रविवार, १६ एप्रिल, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

           " प्रत्येकाचा स्वतःचा व्यक्तिगत स्वभाव असतो व त्यानुसार भक्तीचे रूप आणि पद्धत बदलते."

प्रकरण आठ 

प्रेमभाव रूप धारण करतात 

                 दिव्य दृश्य
                 समुद्रामध्ये एक नाव आहे. स्वामी आणि मी त्यामध्ये बसलो आहोत. नाव वल्ह्याविनाच पुढे जात आहे. ती नाव एका बेटापाशी थांबते. आम्ही खाली उतरून बेटावर फेरफटका मारतो. तिथे एक सुंदर फुलबाग आहे. त्यामध्ये विविध प्रकारची गुलाबाची फुले, लता, वेली आणि कमानी आहेत. एका सुशोभित कमानीखाली एक सुंदर झोपाळा आहे. मी गाणं म्हणते, 
                  हे लहरींनो ! या, या, माझ्या स्वामींसाठी एक पुष्प घेऊन या... 
                  असे म्हणताक्षणीच स्वामींच्या चरणावर एक कमलपुष्प दृश्यमान होते. 
स्वामी - पाहिलंस ? पुष्पाचा तू विचार केल्याक्षणी कमलपुष्प आले. 
वसंता - हा तुमचा संकल्प आहे स्वामी !
स्वामी - या सागरचं पाणी पिऊन बघ... 
                  ज्याअर्थी स्वामी सांगताहेत त्याअर्थी नक्की काहीतरी विशेष असणार. मी ओंजळीत पाणी घेतले आणि प्यायले. आहाहा ! हे समुद्राचे पाणी नाही, हे तर शहाळ्याचं मधुर पाणी आहे. 
वसंता - स्वामी, तुम्ही समुद्राच्या पाण्याचं शहाळ्याच्या पाण्यात रूपांतर केलंत. स्वामींच्या या चमत्काराने मी स्तिमित होते. मला दिव्यानंदाचा लाभ होते. 
स्वामी - हे बेट मी केवळ तुझ्या एकटीसाठी निर्माण केले आहे. इथे तुला अनेक चमत्कार पहायला मिळतील. 
ध्यान समाप्ती 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा