ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
गुरुपौर्णिमा संदेश
विचार, उच्चार आणि आचार ह्या तिन्हीमध्ये आध्यात्मिक शिकवणीचे अनुसरण केल्यास विवेकबुद्धी आणि ज्ञान प्राप्त होते. केवळ पुस्तकी ज्ञान निरर्थक आहे.
भगवान श्री सत्य साई बाबा नेहमीच सांगत की विचार, उच्चार आणि आचार ह्यामध्ये सुसंगतता, एकसूत्रता असायला हवी. तथापि लोकांना हे करणे शक्य होत नाही. ते विचार एक करतात आणि वेगळेच आचरण करतात. त्यांच्या मनात एक असते व ते दुसरेच बोलतात. जे तुम्ही इतरांना सांगू शकत नाही, बोलू शकत नाही त्याचा विचारसुद्धा करू नका. जर तुमचे विचार,उच्चार आणि आचार ह्यामध्ये सुसंगतता असेल तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडवू शकता. आपण विवेकाचा वापर करून चांगले वाईट ह्यातील भेद जाणून जे चांगले आहे त्याचे अनुसरण केले पाहिजे. चांगल्या सवयी चांगले गुण अंगी बनवले पाहिजेत. असे केल्याने हळूहळू आपल्यामधील दुर्गुणांचा नाश होईल. केवळ ह्या कारणासाठी आपल्याला हा जन्म दिला आहे. तसेच हा देह, बुद्धी आणि इंद्रिये दिली आहेत. ह्याचा योग्य वापर करून आपण जन्म मृत्युच्या फेऱ्यातून आपली सुटका करून घेतली पाहिजे.
जीवन एक संघर्ष आहे. वास्तविक सद्गुण आणि दुर्गुण ह्यांच्यामधील लढा आहे. आजकाल सर्वांची हृदये कुरुक्षेत्राची युद्धभूमी बनली आहेत. तेथे सत् आणि असत् मध्ये सतत संघर्ष चालू असतो. दुर्गुणांवर असत् वर विजय मिळवण्यासाठी प्रत्येकाने अत्यंत दक्ष राहिले पाहिजे. जर आपण परमेश्वराला आपला सारथी बनवले तर तो आपल्याला योग्य मार्गावर घेऊन जाईल. स्वामींनी आपल्याला हीच शिकवण दिली. कुरुक्षेत्र हे बाहेर नसून आतमध्येच आहे. जेथे हृदय आणि मन ह्यामध्ये सतत संघर्ष चालू असतो निरंतर एकात्मतेची जाणीव ठेऊन दुर्गुणांवर मात करता येते.
श्री वसंतसाई
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा