ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" स्वतःमध्ये परिवर्तन घडवले तर सर्व विरोध आणि तिरस्कार नाहीसा झाल्याचे आढळून येईल."
प्रकरण सहा
मंत्र
मी भगवान श्री सत्य साई बाबा ह्या रूपाची भक्ती केली. त्यांना मी सर्वव्यापी, सर्वशक्तीमान आणि सर्वज्ञ म्हणून प्रकट केले. निर्मितीच्या प्रत्येक अंशामध्ये मी त्यांना पाहते. सर्वकाही परमेश्वरच आहे . केवळ या साक्षात्कारापासून सर्वांमध्ये एकच आत्मा आहे हे ज्ञान मिळेल आणि तेच नवनिर्मिती आणि वैश्विक मुक्तीप्रत घेऊन जाईल.
मला १०८ दिव्य नामे बहाल करताना स्वामी म्हणाले," आजपर्यंत परमेश्वराने कोणालाही अशी दिव्य नामे बहाल केलेली नाहीत. ह्या नामातूनच माझे तुझ्यावरील आणि तुझे माझ्यावरील प्रेम दिसून येते. तुझ्या प्रेमानेच ती नामे देण्यास मला प्रेरित केले. तुझ्या अपरिमित प्रेमामुळे ती नामे बहाल करण्याची इच्छा माझ्या मनात जागृत झाली ".
परमेश्वराने कोणालाही १०८ दिव्यनामे दिलेली नाहीत. असा मंत्रही दिलेला नाही. ह्या सर्व गोष्टी हेच दर्शवितात, की मी त्यांचीच आहे.
उर्वरित प्रकरण पुढील भागात ......
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा