ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आसक्ती आणि ममत्व मनामध्ये संभ्रम निर्माण करते तर परमेश्वरावरील प्रेम आत्मसाक्षात्कारा कडे घेऊन जाते. "
प्रकरण बारा
पंढरपूर
आम्ही सकाळी ' गणेश अभिषेक ' करण्यासाठी जात होतो, तेव्हा आमच्या नजरेस वाळूमध्ये पावलांचे दोन खोल ठसे उमटलेले दिसले. ते थोडेसे अवघडलेल्या स्थितीत उमटल्यासारखे दिसत होते. दोन्ही टाचा टेकल्या होत्या परंतु दोन्ही पायांची बोटे एकमेकांपासून दूर आणि बाहेरच्या बाजूला उमटली होती. आम्ही आश्रमातील सर्वांना विचारले, परंतु कोणीच तिथे उभे राहिले नव्हते.
थोडयाच वेळाने एडी धावत आले आणि म्हणाले, की त्यांनी आत्ताच एक भाला मोठा गरुड पक्षी आश्रमाच्या वर पाहिला. आम्ही आपआपसात चर्चा करून असा निष्कर्ष काढला की गरुडाने पांडुरंगाला इथे सोडले असावे. कारण त्या पावलांचे ठसे पांडुरंगाच्या पावलांशी मिळते जुळते होते. पांडुरंग ज्या विशिष्ट पवित्र्यात उभे राहतात. त्याच्याशी ते ठसे मिळतेजुळते होते.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा