रविवार, ९ एप्रिल, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" अळीपासून ब्रम्हापर्यंत सर्वांमध्ये परमेश्वराचे प्रतिबिंब पाहा." 

प्रकरण आठ 

प्रेमभाव रूप धारण करतात

३० जून २००१ ध्यान 
वसंता - स्वामी, काल रात्री बऱ्याच जणांचे फोन आल्यामुळे मी तुमच्याशी बोलू शकले नाही. तुम्ही माझ्याबरोबर किमान एक संपूर्ण दिवस, २४ तास राहणार नाही का ?
स्वामी - मी तर सदैव तुझ्याचबरोबर आहे. 
वसंता - स्वामी .... मग मला तुमच्याबरोबर फक्त ध्यानातच का बरं बोलता येतं ?
स्वामी - जेव्हा तू ध्यानमग्न असतेस तेव्हा आपण व्दैतावस्थेत असतो. एरवी मी तुझ्या अंतर्यामीच असतो. तुझा देह माझेच रूप आहे. त्या देहामध्ये मीच आहे. जो बोलतो, कर्म करतो तो कर्ता करविता मीच आहे. 
वसंता - स्वामी या अवस्थेमध्ये मी अनुभूती घेऊ शकत नाही. काल रात्री तुमच्याशी बोलण्यासाठी मी तळमळत होते. पण रात्री इतके फोन आले की मी दमले आणि झोपून गेले. स्वामी, निदान एक दिवस तरी इथे कोणी येऊ नये, कोणाचा फोन येऊ नये, पत्रं येऊ नयेत . पुस्तकं, डायरी, भोजन, झोप काहीही नको. फक्त आपण दोघं एकमेकांशी गप्पा मारू. स्वामी, प्लीज एक दिवस तरी तुम्ही मला एकटीला द्या ना. 
स्वामी - तुझा त्याग पराकोटीचा आहे. इंद्राला आपण पाठीचा कणा दान करण्यासाठी दधिची ऋषींनी प्राणत्याग केला. ती त्यांच्या त्यागाची परिसीमा होती. परंतु तू तर प्रत्येक क्षणी शक्य असलेल्या सर्व मार्गांनी परमेश्वरावर प्रेमाचा करते आहेस. तू विश्वकल्याणासाठी, तसेच सर्व जीवांच्या उद्धारासाठी तुझ्या तपोबलाचा त्याग करते आहेस. जगामध्ये असे कोणीही केले नाही . जगाच्या उद्धारासाठी तुझ्या प्रेमतपाचा तू त्याग करते आहेस. 
ध्यान समाप्ती 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा