ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" मुक्तीची कामना करणाऱ्यांना भगवंत मुक्ती देतो आणि आनंदाची इच्छा असणाऱ्यांना आनंद देतो."
प्रकरण बारा
पंढरपूर
१९८२ मध्ये मी ३५ दिवसांच्या यात्रेला गेले होते. तेव्हा आम्ही बद्रीनाथ, केदारनाथ, गया, काशी, अयोध्या, पंढरपूर इ. तीर्थक्षेत्रांना भेट दिली. पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेतले. चरणस्पर्श केला. परंतु त्यावेळी काही विशेष अनुभव आला नाही. तेव्हाही तेच पंढरपूर, तोच पांडुरंग आणि तीच वसंता होती. परंतु काहीच घडले नाही. का बरं ? आता वसंताच्या मनात जे भाव आहेत ते १९८२ मधील वसंतामध्ये नव्हते.
त्यावेळी मी स्वामींना पाहिले नव्हते. मी १९८५ मध्ये त्यांचे प्रथम दर्शन घेतले. वीस वर्षांच्या कालावधीत माझी भक्ती ज्ञानात परिपक्व होऊन विरागी बनली. मी अखंड साधना केली. माझी साधना म्हणजे केवळ भक्ती, पराकोटीची भक्ती. मला साधना म्हणजे काय, हेच माहित नव्हते. देह, मन, आत्मा यांना हलवून सोडणारी परमेश्वर प्राप्तीची तळमळ मला होती एवढेच ! मूर्तीने प्रथम माझ्या मनास बंदिवान केले व नंतर त्याचा ताबा अवताराने घेतला. त्याच्यावर माझ्या भावभावनांचा वर्षाव केला. बाह्यजगात आणि भौतिक गोष्टी ह्यांचे विचार माझ्या मनात कधी आलेच नाहीत. मनात होते ते फक्त स्वामी, स्वामी आणि स्वामींच !
हळूहळू स्वामी ध्यानामध्ये माझ्याशी बोलू लागले. मला मार्गदर्शन करू लागले. त्यांनी मला माझ्या भक्तीचे भावविश्व उलगडून दाखवणारी पुस्तके लिहिण्यास सांगितले आणि नंतर गीता, उपनिषदे आणि उपनिषदांच्या पलीकडे याविषयी लिहिण्यास सांगून स्वामींनी मला भक्तिमार्गावरून ज्ञानमार्गाकडे वळवले.
मला परमेश्वराशी लग्न करायचे आहे आणि स्वामी माझी इच्छा पुरी करत आहेत. त्यामुळे ऐक्याची परमोच्च स्थिती प्राप्त करूनही मी विरहवेदना अनुभवत असते. ज्या पांडुरंगावर मी लहान वयापासून भक्तीची उधळण केली, तो पांडुरंग म्हणजे तेच असल्याचे स्वामी सिद्ध करत आहेत.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा