रविवार, ३० एप्रिल, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

" प्रेमाविना जीवन म्हणजे मृत्यूच."

प्रकरण आठ 

प्रेमभाव रूप धारण करतात

               प्रल्हादाच्या श्रद्धा भक्तीमुळे खांबातून नृसिंह अवतार प्रकार झाला. रासलीलेमध्ये प्रत्येक गोपीसाठी एक कृष्ण आला, तो केवळ त्यांच्या प्रेमामुळे. प्रेमसाई अवतार होणार आहे तो मातृभावामुळे. आपल्या मनामध्ये खोलवर ठसलेले भाव रूपे धारण करतील. एका विचारामधून विश्व दृगोचर होते. गाढ झोपेमध्ये विश्वाचे अस्तित्व नसते. तथापि आपण जेव्हा जागे असतो तेव्हा आपल्याला विश्व दिसते. आपल्या मनात जे बिंबलेले असते तेच आपल्याला स्वप्नात दिसते. 
               तुर्यावस्था म्हणजे आनंद अवस्था. या अवस्थेत ना विचार असतात ना मनातील खोल ठसे. त्यावेळेस डोळ्यासमोर काहीही येत नाही. असते ती फक्त परमेश्वराची अनुभूती आणि परमानंद ! जिथे विचार असतात तिथे रूप निर्माण होते आणि म्हणून विचारांचा त्याग म्हणजेच मोक्ष. हीच इथेच, याक्षणी, मुक्ती आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

गुरुवार, २७ एप्रिल, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार
           " जर तुम्ही सर्वांवर भरभरून प्रेम केलेत तर तेच प्रेम तुमच्याकडे येईल."

प्रकरण आठ 

प्रेमभाव रूप धारण करतात 

                मला फक्त स्वामी हवेत; कारण मी स्वामींपासून विलग होऊन या जगात जन्म घेतला आहे. मला त्यांच्याशिवाय दुसरे काहीही नको. देहासाठी आवश्यक असे अन्न आणि झोपसुद्धा नको . मग आश्रम आणि ही पुस्तके यांचा तर प्रश्नच येत नाही. हे सर्व कोणासाठी आहे ? मी अशी का आहे ? केवळ या भूलोकावरील सर्व जीवांनाच नाही, तर पिशाच्चयोनी व इतर सर्व योनीतील सर्वांना मुक्ती मिळावी, हे भाव माझ्यात कोठून आले ? हे सर्व स्वामींकडून आले. सर्वांना लाभ व्हावा, हे माझ्या प्रेमतपाचे एकमात्र कारण आहे. 
                  भाव रूप कसे धारण करतात ? तिसऱ्या पुस्तकात मी एक उदाहरण दिले आहे. एकदा एक मुलगा शाळेतून परत येत होता. पोलिसांची जीप त्याचा पाठलाग करत असल्याचे त्याने पाहिले. त्याने रडून आरडाओरडा केला. घरातील सर्वजण बाहेर येऊन पाहू लागले, परंतु त्यांना काहीच दिसले नाही. तथापि त्या मुलाने त्यांना सर्व सांगून तो घरात लपून बसला. तिथे कोणीही नव्हते, मग तो का बरं पोलिसांची जीप रस्त्याच्या मध्यावर आहे असे म्हणत होता ? त्याच्या विचारांनी, बाहेर रूप धारण केले. त्यांच्या मनात खोलवर ठसलेल्या विचारांनी बाहेर धारण केलेत ते रूप भीतीवर आधारित होते. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 


गुरुवार, २० एप्रिल, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

             " जर तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन घडवले तर सर्व विरोध आणि तिरस्कार नाहीसा झाल्याचे आढळून येईल." 

प्रकरण आठ 

प्रेमभाव रूप धारण करतात 

                 या दृश्यानंतर प्रत्येक ध्यानात स्वामी आणि मी रुपेरी बेटावरच भेटत होतो. बोलत होतो. येथे स्वामींबरोबर मी आनंदानुभवांची अनुभूती घेतली. जेव्हा मी मुक्तीनिलयममध्ये राहायला आले तेव्हा स्वामी म्हणाले, " मुक्ती निलयम हेच रुपेरी बेट आहे."
                 माझी आताची आणि तेव्हाची मनःस्थिती सारखीच आहे. ती कधीही बदलणार नाही. आजही मी तेच म्हणते," मला गर्दी नको. मला आश्रम नको. नावलौकिक, पुस्तके काहीही नको. मला फक्त स्वामी हवेत." 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

रविवार, १६ एप्रिल, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

           " प्रत्येकाचा स्वतःचा व्यक्तिगत स्वभाव असतो व त्यानुसार भक्तीचे रूप आणि पद्धत बदलते."

प्रकरण आठ 

प्रेमभाव रूप धारण करतात 

                 दिव्य दृश्य
                 समुद्रामध्ये एक नाव आहे. स्वामी आणि मी त्यामध्ये बसलो आहोत. नाव वल्ह्याविनाच पुढे जात आहे. ती नाव एका बेटापाशी थांबते. आम्ही खाली उतरून बेटावर फेरफटका मारतो. तिथे एक सुंदर फुलबाग आहे. त्यामध्ये विविध प्रकारची गुलाबाची फुले, लता, वेली आणि कमानी आहेत. एका सुशोभित कमानीखाली एक सुंदर झोपाळा आहे. मी गाणं म्हणते, 
                  हे लहरींनो ! या, या, माझ्या स्वामींसाठी एक पुष्प घेऊन या... 
                  असे म्हणताक्षणीच स्वामींच्या चरणावर एक कमलपुष्प दृश्यमान होते. 
स्वामी - पाहिलंस ? पुष्पाचा तू विचार केल्याक्षणी कमलपुष्प आले. 
वसंता - हा तुमचा संकल्प आहे स्वामी !
स्वामी - या सागरचं पाणी पिऊन बघ... 
                  ज्याअर्थी स्वामी सांगताहेत त्याअर्थी नक्की काहीतरी विशेष असणार. मी ओंजळीत पाणी घेतले आणि प्यायले. आहाहा ! हे समुद्राचे पाणी नाही, हे तर शहाळ्याचं मधुर पाणी आहे. 
वसंता - स्वामी, तुम्ही समुद्राच्या पाण्याचं शहाळ्याच्या पाण्यात रूपांतर केलंत. स्वामींच्या या चमत्काराने मी स्तिमित होते. मला दिव्यानंदाचा लाभ होते. 
स्वामी - हे बेट मी केवळ तुझ्या एकटीसाठी निर्माण केले आहे. इथे तुला अनेक चमत्कार पहायला मिळतील. 
ध्यान समाप्ती 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, १३ एप्रिल, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

          " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

प्रकरण आठ 

प्रेमभाव रूप धारण करतात

                 हे संभाषण इथेच, याक्षणी मुक्ती भाग ३ या पुस्तकात लिहिले आहे. त्यावेळेस मी रडतही होते. मला गर्दी नको . कोणीही माझ्याजवळ येऊ नये . मला फोन नकोत, पत्रं नकोत. मला जेवण नको, झोप नको. मला काही लिहायचेही नाही.' आपण दोघांनीच चोवीस तास एकमेकांशी बोलत राहवं ' मला फक्त हेच हवं आहे. 
                स्वामींशी एकांतात बोलण्याची माझी अनेक वर्षांची तळमळ पाहून स्वामींनी मला एक दृश्य दाखवले. ते मला म्हणाले," माझ्याबरोबर ये, मी तुला एक ठिकाण दाखवतो." 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साई राम 

रविवार, ९ एप्रिल, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" अळीपासून ब्रम्हापर्यंत सर्वांमध्ये परमेश्वराचे प्रतिबिंब पाहा." 

प्रकरण आठ 

प्रेमभाव रूप धारण करतात

३० जून २००१ ध्यान 
वसंता - स्वामी, काल रात्री बऱ्याच जणांचे फोन आल्यामुळे मी तुमच्याशी बोलू शकले नाही. तुम्ही माझ्याबरोबर किमान एक संपूर्ण दिवस, २४ तास राहणार नाही का ?
स्वामी - मी तर सदैव तुझ्याचबरोबर आहे. 
वसंता - स्वामी .... मग मला तुमच्याबरोबर फक्त ध्यानातच का बरं बोलता येतं ?
स्वामी - जेव्हा तू ध्यानमग्न असतेस तेव्हा आपण व्दैतावस्थेत असतो. एरवी मी तुझ्या अंतर्यामीच असतो. तुझा देह माझेच रूप आहे. त्या देहामध्ये मीच आहे. जो बोलतो, कर्म करतो तो कर्ता करविता मीच आहे. 
वसंता - स्वामी या अवस्थेमध्ये मी अनुभूती घेऊ शकत नाही. काल रात्री तुमच्याशी बोलण्यासाठी मी तळमळत होते. पण रात्री इतके फोन आले की मी दमले आणि झोपून गेले. स्वामी, निदान एक दिवस तरी इथे कोणी येऊ नये, कोणाचा फोन येऊ नये, पत्रं येऊ नयेत . पुस्तकं, डायरी, भोजन, झोप काहीही नको. फक्त आपण दोघं एकमेकांशी गप्पा मारू. स्वामी, प्लीज एक दिवस तरी तुम्ही मला एकटीला द्या ना. 
स्वामी - तुझा त्याग पराकोटीचा आहे. इंद्राला आपण पाठीचा कणा दान करण्यासाठी दधिची ऋषींनी प्राणत्याग केला. ती त्यांच्या त्यागाची परिसीमा होती. परंतु तू तर प्रत्येक क्षणी शक्य असलेल्या सर्व मार्गांनी परमेश्वरावर प्रेमाचा करते आहेस. तू विश्वकल्याणासाठी, तसेच सर्व जीवांच्या उद्धारासाठी तुझ्या तपोबलाचा त्याग करते आहेस. जगामध्ये असे कोणीही केले नाही . जगाच्या उद्धारासाठी तुझ्या प्रेमतपाचा तू त्याग करते आहेस. 
ध्यान समाप्ती 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम 

गुरुवार, ६ एप्रिल, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

 सुविचार 

          " अज्ञानाचा बुरखा पांघरल्यामुळे आपण इतरांना आपल्यापासून वेगळे समजतो."

प्रकरण आठ 

प्रेमभाव रूप धारण करतात 

               " माझा प्रेमभाव ओसंडून वाहत आहे. पण तो व्यक्त कसा करावा हेच मला माहिती नसल्यामुळे कधी मी रडते, तर कधी हसते. जेव्हा मी एकटी असते तेव्हा मी नेहमीच स्वामींसाठी रडत असते. मला कोणाशी बोलावेसेही वाटत नाही." 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

रविवार, २ एप्रिल, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

           " अज्ञानाचा बुरखा पांघरल्यामुळे आपण इतरांना आपल्यापासून वेगळे समजतो."

प्रकरण सात 

मंगळसूत्राची देवघेव 

                   लिहिलेले प्रत्येक पुस्तक व मी जे काही लिहिते ते सर्व विसरुन जाते. आत्मचरित्रासाठी महत्वाच्या घटना लिहिताना माझ्या असे लक्षात आले की माझे जीवन सामान्य नाही. मी इतरांहून वेगळी  आहे. मला भौतिक जीवनाचे आकर्षण नाही. मी परमेश्वरासाठी जन्मले आणि त्याला प्राप्त केले. परंतु जर इतरांना मुक्तीची अनुभूती मिळणार नसेल तर मला मुक्ती नको. संपूर्ण जग दुःख भोगत असेल, तर मी एकटीनेच परमेश्वराची अनुभूती का घ्यावी ?
                   भौतिक जीवनात लोकांना स्वतःसाठी पैसा, गाडी, पद, प्रतिष्ठा हवी असते. आध्यात्मिक जीवनातही अनेकांना नावलौकिक आणि भक्त हवे असतात. माझ्या तरुण वयातच मी भौतिक आनंदाकडे पाठ फिरवली. आता मी आध्यात्मिक जीवनातीलही सर्व पदांचा त्याग केला. का ? का ? का ? 
केवळ सर्वांच्या मुक्तीसाठी ! 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम