रविवार, ३ मे, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय १
मानवतेचा इतिहास

             माझ्या जीवनप्रवासाचा मार्गदर्शक स्वामी, माझ्या अंतरात आहेत. ते केवळ अंतर्यामी नाही तर माझ्या बाह्य जीवनाची सोबती ही आहेत. अगदी बालवयापासून मला भगवंताशी विवाह करायचा होता. या ज्वलंत इच्छेमुळे भगवान माझे पती झाले. भगवंताने माझ्याशी विवाह केला; परंतु या सत्यापासून मी अनभिज्ञ होते. काही काळ गेल्यानंतरच स्वामींनी सांगितले की, त्यांनीच माझ्याशी विवाह केला. 
            आता आपण ११३ पानावरील उतारा पाहू.
             .....सत्यवान सावित्री दोघांना एकमेकांची ओळख पटते. आठवणींच्या पटलावर त्यांचा पूर्ण भूतकाळ दृश्यमान होतो. रूपे बदललेली पण आत्मा नाही. दोघांमधील अंतर क्षणात गळून पडते व अंतरीची खून पटवून जीव जीवनात गार्ड प्रेमाने विसावतो.



संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम