शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार -  १० जानेवारी  

" प्रेम हा भगवतप्राप्तीचा राजमार्ग आहे. "

 प्रेम हा भगवत प्राप्तीचा एकमेव मार्ग आहे. यासाठी दुसरे कुठलेही मार्ग अस्तित्वात नाहीयेत. स्वामींनी हे, "प्रेम ईश्वर आहे, प्रेमात न्हाऊन जीवन व्यतीत करा" असं नि:संदिग्धपणे सांगितलंय. भगवंत प्रेमस्वरूप आहे. आपण त्याच्यापासून जन्मतो, म्हणून आपणसुद्धा प्रेम व्हावयास हवे. ज्याच्याकडे प्रेम आहे तो सर्वत्र, सर्वकाळ केवळ प्रेम पाहतो. प्रथम आपण स्वतःस प्रेममय करावे. प्रेमाच्या अभावामुळे जा त, प्रजात, धर्म, राष्ट्र, मी आणि माझं असे अनेक भेद निर्माण होतात. माणूस विचार करतो, " हे माझं आहे आणि ते इतरांचं ." अशा संकुचित विचारांमुळे माणूस भिंती निर्माण करतो. अखिल विश्व भगवंताचा महाल आहे. तथापि मनुष्य कुंपणं घालत वेगवेगळी नावं देतो; तो म्हणतो," माझा देश, तुझा देश " वगैरे. खरंतर एका घरात अनेक खोल्या असतात. जसं की स्वयंपाक खोली, हॉल, झोपायची खोली, पाहुण्यांची खोली, आंघोळीची खोली, वगैरे. मनुष्य ज्याप्रमाणे स्वतःचं घर वेगवेगळ्या खोल्यांमध्ये विभागतो, अगदी तसंच तो भगवंताचा वैश्विक महालही विभागतो. अखिल विश्व भगवंताचा महाल आहे. 
प्रत्येक देश एक खोली आहे तसेच प्रत्येक धर्म सुद्धा खोलीच आहे. परंतु असे भेदभाव पाहिल्यामुळे प्रश्न निर्माण होतात आणि त्यांची परिणती युद्धांत होते. ह्या युद्धांमध्ये कित्येक जण हकनाक जीव गमावतात. प्राण्यांमध्ये एकमेकांबद्दल शत्रुत्व भाव असतो. मानवातही प्राण्यांच्या ह्या प्रवृत्ती असतात. तथापि प्रत्येकानं प्रेम व्हावयास हवं. जन्म मरणाच्या रोगाला प्रेम हे एकमेव रामबाण औषध आहे. सर्वांनी मायेतून जागं होऊन सर्वांवर प्रेम करायला शिका. 'मी आणि माझं' ह्या भाव तरंगांमध्ये तुमच्या प्रेमभावाला बंदिवान करू नका. तुमच्या 'मी आणि माझं' मुळे तुम्ही भगवंताच्या सुंदर महालाचे तुकडे करता. तुमच्या घरावर कोणी हल्ला केला तर तुम्ही लगेच पोलीस बोलावता. भगवंताच्या महालावर  हल्ला करून तुम्ही स्वतःसच जन्म- मरणाच्या तुरुंगात बंदी करता. सर्वोत्तम अवतार येथे अवतरला, त्यांनी शुद्ध प्रेमाची शिकवण दिली; वैश्विक कर्म आणि पापं स्वतःच्या शरीरावर घेतली. ह्या भूतलावर कोणीही तुमच्या पापांचे वाटेकरी होणार नाहीत. रत्नाकराच्या जीवनातून हे सिद्ध झाले आहे. आपल्याकडे प्रेम नसेल तर सगळे दुर्गुण आपल्यात घुसतील. ह्या दुर्गुणांमुळे होणाऱ्या पापकर्मांचे वाटेकरी तुमचे कुटुंबीय होऊ शकत नाहीत. असे असताना हा सर्वोत्तम अवतार येथे आला आणि त्यांनी तुमची पापं  आणि कर्म स्वतःवर घेतली. तुम्ही त्यांचं ऋण कसं फेडणार? ह्यासाठी एकच एक मार्ग आहे. आज तुम्ही तुमच्या कुटुंबाहेरील चार जणांवर प्रेम व्यक्त करा. उद्या आठ जणांवर. अशा रीतीने तुम्ही तुमच्या प्रेमाचं वर्तुळ मोठं मोठं करत जा. तुमच्या कर्मांचे ऋण फेडण्याचा हा एकच राजमार्ग आहे.

जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा