गुरुवार, २८ सप्टेंबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

           " जीवन हे एक स्वप्न आहे. जेव्हा आपण (जागृतीतील स्वप्न ) स्वप्नातून जागे होतो तेव्हा कळते हा सर्व परमेश्वराचाच दिव्य खेळ आहे."

प्रकरण अकरा

वसिष्ठ गुहा आणि मुक्ती निलयम

                माझा देह अमृत झाल्यांनतर पृथ्वीवर सत्ययुग अवतरेल. माझे प्रेम संपूर्ण जगासाठी आहे. जर मी विचार केला असता की ते केवळ माझ्यासाठी आहे ; तर गेली ६० वर्षे जशी मी एकटीच परमेश्वरासोबत जगत होते, तसेच मी ते पुढे चालू ठेवले असते. मग हा आश्रम बांधण्याची तरी गरजच काय ? पृथ्वीचे संरक्षण व्हावे व सर्वांना मुक्ती मिळावी म्हणून हे अवतारकार्य आहे. स्वामींनी त्यासाठी आश्रम बांधण्यास सांगितला. 

मुक्तीचे निवासस्थान 

                स्वामींनी सांगितले की आश्रमाचे बोधचिन्ह अमृत कलश असावे. अमृताचे तीन थेंब खाली सांडत असलेल्या स्थितीत तो कलश थोडा कलंडलेला असावा. त्या थेंबामध्ये तामिळ भाषेत ' मुक्ती ' हा शब्द लिहावा. ' शक्तीकडून मुक्ती ' हे बोधवाक्य त्या कलशाच्या बाजूने वर्तुळाकारात लिहावे. 
                स्वामी म्हणाले ,
                " तू अमृत कलश आहेस. तू जगाला अमृत देणार आहेस. नवीन आश्रमाचे नाव मुक्ती निलयम (मुक्तीचे निवासस्थान ) असेल. जे कोणी आश्रमात येतील त्यांना अमरत्वाचे अमृत मिळेल. "

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

रविवार, २४ सप्टेंबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" अतृप्त इच्छाच केवळ पुन्हा पुन्हा जन्म घेण्याचे कारण ठरते. " 

प्रकरण अकरा 

वसिष्ठ गुहा आणि मुक्ती निलयम 

                जर मी त्यांची आहे तर जे काही माझे आहे ते सर्व त्याचेच आहे. मी देहासकट माझे सर्व अस्तित्व केवळ त्यांनाच अर्पण करेन. परमेश्वरास सदेह समर्पित होणे हे शरीर निवेदन आहे. साधनेचे नवीन शिखर. जोपर्यंत मी साईंच्या चरण कमलांवर मला स्वतःला अर्पण  करत नाही तोपर्यंत माझ्या जीवाला शांती लाभणार नाही, माझे अश्रू थांबणार नाहीत. माझा संग्राम चालूच राहील. भगवद्प्राप्तीची माझी उत्कट इच्छा कधीही न शमणारी आहे. स्वामी म्हणतात, साधना म्हणजे न शमणारी तृष्णा. 
                 मी कौटुंबिक जीवन जगत असताना अखंड साधना केली. या साधनेमुळे वसिष्ठ गुहेमध्ये स्वतःला शुद्ध सत्व करून मी भगवंताशी संयुक्त झाले. शरीर निवेदन करण्यासाठी मी आश्रमात आले. माझे  कौटुंबिक जीवन ही माझी व्यक्तिगत साधना आहे, तर माझे आश्रमातील वास्तव्य हे जगाकरता आहे. मी प्रकृती असल्यामुळे मला शरीर निवेदन करण्याची इच्छा आहे. या जगामध्ये, परमेश्वराला देह अर्पण करण्याचा कोणी विचार तरी करेल का ? मग माझ्यामध्ये ही जगावेगळी इच्छा का निर्माण झाली ? मी कोण आहे, हे सत्य दर्शविण्याकरिता मी सर्वांहून वेगळी आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 
 

गुरुवार, २१ सप्टेंबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

              " नदीच्या पाण्यात तरंगणाऱ्या ओंडक्या सारखे व्हा, प्रवाहाच्या विरुद्ध पोहाल तर धडपडत राहाल म्हणून प्रवाहाच्या दिशेने तरंगा. शांती, आनंद प्राप्त करा, आंनदी व्हा परमेश्वराला त्याचे इच्छेनुसार तुमचे जीवन घडवू द्या. "
 
प्रकरण अकरा 

वसिष्ठ गुहा आणि मुक्ती निलयम 

                  आजपर्यंत काही संतमहात्म्यांनी त्यांच्या देहाचे रूपांतर ज्योतीमध्ये केले आहे. परंतु कोणी आजपर्यंत हाडामांसाच्या देहाचं अमृतमय देहात परिवर्तन केले आहे का ? भगवान म्हणाले," जशी विद्युत शक्ती चुंबकीय शक्तीमध्ये रूपांतरित केली जाते, तशी तुझी प्रेमशक्ती अमृतामध्ये रूपांतरित केली जाईल. हा देह बाहेरून एखाद्या सर्वसामान्य देहाप्रमाणेच दिसेल पण प्रत्यक्षात तो प्रेमाने परिपूर्ण भरलेला असेल. "
                  सर्वसामान्य देह मृत्यूनंतर धरणीवर पडून नष्ट होतो. परंतु हा देह अमृतदेह आहे. जीवनामृतमय आहे. तो अमर आहे, अमर्त्य आहे म्हणून भगवान बाबांपर्यंत देह आणि आत्मा या दोन्हीसकट पोहोचण्याचे माझे ध्येय होईल. 
                   माझ्या शरीरातील रक्ताचा एखादा थेंब किंवा एखादी पेशीसुद्धा वाया जाऊ नये असे मला वाटते. मला माझे एखादे नख वा केसही जमिनीवर पडलेला आवडत नाही. माझा देह धरणीवर पडावा किंवा अग्नीचे भक्ष्य व्हावा, अशी माझी अजिबात इच्छा नाही. परमेश्वराने मला जे काही दिले आहे ते सर्व त्यालाच परत करावे असे मला वाटते. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम
 

रविवार, १७ सप्टेंबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" केवळ ईश्वर सत्य आहे म्हणून त्याची इच्छा बाळगा."

प्रकरण अकरा

वसिष्ठ गुहा आणि मुक्ती निलयम
 
               मी ध्यानातून जागी झाले तेव्हा माझी साडी विभूतीने पूर्ण भरली होती. मी शुद्ध सत्व बनून शुद्ध सत्वामध्ये, स्वामींमध्ये विलीन झाले. सर्वसाधारणपणे ही अवस्था प्राप्र्त झाल्यावर व्यक्ती देहत्याग करून परमेश्वरमध्ये विलीन होतो. तथापि देहसुद्धा परमेश्वराला अर्पण करण्याच्या माझ्या इच्छेमुळे मी देहत्याग केला नाही. 
                मी विचार केला, ' हा  देह का बरं धरणीवर पडावा ? ' मी आचार, विचार आणि उच्चार या सर्वासकट परमेश्वराशी संयुक्त झाले आहे. माझ्या देहाचा एक अणुसुद्धा वाया जाता कामा नये. सर्वकाही त्यांचेच आहे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. हा देहही त्यांचाच आहे. तो त्यांनाच अर्पण केला पाहिजे. या उत्कट इच्छेमुळे मी परमेश्वराला असा वर देण्यासाठी प्रार्थना केली. स्वामी म्हणाले," तुझा देह अमृतमय होईल. तू माझ्यामध्ये विलीन होशील." 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, १४ सप्टेंबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

         " मृत्यू समयी निर्माण झालेले विचार म्हणजे पुढील जन्माचे बिजारोपन. "

प्रकरण अकरा 

वसिष्ठ गुहा आणि मुक्ती निलयम 

               संपूर्ण वेळ स्वामी माझ्या जवळच बसले होते. ४ वाजता स्वामी उभे राहिले. मला एका हाताने उचलून वरती पाहात त्यांनी संकेत केला व म्हणाले," तेहतीस कोटी देव, ऋषीमुनी आणि संतमहात्मे पाहा." सर्व स्वर्गीय जनांनी जयघोष केला, " जय विजयी भव, आपला विजय असो !" सर्वांनी आमच्यावर फुले आणि मंगल अक्षतांचा वर्षाव केला. 
स्वामी म्हणाले,
             " तू शुद्ध सत्व बनून माझ्यामध्ये म्हणजेच शुद्धसत्वामध्ये विलीन झाली आहेस. आता मी तुझ्यावर विभूती अभिषेक करणार आहे. ही विलयनाची घटना सत्य युगाचा पाया रचण्याचे कार्य करत आहे. "
              विभूती अभिषेक हा कामदहनाचे निदर्शन करतो. एखाद्याच्या मनात तीळाच्या अग्राएवढी लहान इच्छा जरी असेल तरी तो शुद्ध सत्व स्थिती प्राप्त करू शकत नाही. जर तुम्ही इच्छा विहीन झालात तरच शुद्ध सत्व होऊ शकता. या स्थितीतील देह भौतिक देह नसून महाकारण देह असतो. दिव्य देह असतो. हा दिव्य देह दिव्यत्वामध्ये विलीन होतो. परमेश्वर म्हणजे शुद्ध सत्व स्थिती. हा वसंता आणि साई संगम आहे. हा वसिष्ठ गुहेतील अनुभव म्हणजे सत्ययुगाचा पाया आहे. आता जा आणि आश्रम सुरु कर."

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम
    
 

रविवार, १० सप्टेंबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

           " तुम्ही जिथे कुठे असाल व जे काही तुम्ही करत असाल  ते ईश्वरास समर्पण करा. "

 प्रकरण अकरा 

वसिष्ठ गुहा आणि मुक्ती निलयम 

१ एप्रिल २००२
               ध्यानामध्ये स्वामींनी मला ऋषिकेशच्या उत्तरेकडे २०कि. मी. वर असणाऱ्या वसिष्ठ गुहेत जाण्यास सांगितले. स्वामी म्हणाले," मी तिथे येऊन तुझ्याशी विवाह करेन."
               ९ ता. ला संध्याकाळी आम्ही मदुराईहुन निघालो आणि ११ ता. ला दिल्लीला पोहोचलो. १७ ता. ला स्वामींनी आम्हाला वसिष्ठ गुहेमध्ये जाण्यास सांगितले. १६ ता. ला सकाळी आम्ही १४ जण ऋषिकेशला जायला निघालो. दुपारू ४ वाजता आम्ही वसिष्ठ गुहेत पोहोचलो. तिथेच पुरुषोत्तमानंदांचा आश्रम वसलेला आहे. आता तो आश्रम त्याचे शिष्य चालवतात आणि गुहेची देखभालही करतात. खूप वर्षांपूर्वी स्वामींनी गुहेला भेट देऊन पुरुषोत्तमानंदांना दर्शन दिले होते. गुहेत शिरतानाच भिंतीवर स्वामींचे चित्र अडकवलेले पाहायला मिळते. 
              रात्री ९ वाजता गंगास्नान करून आम्ही गुहेमध्ये ध्यानासाठी गेलो. स्वामी म्हणाले," मी पहाटे ४ वाजता येईन आणि तुझ्याशी विवाह करेन."
              अपेक्षित घटनेविषयी मनामध्ये हुरहूर दाटली होती. मनाच्या अशा अवस्थेत आम्ही भव्य दिव्य घटनेची तयारी करण्यासाठी आमच्या खोलीवर परतलो. काही तासांच्या कालावधीनंतर आम्ही पुन्हा आमची पावले गुहेकडे वळवली आणि ध्यानाला बसलो. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम

गुरुवार, ७ सप्टेंबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

" परमेश्वपासून तुम्हाला जे काही दूर ठेवते ती सर्व माया आहे."



प्रकरण अकरा   

वसिष्ठ गुहा आणि मुक्ती निलयम 
 

   
              " दि १७ एप्रिल २००४ रोजी पहाटे ४ वाजता वसिष्ठ गुहेमध्ये, मला शुद्ध सत्व करून, माझा त्यांच्याशी योग घडविला. "

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

रविवार, ३ सप्टेंबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

" भावांनुसार विश्व बनते ."

प्रकरण दहा

पार्वती 

               तो फोटो देताना स्वामी म्हणाले," मी काही ती जुनी पार्वती नव्हे." या पुस्तकामध्ये या फोटोला शीर्षक दिले आहे. ' मॉडर्न पार्वती '. वैष्णवी त्यावेळी १२ वर्षाची होती. तिला चष्मा होता. माझ्या १२ व्या वर्षी मीही चष्मा वापरत असे. संध्याकाळच्या ध्यानात मी स्वामींना या फोटोविषयी विचारले. 
               स्वामी म्हणाले,
               " ती तू आहेस. तू शक्ती आहेस. तू पार्वती आहेस. तू १२ वर्षांची असताना अशी दिसायचीस. मी तुझे चित्र दिले आणि आधीच तू कोण आहेस हे दाखवले. तू अजिबात भीती बाळगू नकोस. तू ह्याबद्दल लिही. बनारसमध्ये व्यक्तीच्या मृत्यूनंतर शिवपार्वती त्याला मुक्ती देतात. इथे तू आणि मी शिव पार्वती आहोत. आपण इथे जीवित असणाऱ्या सर्वांना मुक्ती देत आहोत. 
              १९५० मध्ये स्वामींनी तो फोटो दिला . तेव्हा मी १२ वर्षांची होते आणि चष्मा लावत होते . स्वामींनी चष्मा घातलेली पार्वती दाखवली . किती आश्चर्यकारक आहे हे ! हे कधी, कुठे घडू शकते का ? स्वामी कसा प्रत्येक गोष्टीसाठी पुरावा दाखवतात ! 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम