रविवार, ५ जानेवारी, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

      " आपल्या मनात येणारा प्रत्येक विचार आपण कसे जगणार हे ठरवतो. "

जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
  अध्याय - १, श्लोक - ७.

हे ब्राम्हणश्रेष्ठ! तुमच्या माहितीकरता, माझ्या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्रता असणाऱ्या  सेवाधिकार्‍यांविषयी मी तुम्हाला सांगतो.
माझ्या वडिलांच्या मनातील भाव-----
कान्हा, तू माझ्या सर्व दुर्गुणांचा नाश कर. हे करुणाकारा, करुणासागरा, प्रभू, वासुदेवा, येऊन माझ्या हृदयात वास कर. नारायणा, माझ्यावर, या दासावर तुझे प्रभुत्व ठेवण्याचा आशीर्वाद दे.
 
*    *    *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


गुरुवार, २ जानेवारी, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

      " तोंडातून येणार प्रत्येक शब्द, आपण आपले जीवन कसे जगू हे निर्धारित करतो. "

जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
  अध्याय -१ श्लोक ४-६

           कान्हा या दुबळ्यांच्या मनातील सुविचार आणि कुविचार झगडा करण्यासाठी सज्ज होऊन कवायत करत आहेत. तू माझ्या मनरूपी रथावर आरुढ होऊन सारथ्य कर. तुझ्या कृपेचा वर्षाव कर. हे देवा, तूच माझे आश्रयस्थान आहेस. शरणो शरणम् हे प्रभू, मृत्यू समय माझ्या मनात तुझाच विचार करण्याचा विचार येऊ दे. जेव्हा मी तुझा विचार करत असेल तेव्हाच मला मृत्यू  येवो. गोविंदा, नंदगोपाला, प्रभू, तू सदैव या दासा सोबत रहा. तूच माझे आश्रयस्थान आहेस शरणो शरणम्. तू लवकरात लवकर मला तुझ्या चरणांशी घेऊन दुवा दे.
           कान्हा, माझ्यातील प्रमुख योद्धांना युद्धासाठी सुसज्ज बनव. तू या युद्धाचे नेतृत्व करणारा सारथी आहेस. नारायणा, तू माझा आश्रयदाता आहेस. शरणो शरणम् प्रभु या क्षुद्र जीवाला सोडव. हे कमलनयना, कौस्तुभाभरणा तूच माझे आश्रयस्थान आहेस शरणो शरणम्. 

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, २९ डिसेंबर, २०२४

 

 

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

      " भयभीत व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही. "

जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
  अध्याय -१ श्लोक ४-६
            ज्या सैन्यामध्ये भीम आणि अर्जुन यांच्यासारखे- महापराक्रमी धनुर्धर आहेत, युयुधान विराट आणि द्रुपद यांच्यासारखे श्रेष्ठ योध्दे आहेत. दृष्टकेतू, चेकितान, काशिराज, पुरुजित, कुंतिभोज आणि शैब्य यांच्यासारखे शूरवीर बलशाली योध्दे आहेत तसेच पराक्रमी युधामन्यू, महाशक्तिशाली उत्तमौजा, सुभद्रापुत्र आणि द्रौपदीचे पाच पुत्र आहेत. हे सर्व योध्दे महारथी लढवय्ये आहेत.  

माझ्या वडिलांच्या मनातील भाव -----

            हे कान्हा, शत्रूचे सैन्य पाहून माझा थरकाप होतो आहे. नारायणा, या क्षुद्र जिवाची भीती नष्ट कर. ही भीतीच मनुष्याला पाप करण्यास प्रवृत्त करते. माझ्या अंगावर आभाळ कोसळले तरी मला भीती वाटू देऊ नकोस. हे प्रभुवरा, आपद्बंधवा, या क्षुद्रावर तू सत्ता करून आशीर्वाद दे. तूच माझा आश्रयदाता आहेस. तुझ्या ज्ञानाने सर्व इच्छांचा त्याग करून हा आत्मा आहे हे सत्य कळू दे. मनस्ताप दूर कर. युद्धासाठी सज्ज कर. मला सर्वसंगपरित्याग करून तुझ्या चरणी समर्पित होण्याची बुद्धी दे. 

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

शुक्रवार, २७ डिसेंबर, २०२४

 

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

      " भयभीत व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही. "

जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
  अध्याय - १, श्लोक २,३
           दुर्योधन पांडवांचे व्यूहरचना केलेले सैन्य पाहून द्रोणाचार्यांना म्हणाला, " अहो आचार्य! तुमचा शिष्य द्रुपदपुत्र दृष्टद्युन्म याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडवसेना पहा !"
माझ्या वडिलांच्या मनातील भाव -----

            हे कान्हा, प्रभु, माझे कुविचार माझ्या सदवृत्तींना संघर्ष करण्यासाठी ललकारत आहेत. हे गरुड वाहना, परमेश्वरा, तू माझा सारथी होऊन हे युद्धसुद्धा तूच कर. नारायणा, तूच माझे आश्रयस्थान आहेस. शरणम् शरणम्. तू जर या दीनदुबळ्या मनामध्ये निवासास आलास तर ' मी आणि माझे ' पळ काढतील व कुठेतरी लपून बसतील. ये ये वासुदेवा, तूच माझे आश्रयस्थान आहेस. शरणो शरणम्.
कान्हा, तुझ्या कृपेने मला पांडवांचे बलाढ्य सैन्य दाखव. भय दूर कर. आदिनारायणा ! शुभाशुभ प्रसंगी मन समतोल राहण्यासाठी शक्ती दे. एका शब्दासाठी मनाचा एवढा गोंधळ का होऊ दिलास माधवा ! दृढ मन दे . दिनरक्षणा, दयाळा. तूच सर्वांचा कर्ता. तुझ्याविना अणुसुध्दा हलणार नाही. या गरिबाला निमित्तमात्र बनव. दृष्ट विचार नष्ट कर. प्रभू, तूच माझा आधार ! शरणो शरणम्.

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

शनिवार, २१ डिसेंबर, २०२४

 

                  ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
                                 सुविचार 
 

      " भयभीत व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही. "

जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
  अध्याय -१, श्लोक -१
             धृतराष्ट्र म्हणाले, " हे संजया ! कुरुक्षेत्राच्या पवित्र भूमीवर युद्धाच्या ईर्ष्येने जमलेल्या माझ्या आणि पांडुच्या मुलांनी काय केले ?"
माझ्या वडिलांच्या मनातील भाव-----
             कृष्णा! गोपाळा ! गोविंदा ! हे शरीर क्षेत्र आहे आणि याद्वारेच मोक्षप्राप्ती करता येते, याचे ज्ञान या दिनाला दे. या शरीरातील सद्गुण आणि दुर्गुण यामध्ये सतत संघर्ष पेटता ठेवून तू माझ्या मनात वास कर. सद्गुणांना सन्मार्ग दाखवून, जागृती निर्माण करून, हा जीवनरथ तू हाक. नारायण, हा श्वान तुमच्या आश्रयाला आला आहे. रक्षण करून उद्धार कर. कान्हा! आधार केवळ तू! शरणो शरणम्.
*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

शुक्रवार, २० डिसेंबर, २०२४


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

      " भयभीत व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही. "

जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
             त्यांनी कुटुंबीयांसाठी प्रार्थनेत सहभागी होण्यास प्रोत्साहन दिले आणि त्यांना स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगणाऱ्या गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील श्लोक शिकवले. त्यांनी आम्हाला भक्तलक्षणे वर्णन करणारा १२ वा अध्याय तसेच पुरुषोत्तम योगावरील १५ व अध्यायही शिकवला. आश्रमातील आम्ही २रा व १२ वा अध्याय आलटून पालटून म्हणतो.
             माझ्या वडिलांचे जीवन म्हणजे भगवद्गीतेतील वर्णिलेल्या सर्व १८ योगांचे आदर्श उदाहरण होते.
             आता स्वामींनी माझ्या वडिलांच्या १९५३ च्या डायरीतून काय सूचित केले आहे ते पाहू या.
             माझे वडील रोज गीतेचा एक श्लोक लिहित व त्यातून उमलणाऱ्या भावांची नोंद करीत. माझ्या वडिलांनी १ जाने १९५३ ला ११ व्या अध्यायातील पहिल्या श्लोकाने ही रोजनिशी लिहिण्यास सुरुवात केली. १६ ऑक्टो. १९५३, सरस्वती पूजनाच्या दिवशी त्यांनी गीतेच्या १८ व्या अध्यायातील ७८ व्या श्लोकाने हे लिखाण पूर्ण केले. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांनी १ ल्या अध्यायातील पहिल्या श्लोकाने सुरुवात केली. अशा प्रकारे ते डायरी लिहीत. या छोट्या पुस्तकातही आम्ही गीतेतील श्लोक जसे आहेत तसे मांडले आहेत.

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, १५ डिसेंबर, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

      " भयभीत व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही. "

जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
वेळापत्रक
 
४. २०                 -  उठणे, उच्चारण आणि नमस्कार
४. ४५ ते ५. ३०    - प्रार्थना, फुले वेचणे, उदबत्ती लावणे, अर्चना
५. ३० ते ६. ०५    - ध्यान आणि पूजा
७. ३० - नाश्ता
७. ३० ते ९. १५    - बाहेरची कामे
१०. ०० ते १२. ०० - नालयीरा दिव्य प्रबंधम आणि तिरुवैभो यासारख्या पवित्र ग्रंथांचे वाचन.
१२. ०० ते १२. १५ - भोजन
१. ०० ते २. ००     - वामकुशी
२. ०० ते ३. ००    - मुलांबरोबर भगवद्गीतेचे पठण
३. १५ ते ३. ४५   - लिखित जप व तुळशीला पाणी  घालणे
५. ०० ते ७. ००   - शेतांमधून एक मैलाचा फेरफटका
६. ०० ते ६. ३०   - शेतामध्ये ध्यान
७. ०० ते ८. ००   - श्रीरंग विलासमध्ये प्रार्थना आणि वैद्यकीय सेवा
८. ०० ते ९. ००   - स्नान, प्रार्थना, भोजन
९. ०० ते १०. ०० -
आळ्वारच्या गीतांचे वाचन, सूतकताई
१०. ००              - झोप.


संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम