शुक्रवार, २७ डिसेंबर, २०२४

 

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

      " भयभीत व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही. "

जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
  अध्याय - १, श्लोक २,३
           दुर्योधन पांडवांचे व्यूहरचना केलेले सैन्य पाहून द्रोणाचार्यांना म्हणाला, " अहो आचार्य! तुमचा शिष्य द्रुपदपुत्र दृष्टद्युन्म याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडवसेना पहा !"
माझ्या वडिलांच्या मनातील भाव -----

            हे कान्हा, प्रभु, माझे कुविचार माझ्या सदवृत्तींना संघर्ष करण्यासाठी ललकारत आहेत. हे गरुड वाहना, परमेश्वरा, तू माझा सारथी होऊन हे युद्धसुद्धा तूच कर. नारायणा, तूच माझे आश्रयस्थान आहेस. शरणम् शरणम्. तू जर या दीनदुबळ्या मनामध्ये निवासास आलास तर ' मी आणि माझे ' पळ काढतील व कुठेतरी लपून बसतील. ये ये वासुदेवा, तूच माझे आश्रयस्थान आहेस. शरणो शरणम्.
कान्हा, तुझ्या कृपेने मला पांडवांचे बलाढ्य सैन्य दाखव. भय दूर कर. आदिनारायणा ! शुभाशुभ प्रसंगी मन समतोल राहण्यासाठी शक्ती दे. एका शब्दासाठी मनाचा एवढा गोंधळ का होऊ दिलास माधवा ! दृढ मन दे . दिनरक्षणा, दयाळा. तूच सर्वांचा कर्ता. तुझ्याविना अणुसुध्दा हलणार नाही. या गरिबाला निमित्तमात्र बनव. दृष्ट विचार नष्ट कर. प्रभू, तूच माझा आधार ! शरणो शरणम्.

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा