ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आधिभौतिक गोष्टींमधून मिळणारी शांती खरी नाही हे जेव्हा मानवाला कळून येते व तो खऱ्या शांतीचा स्तोत्र शोधू लागतो, तेव्हा त्याचा आध्यात्मिक प्रवास सुरु होतो. "
प्रकरण नऊ
साधनपथवरील पत्रे
माझ्या प्रेमभगवानांच्या दिव्य चरण कमली
अनंत कोटी प्रणाम !
पर्तीमध्ये पहिल्यांदाच तुम्ही स्वहस्ते माझ्या हातातील पत्र घेतल्याबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे. प्रभू ! त्यादिवशी मला तुमच्या चेहऱ्यावरील हर्षभरित स्मिताचा अर्थ उलगडला. गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या मनात, तुम्ही मला ओळखत नाही अशी तळमळ लागून राहिली होती. तुम्ही मला पादनमस्कार दिलात. मी फक्त भाव जाणते. ध्यानातील दृश्यात, तुम्ही मला पिवळ्या कफनीमध्ये दर्शन दिलेत. तुमचे मनमोहक स्मित, सुंदर मुखकमल आणि करुणदृष्टी यावरून माझी नजर हालतच नव्हती. हे तुम्ही जाणताच आणि म्हणूनच पादनमस्कार घेण्यास मला उशीर लागला. तुम्ही सुद्धा एवढा वेळ माझ्यासमोर उभे राहिलात. या अपार करुणेसाठी मी काय करू ? प्रत्येक क्षण परम आनंदाने भरून टाका. आज आम्ही तुमच्या पादुकांचे नानाविध उपचार करून पूजन करणार आहोत. कृपया त्याचा स्वीकार करा आणि विभूती, कुंकू, चंदन, मध सृजित करून सर्वांची हृदये आनंदाने भरून टाका. प्रभू, मी असं ऐकलं की मदुराईतील एका घरात तुम्ही अनेक लीला करत आहात. तुम्ही त्यांच्या भिंतीवर ' गोकुलम ' लिहिले आहे. मग त्याप्रमाणे तुम्ही इथे ' वृंदावन, ती राधा आहे.' असे का लिहीत नाही ? मी म्हटले होते, की मी तुमच्याकडे कुरकूर करणार नाही परंतु माझे मन अत्यंत लोभी आहे. इतरांचे अनुभव ऐकून आनंद घेण्यासाठी ते नेहमीच आतुर असते. मला दिव्यानंदाची अनुभूती द्या. माझ्यावर तुमच्या कृपेचा वर्षाव करा. आणि मला कान्हाच्या हातातले लोणी बनवा. कृपया तुमच्या हातांनी तुम्ही इथे संदेश लिहा. मला ह्या आनंदाचाही लाभ मिळू दे. मला खूप दर्शने द्या. माझ्याशी बोला. तुम्हाला आनंद आणि समाधान मिळेल अशी माझी वर्तणूक असावी आणि त्यासाठी तुम्ही मला आशीर्वाद द्या. तुमच्याशिवाय या जगात माझे दुसरे कोण आहे ? सदैव माझ्या बरोबर राहा. कधीही मला सोडू नका. कृपा करून मला असा वर द्या, की तुम्ही क्षणभरही माझ्यापासून वेगळे होणार नाही. मला तुम्ही हवे आहात, फक्त तुम्ही.
लोका समस्ता सुखिनो भवन्तु
तुमची प्रिय राधा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा