ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" प्रथम भाव उमजतात व नंतर विचार. आपण कृती करण्याआधी सारासार विचार करावा. हे चांगले आहे कां ? याने मला भगवत् प्राप्ती होईल कां ? "
प्रकरण दहा
पार्वती
तद्नंतर दुपारी यज्ञविधीला उपस्थित असणारे दोन भक्त ' Love is my form ' नावाचे इंग्लिश पुस्तक वाचत असताना त्यांनी स्वामींचा एक फोटो पाहिला. त्या फोटोत आणि माझ्यात, तसेच माझी नात वैष्णवी हिच्यात खूप साम्य असल्याचे त्यांना जाणवले. त्या फोटोमागची गोष्ट आता आपण पाहू या. १९५० मध्ये श्री कस्तुरी यांच्या मुलीचा विवाहप्रसंगी भगवानांच्या दिव्य सान्निध्यात गौरी पूजेचे आयोजन करण्यात आले होते. जेव्हा ईश्वराम्मांना सौभाग्य वाण स्वीकारण्यासाठी बोलावण्यात आले तेव्हा स्वामी तात्काळ म्हणाले," ईश्वराम्मा कशाला ? मी स्वतःच वाण स्वीकारेन " असे म्हणून स्वामींनी क्षणात चष्मा घातलेल्या स्त्रीचे रूप धारण केले. तेथील सर्व स्त्रियांनी त्यांना आदरपूर्वक बांगड्या, आरसा, कुंकू, अक्षता इ. सौभाग्य वाण दिले. त्यांनतर स्वामींनी एका भक्तासाठी या रूपातील एक फोटो सुजित केला व पुन्हा मूळ रूप धारण केले.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा