथापि मनुष्य कुंपणं घालत वेगवेगळी नावं देतो; तो म्हणतो," माझा देश, तुझा देश " वगैरे. खरंतर एका घरात अनेक खोल्या असतात. जसं की स्वयंपाक खोली, हॉल, झोपायची खोली, पाहुण्यांची खोली, आंघोळीची खोली, वगैरे. मनुष्य ज्याप्रमाणे स्वतःचं घर वेगवेगळ्या खोल्यांमध्ये विभागतो, अगदी तसंच तो भगवंताचा वैश्विक महालही विभागतो. अखिल विश्व भगवंताचा महाल आहे. 
प्रत्येक देश एक खोली आहे तसेच प्रत्येक धर्म सुद्धा खोलीच आहे. परंतु असे भेदभाव पाहिल्यामुळे प्रश्न निर्माण होतात आणि त्यांची परिणती युद्धांत होते. ह्या युद्धांमध्ये कित्येक जण हकनाक जीव गमावतात. प्राण्यांमध्ये एकमेकांबद्दल शत्रुत्व भाव असतो. मानवातही प्राण्यांच्या ह्या प्रवृत्ती असतात. तथापि प्रत्येकानं प्रेम व्हावयास हवं. जन्म मरणाच्या रोगाला प्रेम हे एकमेव रामबाण औषध आहे. सर्वांनी मायेतून जागं होऊन सर्वांवर प्रेम करायला शिका. 'मी आणि माझं' ह्या भाव तरंगांमध्ये तुमच्या प्रेमभावाला बंदिवान करू नका. तुमच्या 'मी आणि माझं' मुळे तुम्ही भगवंताच्या सुंदर महालाचे तुकडे करता. तुमच्या घरावर कोणी हल्ला केला तर तुम्ही लगेच पोलीस बोलावता. भगवंताच्या महालावर  हल्ला करून तुम्ही स्वतःसच जन्म- मरणाच्या तुरुंगात बंदी करता. सर्वोत्तम अवतार येथे अवतरला, त्यांनी शुद्ध प्रेमाची शिकवण दिली; वैश्विक कर्म आणि पापं स्वतःच्या शरीरावर घेतली. ह्या भूतलावर कोणीही तुमच्या पापांचे वाटेकरी होणार नाहीत. रत्नाकराच्या जीवनातून हे सिद्ध झाले आहे. आपल्याकडे प्रेम नसेल तर सगळे दुर्गुण आपल्यात घुसतील. ह्या दुर्गुणांमुळे होणाऱ्या पापकर्मांचे वाटेकरी तुमचे कुटुंबीय होऊ शकत नाहीत. असे असताना हा सर्वोत्तम अवतार येथे आला आणि त्यांनी तुमची पापं  आणि कर्म स्वतःवर घेतली. तुम्ही त्यांचं ऋण कसं फेडणार? ह्यासाठी एकच एक मार्ग आहे. आज तुम्ही तुमच्या कुटुंबाहेरील चार जणांवर प्रेम व्यक्त करा. उद्या आठ जणांवर. अशा रीतीने तुम्ही तुमच्या प्रेमाचं वर्तुळ मोठं मोठं करत जा. तुमच्या कर्मांचे ऋण फेडण्याचा हा एकच राजमार्ग आहे.

जय साईराम 

गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

       " दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी तुम्ही काही केले नाही तरी हरकत नाही परंतु त्यांच्या आनंदावर विरजण घालू नका. "

११

विंचवाची गोष्ट 

         परमेश्वरासाठी जगण्यात खरा आनंद आहे. भौतिक जगात जराही आनंद नाही. भौतिक जीवनाची निवड केलीत तर तुम्हाला पुनः पुनः जन्म घ्यावा लागणार. हे सत्य जाणून तुमच्या मुलांना सांगा, ' लग्नाला नाही म्हणा. वैवाहिक जीवनात कोणालाही आनंद मिळत नाही. आमच्या दुःखांकडे पहा. ' 

           तरुण मुलांना जर लग्न किंवा भौतिक जीवन नको असेल, तर त्यांना आहेत तसेच वागू द्यावे. 

          एकदा एका चांगल्या भक्ताने ' आपटसंन्यास .....' वाचले आणि ती म्हणाली, ' मला हे हवे. माझ्यावर काहीतरी दुर्दैव कोसळावे, माझ्या कुटुंबाने मला इथे आणून सोडावे किंवा मी माझ्या कुटुंबासह इथे यावे. कृपाकरुन तुम्ही काहीतरी करा. 

          सर्वांना तिच्या भक्तीचे, निश्चयाने आणि धैर्याचे खूप नवल वाटले. तिला वाटत होते, काहीतरी जीवाशी बेतणारी घटना घडावी म्हणजे ती कौटुंबिक जीवनातून मुक्त होऊ शकेल. तिची मुले अजून बरीच लहान होती. 

         एखाद्याची अशी मनःस्थिती असणे पुरेसे आहे. मग मुक्ती मिळणारच. भावनेच्या भरात कोणी प्रतिज्ञा करू नये. परंतु ईश्वरप्राप्तीची खरी तृष्णा आणि इच्छा असावी. मग परमेश्वर कर्मकायदा नक्कीच बदलू शकेल.   

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

रविवार, १८ सप्टेंबर, २०२२

 

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
       " तुमच्या प्रेमाने परमेश्वराला तुमच्याशी बोलण्यास भाग पाडले पाहिजे. " 
११
विंचवाची गोष्ट 

          एक तरुण असतो, त्याला जीवघेणा रोग झालेला असतो. तो मृत्युशी झुंज देत असतो. एक साधु त्याच्या कुटुंबाला सांगतात," हा मुलगा देवाला अर्पण करा. नाहीतर तो मृत्यु पावेल. " पालक म्हणतात, " तो आता लग्नाचा झालाय. आम्ही आमच कर्तव्य केल नाही तर समाज आम्हाला दूर लोटेल. आम्ही आमचं कर्तव्य पूर्ण करायला हव ." पालक मुलाला समोरे जावे लागणाऱ्या धोक्याचा विचार करत नाहीत. काय हा मूर्खपणा ! समाजाची आज ही स्थिती आहे.   

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

गुरुवार, १५ सप्टेंबर, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
       " तुमच्या प्रेमाने परमेश्वराला तुमच्याशी बोलण्यास भाग पाडले पाहिजे. " 
११
विंचवाची गोष्ट 

         आदिशंकरांना संन्यासी व्हायचे होते. पण त्यांची आई परवानगी देत नव्हती. एक दिवस एका मगरीने त्यांना पकडले. तेव्हा कुठे आईने त्यांना संन्यास घेण्यासाठी सम्मती दिली. आदि शंकरांची अद्वैताचे महान गुरु, आदि गुरु म्हणून प्रशंसा केली जाते. हिंदू धर्माची वर्गवारी करण्याच्या कार्यात त्यांच्या असलेला मोलाचा वाटा सर्वांना माहित आहे. जर त्यांनी आपल्या आईच ऐकल असत, तर त्याच लग्न झालं असत, त्यांना मुल असती आणि ते जगातल्या अनेक शंकरांपैकी एक म्हणून जीवन जगले असते. त्यांच जीवन कालडी नावाच्या दुर्गम खेड्यात जगाला ओळख न होताच संपले असते.   

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

रविवार, ११ सप्टेंबर, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
      " हे जग म्हणजे आपल्या भाव आणि विचारांचा आविष्कार होय. हा एक आरसा आहे. "
११
विंचवाची गोष्ट 

           वडील स्वतः भोगलेले दुःख मुलानेसुद्धा भोगावे म्हणून स्वतःहून गळ घालतात. त्यांना स्वतःचा वंश पुढे चालू रहावा आणि मुलानंतर संपू नये याचीच जास्त काळजी असते. 
          अहो महाशय ! तुम्ही तुमच्या वंशासाठी इतके धडपडताय, पण एक दिवस सगळं संपणारच आहे. तुम्ही जिवंत आहात तोपर्यंतच सर्व नाती ! मृत्युनंतर कोण कोणाचा नातेवाईक ? तुम्ही पूर्वजन्मी कोण होतात, तुम्हाला माहीत आहे का ? कदाचित तुमचा मुलगा हा पूर्वजन्मी तुमचा शत्रु असेल आणि म्हणून तुम्हाला त्याने दुःख भोगावे असे वाटत असेल ! त्याला त्याचा मार्ग निवडू द्या. जर त्याचा अध्यात्माकडे कल असेल तर त्याला प्रोत्साहन द्या. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

गुरुवार, ८ सप्टेंबर, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
        " शुद्ध अंतःकरणानी परमेश्वराची एकाग्र भक्ती केली की ज्ञान उदयास येवून ते सत्याच्या तेजाचे दर्शन घडवते.  
११
विंचवाची गोष्ट

          विंचू चावलेला माणूस म्हणतो, " खूप छान वाटत. तुम्हीपण आनंद घ्या." तो त्याच्या वेदना लपवून चेहऱ्यावर बळेच हसू आणतो. दुसरा माणूस विंचवाच्या चाव्याचा बळी होतो. तो सुद्धा सत्य सांगत नाही. त्याला वाटते, ' त्याला आनंद मिळाला आणि मला विंचू चावला ! लोकांना काय वाटेल ?' तो सर्वांना सांगतो, ' खूप छान वाटत !' मग तिसरा माणूस देवळात जातो. त्यालासुद्धा विंचू चावतो, तेव्हा तो काय करतो ? त्याला त्याला कटु अनुभव सांगायला संकोच वाटतो आणि तो म्हणतो, ' खूप छान वाटत !' अशा प्रकारे लोक स्वतःला आणि इरतांना फसवतात, माणूस त्याच्या व्यथा व शंका लपवतो. तो त्याविषयी चर्चा करत नाही. स्वामी म्हणतात की वडीलधाऱ्या माणसांचा हा स्वभाव आहे. कौटुंबिक जीवनात फसलेला कोणी सुखी आहे का ? म्हणूनच या जीवनाला ' भौतिक जीवनाचा अथांग सागर ' असे म्हटले आहे. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम  

रविवार, ४ सप्टेंबर, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
        " जोपर्यंत मनामधून पूर्णतः द्वैतभावाने उच्चाटन होत नाही तोपर्यंत सत्याची पूर्णांशाने प्राप्ती होत नाही. " 
११
विंचवाची गोष्ट 

          ही विचारधारा माणसाच्या मनात खोलवर रुजलीय. ही कर्तव्ये जर नाही पार पाडली, तर कुटुंबाला क्लेश भोगावे लागतील, तसेच ही कर्तव्ये पार पाडली तरच ते मुक्त होतील असे त्यांना वाटते. काही कुटुंबात, पालक मुलांना त्यांच्या पसंतीचे स्वातंत्र्य देतात. तरीसुद्धा, त्यांना समाजाच्या टीकेचे भय असते. 'लोक काय बोलतील ?' मुलाने लग्न नाही केले तर, मलाच दोष देतील. ' अशा प्रकारचे विचार आणि समाजाच्या निंदेचे भय त्यांना भेडसावत राहते. 
          शाश्वत काय आणि अशाश्वत काय याचा प्रत्येकानी सारासार विचार करावा. वडिलांनी असा विचार करावा, ' कौटुंबिक जीवनात मला किती दुःख भोगावे लागले ! निदान माझ्या मुलाने परमेश्वराचा मार्ग अनुसरला आहे, त्याला तरी सुखी होऊ देत. ' 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

गुरुवार, १ सप्टेंबर, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
       " जेव्हा रूप आणि भाव यांच्यामध्ये समन्वय असतो तेव्हाच आपण सत्याची अनुभूती घेतली असे म्हणू शकतो. "
११
विंचवाची गोष्ट 

           वडिलधाऱ्या लोकांच्या स्वभावाचे स्वामींनी केलेले वर्णन तंतोतंत खर आहे. हे अस प्रत्येक कुटुंबात घडतय. उदाहरणार्थ, मुले लग्नाला तयार नसतील, तरीही पालक त्यांना लग्न करायची गळ घालतात. लग्न करण्यात स्वारस्य नसलेली अशी अनेक मुले आहेत. कदाचित ते त्यांच्या पूर्वजन्मांच्या साधनेमुळे असू शकेल. परंतु पालकांना वाटते त्यांनी लग्न करावे. त्यांच्या मुलामुलींनी उच्च शिक्षण घ्यावे, मुलांना उच्च पदाची नोकरी मिळावी आणि त्यांची लग्ने झाली म्हणजे स्वतःची कर्तव्ये संपली अशी त्यांची मनोधारणा असते. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम