गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" कर्मफलाचा त्याग केल्यानंतरच परमेश्वर प्राप्ती होते."
 
मन आणि विषय 

            आता माझ जीवन पाहू या. मी कशी जगले ? मी जे काही बघते, त्याचा परमेश्वराशी संबंध जोडते. उदाहरणार्थ, तोच ' ट्रान्सेंडेंटल' हा शब्द घेऊया. मी हा शब्द ऐकला, आणि मला ' ट्रान्समायग्रेशन ' शब्द आठवला. प्रेमसाई भाग ३ ' साई डायजेस्ट ' या पुस्तकात एका प्रकरणात स्वामी म्हणाले, ' परमेश्वराचे ट्रान्समायग्रेशन ', " जरी खुद्द परमेश्वराने तुझ्यात परकायाप्रवेश केला तरीही तू बदलणार नाहीस. तुझ जन्मजात ज्ञान आणि सर्वांमध्ये वाटून घेण्याचा (Sharing) तुझा स्वभाव तुला सोडणार नाही. स्वामी म्हणाले की परमेश्वराने जरी कौटुंबिक विषयावर चर्चा केली तरी मी स्थितप्रज्ञच राहीन. 
          हे ज्ञान मला कसे प्राप्त झाले ? ते 'विषय ' मुळेच. मी जी गोष्ट पाहते, त्याचा परमेश्वराशी संबंध जोडते. 'योगसूत्र ' पुस्तकात सर्व भौतिक गोष्टींचा मी परमेश्वराशी संबंध कसा जोडते याविषयी लिहिले आहे. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम    

रविवार, १९ सप्टेंबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" त्याग ही सत्याची गुरुकिल्ली आहे. "
३ 
मन आणि विषय 

           तो अजून शोक व्यक्त करीत म्हणतो....
           .... अगदी परमेश्वरासोबतही 'मी आणि माझे ' आहे. मन आणि विषय नसलेली अशी कोणती जागा आहे बरं ? हे देवा, मला अशी जागा दाखव जिथे मनात विचार येणार नाहीत. मला अशी जागा दाखव जिथे शत्रुत्व, मत्सर, मी आणि माझे अस्तित्वात नाही. आम्हाला कुठे बर आश्रय मिळेल ?
            यासाठी उपाय काय बर ? तो भौतिक जीवनापासून आध्यात्मिक जीवनाकडे, परमेश्वराच्या निवासी पोहोचला. पण तिथेही तोच प्रकार.  

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम  

गुरुवार, १६ सप्टेंबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" केवळ त्याग मार्गाद्वारे परमशांती प्राप्त होते."
मन आणि विषय

           काही दिवस त्याच मन शांत होत. आता परत सुरुवात झाली. ते पुन्हा काहीतरी बोलायला लागल. तो विचार करतो,
           ' माझ आधीचं जीवनच अधिक चांगल होत. कशाला मी इथे आलो? मी माझ्या कुटुंबाबरोबर असतो, तर अधिक सुखी असतो. मी नातवंडांबरोबर खेळलो असतो....पण इथे भगवंताबरोबर असूनही शांती नाही. सर्वजण माझे दोष बघतात. परमेश्वरासोबतही मी सतत ह्या भितीत जगतोय की कदाचित मला ते इथून जायला सांगतील. '   

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

रविवार, १२ सप्टेंबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
         " अमरत्व केवळ त्यागाद्वारे प्राप्त होते. जेव्हा आपण परमेश्वरासाठी आपल्या भौतिक जीवनाचा त्याग करतो तेव्हा आपल्या कर्मांच्या परिणामाचा नाश होत. " 
मन आणि विषय 

        नंतर ... 
        ... " काल स्वामी आले आणि माझ्या शेजारच्या माणसाशी बोलले. ते माझ्याशी का बोलले नाहीत ? तो माझ्यानंतर सेवा करायला आला, म्हणजे तो सेवेत माझ्यापेक्षा कनिष्ठ आहे. स्वामी जवळ आले तेव्हा त्यांनी माझ्याकडे पाहिलेसुद्धा नाही.... तो अधिकारी माझ्याशी कठोरपणे का बोलला ? तो इतका मोठा आहे का ? मी पण त्याच्यासारखीच सेवा करतो आहे. त्याला व्हि. आय. पी. जागा का बरं ? आज सकाळी स्वामींनी त्याला बोलवल आणि त्याच्याशी कठोरपणे बोलले. तो स्वामींच्या खूप जवळ असतो, याचा त्याला खूप गर्व झालाय.... म्हणूनच आज स्वामी त्याचाशी असं बोलले ..... मी जर त्याजागी असेन तर मी खूप विचार करून वागेन !"

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात..... 
जय साईराम  

गुरुवार, ९ सप्टेंबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" केवळ त्यागमार्गाद्वारे परमशांती प्राप्त होते. " 
मन आणि विषय 

           आता त्याला नाव, रूप, स्थळ, वेळ आणि कार्याविषयी कळले, म्हणून तो आनंदी आहे. त्याला वाटते, ' हे भौतिक जीवन पुरे झाले, मी परमेश्वराजवळ जातो. ' तो त्याचा मुलगा, मुलगी यांच्याविषयीची कर्तव्ये पार पडतो आणि पत्नीसह पुट्टपर्तीला जाऊन राहतो. तिथे तो त्याची पदवी आणि त्याचे नोकरीतील उच्च अधिकारपद याविषयी सांगतो. खूप अडचणींनंतर शेवटी त्याला प्रशांती निलयममध्ये आता काम मिळते. तो सेवा सुरु करतो. त्याला आत खोलीसुद्धा मिळते. तो सर्वांना सांगतो, " मी परमेश्वरासोबत राहतो आणि त्यांची सेवा करतो ." हे तो सर्वांना अभिमानाने सांगतो. तो स्वतःशी विचार करतो, 
           " मी अगदी योग्य जागी आहे. भौतिक जगतातील लोक इतके का बरे दुःखी आहेत ? मी जगाच्या सर्व दुःखांपासून मुक्त आहे. मी परमेश्वराजवळ आलो आहे. हुश्श!! आता मी आरामात राहू शकतो. 
           ... माझी सांसारिक दुःख आता संपली. मला सकाळी आणि संध्याकाळी स्वामींचं दर्शन होत. दिवसभर मी साईराम, साईरामाचा जप करीत, त्यांच्या विचारात मग्न होऊन स्वामींची सेवा करतो. केवढी शांती !" 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

रविवार, ५ सप्टेंबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
        " छोट्या छोट्या गोष्टींचा त्याग करा आणि पाहा त्यातून तुम्हाला केवढा आनंद मिळतो. "
मन आणि विषय 

           उदाहरणार्थ, एक माणूस आहे. तो भौतिक जीवनाला कंटाळला आहे आणि आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी धडपड करतो आहे. एक दिवस त्याला एक मित्र भेटतो. तो त्याला सांगतो, " तुला माहीत आहे का परमेश्वर पृथ्वीवर अवतरला आहे ? त्याने जन्म घेतला आहे !"
" परमेश्वर ... इथे ? हे कस शक्य आहे ?"
" होय ! तो इथे आहे. मी त्याला पाहिले आहे."
" कुठे ? कुठेशी बरं ?"
" ते आंध्र प्रदेशातील पुट्टपर्ती गावात आहेत. "
" त्यांच नाव काय ? ते कसे दिसतात ?"
" त्यांच नाव आहे श्री सत्यसाईबाबा. ते भगवी कफनी घालतात आणि त्यांच्या डोक्यावर केसांचा मुकुट आहे."
" मी त्यांना पाहू शकतो का ?"
" होय, ते सकाळी आणि संध्याकाळी दर्शन देतात. "
" ते काय करतात ?"
" ते बरेच चमत्कार करतात, प्रश्न सोडवतात आणि पीडितांना दिलासा देतात."
त्या माणसाला आता मित्राकडून परमेश्वराची सर्व माहिती मिळाली. 
नाव - सत्यसाईबाबा 
रूप - भगवी कफनी, कुरळे केस. 
स्थळ - पुट्टपर्ती, आंध्र प्रदेश 
वेळ - परमेश्वराचे दर्शन - सकाळी आणि संध्याकाळी 
कार्य - परमेश्वर काय करतात - अनेक चमत्कार करतात, सर्व प्रश्न सोडवतात आणि रोगमुक्त करतात.  

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात..... 
जय साईराम 

गुरुवार, २ सप्टेंबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
    " प्रेमाद्वारे त्यागाची जोपासना होते. त्यागाद्वारे प्रेम फोफावते. "
मन आणि विषय 

         म्हणूनच मनाला विचारांचे गाठोडे म्हटले आहे. जेव्हा एक शब्द त्याला स्पर्श करतो, त्यातून विचारांचा अखंड प्रवाह चालू होतो, मग त्या विचारांशी संबंधित नावे आणि रूपे मनात उभी राहतात. आपल्याला ती जागा, ती वेळ आठवते... सर्व अगदी डोळ्यासमोर उभं राहत. अशाप्रकारे मन आणि विषय एकमेकांशी संबंधित आहेत. मन आणि विषय अतूट आहेत. जर 'मी' नसेल तर विषयही नसेल. सामान्य माणसाचे जीवन 'मी' वर केंद्रित असते, जिथे तर आणि विषय अलग करणे शक्य नाही. 
           हे दोन्ही वेगळे कसे करता येतील ? मनाला अध्यात्माकडे वळवले तरच हे शक्य आहे.
   
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात..... 
जय साईराम