गुरुवार, २१ सप्टेंबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

              " नदीच्या पाण्यात तरंगणाऱ्या ओंडक्या सारखे व्हा, प्रवाहाच्या विरुद्ध पोहाल तर धडपडत राहाल म्हणून प्रवाहाच्या दिशेने तरंगा. शांती, आनंद प्राप्त करा, आंनदी व्हा परमेश्वराला त्याचे इच्छेनुसार तुमचे जीवन घडवू द्या. "
 
प्रकरण अकरा 

वसिष्ठ गुहा आणि मुक्ती निलयम 

                  आजपर्यंत काही संतमहात्म्यांनी त्यांच्या देहाचे रूपांतर ज्योतीमध्ये केले आहे. परंतु कोणी आजपर्यंत हाडामांसाच्या देहाचं अमृतमय देहात परिवर्तन केले आहे का ? भगवान म्हणाले," जशी विद्युत शक्ती चुंबकीय शक्तीमध्ये रूपांतरित केली जाते, तशी तुझी प्रेमशक्ती अमृतामध्ये रूपांतरित केली जाईल. हा देह बाहेरून एखाद्या सर्वसामान्य देहाप्रमाणेच दिसेल पण प्रत्यक्षात तो प्रेमाने परिपूर्ण भरलेला असेल. "
                  सर्वसामान्य देह मृत्यूनंतर धरणीवर पडून नष्ट होतो. परंतु हा देह अमृतदेह आहे. जीवनामृतमय आहे. तो अमर आहे, अमर्त्य आहे म्हणून भगवान बाबांपर्यंत देह आणि आत्मा या दोन्हीसकट पोहोचण्याचे माझे ध्येय होईल. 
                   माझ्या शरीरातील रक्ताचा एखादा थेंब किंवा एखादी पेशीसुद्धा वाया जाऊ नये असे मला वाटते. मला माझे एखादे नख वा केसही जमिनीवर पडलेला आवडत नाही. माझा देह धरणीवर पडावा किंवा अग्नीचे भक्ष्य व्हावा, अशी माझी अजिबात इच्छा नाही. परमेश्वराने मला जे काही दिले आहे ते सर्व त्यालाच परत करावे असे मला वाटते. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा