रविवार, १० सप्टेंबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

           " तुम्ही जिथे कुठे असाल व जे काही तुम्ही करत असाल  ते ईश्वरास समर्पण करा. "

 प्रकरण अकरा 

वसिष्ठ गुहा आणि मुक्ती निलयम 

१ एप्रिल २००२
               ध्यानामध्ये स्वामींनी मला ऋषिकेशच्या उत्तरेकडे २०कि. मी. वर असणाऱ्या वसिष्ठ गुहेत जाण्यास सांगितले. स्वामी म्हणाले," मी तिथे येऊन तुझ्याशी विवाह करेन."
               ९ ता. ला संध्याकाळी आम्ही मदुराईहुन निघालो आणि ११ ता. ला दिल्लीला पोहोचलो. १७ ता. ला स्वामींनी आम्हाला वसिष्ठ गुहेमध्ये जाण्यास सांगितले. १६ ता. ला सकाळी आम्ही १४ जण ऋषिकेशला जायला निघालो. दुपारू ४ वाजता आम्ही वसिष्ठ गुहेत पोहोचलो. तिथेच पुरुषोत्तमानंदांचा आश्रम वसलेला आहे. आता तो आश्रम त्याचे शिष्य चालवतात आणि गुहेची देखभालही करतात. खूप वर्षांपूर्वी स्वामींनी गुहेला भेट देऊन पुरुषोत्तमानंदांना दर्शन दिले होते. गुहेत शिरतानाच भिंतीवर स्वामींचे चित्र अडकवलेले पाहायला मिळते. 
              रात्री ९ वाजता गंगास्नान करून आम्ही गुहेमध्ये ध्यानासाठी गेलो. स्वामी म्हणाले," मी पहाटे ४ वाजता येईन आणि तुझ्याशी विवाह करेन."
              अपेक्षित घटनेविषयी मनामध्ये हुरहूर दाटली होती. मनाच्या अशा अवस्थेत आम्ही भव्य दिव्य घटनेची तयारी करण्यासाठी आमच्या खोलीवर परतलो. काही तासांच्या कालावधीनंतर आम्ही पुन्हा आमची पावले गुहेकडे वळवली आणि ध्यानाला बसलो. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा