ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जेथे मनुष्याची नजर जाते त्यामागे त्याचे मन धावते आणि इच्छांचा जन्म होतो. "
भाग चौथा
हृद्गत .........
आमच्या घरामध्ये अंतर्योग शिबिराचे आयोजन केले होते. त्यावेळी माझ्या मनात विचार आला. " हे भगवान, वालीला असा वर मिळाला होता की त्याच्यासमोर येणाऱ्या प्रत्येकाचे अर्धे शारीरिक बल वालीला प्राप्त होईल. त्याचप्रमाणे तुम्ही मलाही असा वर द्या; की मी ज्यांना पाहीन त्यांची अर्धी आध्यात्मिक शक्ती मला प्राप्त होईल." माझ्या मनात अशी अभिलाषा निर्माण झाली. मी साश्रू नयनांनी कृष्णाला विचारात होते. " कान्हा, मला सर्व आध्यात्मिक लोकांची शक्ती जरी लाभली, तरी मला या जन्मात तुझे दर्शन होईल का नाही ? माझे जीवन व्यर्थ जात आहे. मी तुला कधी पाहू शकेन ? कृष्णदर्शनाच्या ध्यासामुळे मन नवीन नवीन मार्ग शोधून काढते आहे.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा