रविवार, २९ डिसेंबर, २०२४

 

 

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

      " भयभीत व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही. "

जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
  अध्याय -१ श्लोक ४-६
            ज्या सैन्यामध्ये भीम आणि अर्जुन यांच्यासारखे- महापराक्रमी धनुर्धर आहेत, युयुधान विराट आणि द्रुपद यांच्यासारखे श्रेष्ठ योध्दे आहेत. दृष्टकेतू, चेकितान, काशिराज, पुरुजित, कुंतिभोज आणि शैब्य यांच्यासारखे शूरवीर बलशाली योध्दे आहेत तसेच पराक्रमी युधामन्यू, महाशक्तिशाली उत्तमौजा, सुभद्रापुत्र आणि द्रौपदीचे पाच पुत्र आहेत. हे सर्व योध्दे महारथी लढवय्ये आहेत.  

माझ्या वडिलांच्या मनातील भाव -----

            हे कान्हा, शत्रूचे सैन्य पाहून माझा थरकाप होतो आहे. नारायणा, या क्षुद्र जिवाची भीती नष्ट कर. ही भीतीच मनुष्याला पाप करण्यास प्रवृत्त करते. माझ्या अंगावर आभाळ कोसळले तरी मला भीती वाटू देऊ नकोस. हे प्रभुवरा, आपद्बंधवा, या क्षुद्रावर तू सत्ता करून आशीर्वाद दे. तूच माझा आश्रयदाता आहेस. तुझ्या ज्ञानाने सर्व इच्छांचा त्याग करून हा आत्मा आहे हे सत्य कळू दे. मनस्ताप दूर कर. युद्धासाठी सज्ज कर. मला सर्वसंगपरित्याग करून तुझ्या चरणी समर्पित होण्याची बुद्धी दे. 

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा