ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" परमेश्वरापासून तुम्हाला जे काही दूर ठेवते तो सर्व माया आहे."
प्रकरण दहा
पार्वती
नूतन वेदमार्ग
वैकुंठ एकादशीच्या दिवशी वडक्कमपट्टीच्या ध्यान मंदिरात यज्ञ करण्यासाठी आम्ही चार यज्ञकुंड तयार केली.
दुपारच्या ध्यानात स्वामी म्हणाले,
" या अगोदर तू पंचाग्नी तप केलेस. त्यावेळेस तुला शक्ती प्राप्त झाल्या. आता त्याच शक्ती चार वेदांप्रमाणे या चार यज्ञकुंडात भरून राहतील. तू वेदनायकी आहेस. तुझ्या कार्यातील मदतनीसांनी समिधा म्हणून ह्या यज्ञामध्ये जगाची कर्मे अर्पण करून भस्म करायची आहेत. ते तुला तुझ्या कार्यात सहाय्य करतील. तुझ्या चहुबाजूंनी वेदांचा उद्भव होतो आहे. हे नवीन वेद आहेत. हा नूतन वेदमार्ग जगाला ज्ञात होणार आहे.
' बनारसमध्ये पार्वती मृतांच्या आत्म्यांना भगवान शिवाकडे घेऊन जाते. शिव त्यांच्या कानात पवित्र मंत्रांचे उच्चारण करून मुक्ती देतात. इथे मुक्ती निलयममध्ये आपण सजीवांच्या आत्म्यांना मुक्ती देऊ."
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा