रविवार, २९ जानेवारी, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

            " जर तुम्ही सर्वांवर भरभरून प्रेम केलेत तर तेच प्रेम  तुमच्याकडे येईल. "

प्रकरण सहा 

मंत्र 

राधा - कृष्ण प्रेमाचे सामर्थ्य 
१४ सप्टेंबर २००८
वसंता : स्वामी, प्लिज मला मंत्राविषयी काही सांगा ना !
स्वामी : हा मंत्र म्हणजे राधाकृष्ण मंत्र, शिवशक्ती मंत्र, पुरुष प्रकृती मंत्र आणि सृष्टी मंत्र आहे. तेथे केवळ ' ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः ' हा एकच मंत्र असेल. तेथे ना राधाकृष्ण मंत्र असेल ना प्रेमाराजा मंत्र. तुझे अश्रू आणि तुझी तळमळ ह्यातून या मंत्राची निर्मिती झाली आहे. केवळ नवनिर्मिती करण्यासाठी आपण येथे अवतरलो आहोत. 
ध्यान समाप्ती.  
                राधा कृष्णाचे प्रेम हाच या नवनिर्मितीचा पाया आहे. राधेच्या कृष्णाप्रति असणाऱ्या प्रेमाचा देहभावाशी संबंध नाही. ते एकत्वाचे तत्व आहे. राधेला वाटे, " कृष्ण जिथे जिथे असेल तिथे त्याच्याशी एकरूप व्हावे." राधेची ही उत्कट इच्छा बाह्यरूपात व्यक्त न झाल्यामुळे ती भावनिक स्तरावरच राहिली. हे माझ्या स्वामींप्रति असणाऱ्या प्रेमाचे स्वरूप आहे. मी म्हणते," मला स्वामी हवेत, स्वामी हवेत." अखिल निर्मितीत अस्तित्वात असलेल्या स्वामींच्या स्थूल रूपाशी एक होण्याची मला तृष्णा आहे. सृष्टी म्हणजे स्वामीच !
                लहानपणी मला कृष्णाशी लग्न करायचे होते. ह्या इच्छेने वैश्विक रूप धारण केले आणि सत्ययुगाची निर्मिती झाली. ह्यातूनच नवनिर्मितीसाठी पुरुष - प्रकृती तत्व बनले. येथे सत्य आणि प्रेम प्रत्येकामध्ये आणि प्रत्येक गोष्टीत प्रवेश करेल. हे वसंतमयम आहे. हा या मंत्राचा पाया आहे आणि म्हणून स्वामींनी याला ' सत्ययुगाचा मंत्र ' असे संबोधले. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा