ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" अतृप्त इच्छाच केवळ पुन्हा पुन्हा जन्म घेण्याचे कारण ठरते. "
प्रकरण अकरा
वसिष्ठ गुहा आणि मुक्ती निलयम
मी कौटुंबिक जीवन जगत असताना अखंड साधना केली. या साधनेमुळे वसिष्ठ गुहेमध्ये स्वतःला शुद्ध सत्व करून मी भगवंताशी संयुक्त झाले. शरीर निवेदन करण्यासाठी मी आश्रमात आले. माझे कौटुंबिक जीवन ही माझी व्यक्तिगत साधना आहे, तर माझे आश्रमातील वास्तव्य हे जगाकरता आहे. मी प्रकृती असल्यामुळे मला शरीर निवेदन करण्याची इच्छा आहे. या जगामध्ये, परमेश्वराला देह अर्पण करण्याचा कोणी विचार तरी करेल का ? मग माझ्यामध्ये ही जगावेगळी इच्छा का निर्माण झाली ? मी कोण आहे, हे सत्य दर्शविण्याकरिता मी सर्वांहून वेगळी आहे.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा